Surrogacy द्वारे प्रियांका बनली आई; काय असते सरोगसी?

अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत.
Surrogacy
Surrogacy esakal
Updated on
Summary

अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत.

बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आई झाली आहे. स्वत: प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमधून माहिती दिली आहे. सरोगसीद्वारे प्रियांका-निक जोनासने (Nick Jonas) बाळाला जन्म दिला. 2018 मध्येच दोघांनी लग्न केलं. सरोगसीद्वारे (Surrogacy) आई बनणारी प्रियांका एकमेव व्यक्ती नाहीयेय. यापूर्वी बॉलिवूडमध्ये शाहरुख खान-गौरी, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण राव, तुषार कपूर, एकता कपूर, करण जोहर, सनी लिओनी-डॅनिअल, प्रिती झिंटा-झिन या सेलिब्रिटींचा त्यामध्ये समावेश आहे. यांसारखे अनेक स्टार सरोगसीच्या मदतीने पालक बनले आहेत. सरोगसी म्हणजे काय आणि भारतात त्याचे काय नियम आहेत ते जाणून घेऊयात.

Surrogacy
आता सरोगसी मातृत्वालाही मिळणार प्रसूती रजा

सरोगसी म्हणजे काय? (What is surrogacy)

सोप्या शब्दात सरोगसी (Surrogacy) म्हणजे दुसऱ्या महिलेचं गर्भाशय भाड्यानं घेऊन तिच्या मदतीनं अपत्य जन्माला घालणे. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल प्राप्त होऊ शकतं. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन (Abortion) झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो.

सरोगसीचे दोन प्रकार

सरोगसीचे दोन प्रकार आहेत. पारंपारिक सरोगसी ज्यामध्ये वडिलांचे किंवा दात्याचे शुक्राणू सरोगेट आईच्या अंड्यांशी जुळतात. या सरोगसीमध्ये सरोगेट मदर ही बायोलॉजिकल मदर (जैविक मदर) असते. आणि दुसरी गर्भधारणा सरोगसी ज्यामध्ये सरोगेट आईचा मुलाशी अनुवांशिक संबंध नसतो. म्हणजेच सरोगेट मदरची अंडी गरोदरपणात वापरली जात नाही. यामध्ये सरोगेट मदर ही मुलाची जैविक आई नसते. ती फक्त मुलाला जन्म देते. यामध्ये वडिलांचे शुक्राणू आणि आईची अंडी एकत्र करून किंवा दात्याचे शुक्राणू आणि अंडी यांची टेस्ट ट्यूब मिळाल्यानंतर ते सरोगेट आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते.

Surrogacy
‘सरोगसी’साठी कायद्याची चौकट

भारतातील सरोगसी नियम

भारतात सरोगसीचा गैरवापर रोखण्यासाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश गरीब महिला सरोगेट माता झाल्या. कॉमर्शियल सरोगसी या प्रकारावर आता सरकारने बंदी घातली आहे. 2019 मध्येच कॉमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरोगसीचा पर्याय केवळ मदतीसाठी खुला राहिला आहे. कॉमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्याबरोबरच, नवीन विधेयकाने परोपकारी सरोगसीबाबतचे नियम आणि कायदेही कडक केले आहेत.

या अंतर्गत परदेशी, सिंगल पेरेंट्स, घटस्फोटित जोडपे, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सरोगसीसाठी, सरोगेट आईकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तरच ती सरोगेट माता बनू शकते. दुसरीकडे, सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्यांकडे ते वंध्यत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावे. तथापि, सरोगसी नियमन विधेयक 2020 मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये कोणत्याही 'इच्छुक' महिलेला सरोगेट बनण्याची परवानगी होती.

Surrogacy
'सरोगसी' म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

कोरोनाच्या काळात सरोगसीच्या प्रकरणात वाढ

कोरोनामध्ये (Corona) गेल्या दोन वर्षांपासून मंदी आणि बेरोजगारीमुळे सरोगेट मातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. इतरांच्या घरी काम करणे, झाडू मारणे, भांडी किंवा किरकोळ काम करणाऱ्या महिला किंवा कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी सरोगसीचा अवलंब केला आहे. कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि एखाद्याच्या शिक्षणाचा किंवा उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तरुण वर्गातील महिलांना सरोगसीतून पैसे कमविण्याचा सोपा मार्ग दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.