सध्या अनेकजण फिटनेस जपण्याला प्राधान्य देत आहेत. लोकांच्या गरजा लक्षात घेता अनेक फिटनेस ट्रेंड (Fitness) उदयास येत आहेत. त्यापैकी काही लोकप्रियही होत आहेत. सध्या प्लॉगिंग (Plogging ) ट्रेंड खूप लोकप्रिय होतो आहे. मेरियम वेबस्टर डिक्शनरीनुसार, एरिक अहलस्ट्रॉमने (Erik Ahlström ) प्लॉगिंग शब्दाचा शोध लावला. सकाळी, संध्याकाळी (Morning-evening Walk) वॉक, जॉगिंग करताना कचरा उचलण्याची पद्धत म्हणून त्याची व्याख्या करण्यात आली आहे. स्वीडिश शब्द plocka upp पासून Plogging हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ उचलणे असा होतो. हा ट्रेंड सध्या लोकांना खूप आकर्षित करतो आहे, साथीच्या आजाराव्यतिरिक्त लोकं हवामान संकटामुळे त्रासले आहेत. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी थोडासा हातभार म्हणूनही प्लॉगिंगकडे पाहिले जात आहे. Plogging करण्याचे पाच फायदे (Benefits) आहेत.
१) तणाव होतो कमी (Alleviates stress)- अभ्यासानुसार, निसर्गात फेरफटका मारल्याने संपूर्ण आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. जॉगिंग हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. त्यामुळे एंडोर्फिनचे उत्पादन उत्तेजित होते. तसेच हे हार्मोन्स मूड वाढवण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. तसेच कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी त्याची मदत करतात. एकूणच हा व्यायाम तणाव घालवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.
२) हृदयाचे आरोग्य वाढते( Boosts heart health)- या फिटनेसमुळे तुमचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य वाढते. प्लॉगिंग हा एरोबिक व्यायामाचा एक प्रकार आहे. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य वाढतेच शिवाय सहनशक्ती सुधारण्यास, हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो.
३) पर्यावरणाला फायदा (Benefits the environment) - जेव्हा तुम्ही जॉगिंग करता तेव्हा पडलेला कचरा उचलणे , ही प्लॉंगिंगची संकल्पना आहे. . तुम्ही कचरा असलेला भाग स्वच्छ केल्यास, तुम्हाला जॉगिंग साठी स्वच्छ जागा मिळेल. हे प्लॉगिंगचे वेगळेपण आहे. कारण लोकांना त्यांचे कार्य करताना आरोग्य सुधारण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचा फायदा मिळतो.
४) वेगवेगळ्या प्रकारे करता येते (It is open to variety)- स्क्वॅट, वाकणे किंवा ताणणे, अशा तुम्हाला हव्या असलेल्या मार्गाने व्यामाम करताना तुम्ही कचरा उचलू शकता. प्लॉगिंग व्यायामाचा एक प्रकार मर्यादित ठेवत नाही. तर, तुमच्यातली लवचिकता- अनुकूलता वाढवतो.
५) सुसंगता वाढवतो ( Supports consistency) - कठीण व्यायामाच्या तुलेत लवचिक आणि करण्यास सोपा, तसेच मनोरंजन करणारा हा व्यायाम प्रकार आहे. शिवाय हा प्रकार ग्रुपमध्ये करताना आणखी मजा येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.