कोरोनाची (Corona) वेगवेगळी रूप सध्या समोर येत आहेत. तो अपेक्षेपेक्षा जास्त पसरत आहे. भारताता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा(Delta) प्रकार कारणीभूत होता. आता तर ओमिक्रॉन (Omicron) या नव्या स्ट्रेनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोविड पेशंट्सची वाढती संख्या बघता हे सिद्ध करणे पुरेसे आहे.
डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही 'चिंतेचे प्रकार' आहेत. तज्ञ आणि डॉक्टरांना आोमिक्रोनमुळे सौम्य लक्षणे उद्भवतात, असे आढळले आहे. मात्र डेल्टाची लक्षणे जास्त तीव्र होती. SARs-COV-2 विषाणूसाठी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, लोकांमध्ये आपल्याला डेल्टा की ओमिक्रॉन यापैकी नेमका कोणता संसर्ग झालाय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (How to know You Have Caught Omicron or a Delta)
ओमिक्रोनचे संक्रमण अधिक (Omicron Infection)
डेल्टा आणि ओमिक्रॉनची तुलना केल्यास ओमिक्रॉनचे संक्रमण खूपच सौम्य असून तो जास्त संसर्गजन्य आहे. जपानी शास्त्रज्ञ आणि क्योटो युनिव्हर्सिटी, हिरोशी निशिउरा येथील आरोग्य (Health)आणि पर्यावरण विज्ञानाचे प्राध्यापक यांनी केलेल्या अभ्यासानुसार, डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनचा संक्रमण दर 4.2 पट जास्त आहे. हिरोशी म्हणतात की, ओमिक्रॉन अधिक प्रसार करतो. नैसर्गिकरित्या आणि लसींद्वारे अधिक प्रतिकारशक्ती निर्माण करतो. medRxiv साइटवर प्रकाशित झालेल्या दुसर्या फ्रेंच अभ्यासात आढळले की, ओमिक्रॉन डेल्टा पेक्षा 105% जास्त संक्रमित होऊ शकतात.
आतापर्यंत, उपलब्ध झालेल्या डेटानुसार हेच सिद्ध होते की, ओमिक्रॉनचे संक्रमण जास्त असल्याने तो कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकतो. सध्या वाढलेल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीवरून हेच सिद्ध होते. (How to know You Have Caught Omicron or a Delta)
ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टाच्या लक्षणांपेक्षा वेगळी (Omicron And Delta Symptoms)
ओमिक्रॉन (Omicron) सुरू झाल्यापासून, शास्त्रज्ञ यातील स्ट्रेनचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये. सुरुवातीला ओमिक्रॉन पहिल्यांदा आढळला तेव्हा दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ज्या लोकांना संसर्ग झाला होता त्यांनी कोणतीही गंभीर लक्षणे नोंदवली नाहीत. डॉ कोएत्झी यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तींनी घसा खवखवणे आणि ताप आल्याचे निरिक्षण नोंदवले.
ओमिक्रॉन प्रकाराची डेल्टासोबत ((Omicron And Delta Symptoms)) तुलना करताना, बंगलोरच्या एस्टर आरव्ही हॉस्पिटलचे डॉ. एस.एन. अरविंदा म्हणतात, कोरोना प्रकारांचे परिणाम व्यक्तीपरत्वे वेगळे असू शकतात. काही अहवालानुसार ओमिक्रॉन असलेल्या लोकांना वास न येण्याची शक्यता कमी असते. इतर प्रकारांमध्ये मात्र त्यांना वास येत नाही. डेल्टा गंभीर असल्यास अधिक गंभीर लक्षणे दिसू शकतात तर ओमिक्रॉनमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. ओमिक्रॉनमुळे घशाला त्रास अधिक प्रमाणात होतो. श्वास घेण्याला फारसा त्रास होत नाही. पण, लक्षणांमधील फरक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन आणि सखोल समजून घेणे आवश्यक आहे, असा त्यांचा विश्वास आहे. (How to know You Have Caught Omicron or a Delta)
तुमचा कोणता प्रकार ते चाचण्याच ठरवू शकतात. (COVID-19 tests determine which variant you have?)
सध्या, एखादी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे निर्धारित करण्यासाठी RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या वापरल्या जातात. पण, हा ओमिक्रॉन प्रकार आहे की नाही हे तपासण्यासाठी जनुक अनुक्रमण ( Gene Sequencing ) ही पुढची पायरी आहे. Omicron आहे की नाही हे ठरविण्यासाठी संपूर्ण अनुवांशिक विश्लेषण आवश्यक आहे, ज्याला चार ते पाच दिवस लागू शकतात. चाचणी करताना अनुवांशिक साधनांच्या मदतीने, शास्त्रज्ञ एखाद्याला ओमिक्रॉन किंवा डेल्टा संसर्ग झाला आहे, हे ठरवू शकतात.
संसर्गजन्य रोग तज्ञाच्या म्हणण्यानुसार, जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) म्हणजे जेथे व्हायरल जीनोम आणि विषाणूजन्य जीवाची अनुवांशिक रचना पीसीआर केल्यानंतर ओमिक्रॉन किंवा डेल्टा प्रकार आहे की नाही हे कळते. पीसीआर चाचणी घेतल्यानंतर, चाचण्या स्पाइक (एस), न्यूक्लियोकॅप्सिड, आतील क्षेत्र (inner area) (N2) किंवा बाह्य क्षेत्र outer shell (E)असलेल्या विषाणूच्या वेगवेगळ्या भागांशी संबंधित तीन जीन्स शोधतात. जर एस जीन पीसीआर पॉझिटिव्ह म्हणून बाहेर आला, तर तो डेल्टा संसर्ग असण्याची शक्यता असते. जर एस जीन पीसीआर नकारात्मक असेल तर ते ओमिक्रॉन किंवा इतर कोणताही कोरोनाचा प्रकार नसतो.
चाचणी कीट (ICMR approved testing kit )
ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये लागणारा खूप वेळ कमी करण्यासाठी , भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) टाटा मेडिकल आणि डायग्नोस्टिक्सने विकसित केलेल्या "ओमिसुर" म्हणून ओळखल्या जाणार्या RT-PCR चाचणी किटला मान्यता दिली आहे. Omisure चाचणी किटची किंमत प्रति चाचणी 250 रुपये आहे, परंतु ती घरी करता येणारी चाचणी किट नसल्यामुळे अतिरिक्त खर्च आणखी असू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.