अपचनाची समस्या दूर करायची आहे ? तर या आठ पेयांच रोज सेवन करा

for problem of acidity to use a homemade many options and drinks to use daily
for problem of acidity to use a homemade many options and drinks to use daily
Updated on

कोल्हापूर : पोटाच्या समस्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. ऍसिड रिफ्लेक्सची बरीच कारणे आहेत. जेवणाची वेळ, जेवल्यानंतर डायरेक्ट झोपणे, अल्कोहोलचे सेवन करणे, धूम्रपान इ. आणि याचा परिणाम म्हणून अपचन झाले तर बरेच घरगुती उपाय खूप फायद्याचे असतात. आणि असे बरेच पेय आहेत जे पचन होण्यासाठी उपयोगी पडतात. किंवा पित्त दूर करण्यासाठी त्यांची मदत होते. यामध्ये खूप महत्त्वाचे पेय दिले आहेत. पित्तापासून सुटकारा पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिनी मध्ये काही बदल करण्याची गरज आहे. पित्ताच्या लक्षणांबद्दल जर तुम्ही विचार केलात तर हे अनुभवायला मिळतं की अशा परिस्थितीत असतो की आपल्या पोटात सदैव जळजळ होत असते. यासाठी बरेच लोक काही घरगुती उपाय करतात. आणि या घरगुती उपायांमुळे खूप फायदेही होतात. 


नारळ पाणी 

पित्तामुळे तुम्हाला असं वाटते की तुमच्या गळ्यामध्ये आग होत आहे. अशावेळी तुम्ही ती आग शांत होईल अशा पेयाला शोधत असता. यावेळी तुमच्या डोक्यात येणारी पहिली गोष्ट म्हणजे नारळ पाणी. हे शुद्ध पेय आहे. नारळ पाणी पिल्याने आपल्याला काही आश्चर्यजनक लाभही होतात. नारळ पाणी कसे काम करते तर नारळामध्ये कायब्रो हायड्रेड आणि इलेक्ट्रोलाईट्स सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमपासून समृद्ध असते. हे डिहायड्रेशनसाठी एक आदर्श पेय मानले जाते. पोटाचा पीएच संतुलित करण्यासाठी नारळ पाणी उपयोगी पडते.

थंड दूध 

अपचन लवकर शांत करण्यासाठी थंड दूधाचे सेवन केले जाते. दुधामध्ये वसा जास्त असल्याने ते अॅसिड रिप्लेक्स करण्यासाठी प्रतिसाद देत असतात. तु्म्हांला पचनाच्या समस्या उद्भवत असतील तर या समस्येसाठी थंड दुधाचे सेवन करावे. ज्यावेळी अपचन होते. त्यावेळी थंड दूध घेऊन तुम्ही ही समस्या थांबवू शकता.

स्मूदी 

पालेभाज्या फळे आणि ज्युसची स्मुदी फायबर पासून बनलेली असते. यामध्ये हायफायबर असते ज्याचे सेवन केल्याने अॅसिड रिप्लेक्सच्या समस्येपासून आपल्याला सुटकारा मिळतो. कमी खाल्ल्याने अॅसिड रिप्लेक्सपासून बचाव  करता येतो. तुम्ही घरी थंड दुधात ओट्स घालून स्मुदी तयार करू शकता. ही स्मुदी सेवन करण्याने तुम्ही अपचनाच्या समस्यांपासुन सुटकारा मिळवू शकतो.

भाज्यांचा रस 

भाज्या या क्षारीय पीएच श्रेणीमध्ये येतात. परंतु जेव्हा उच्च सामग्रीमध्ये याचा उल्लेख होतो, तेव्हा या ऍसिड रिफ्लेक्सच्या संभावना कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे लिंबूरस, टकसाल आणि लौकीचा ज्यूस. जर तुम्हाला अपचनाची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही भाज्यांचा ज्युसचे सेवन करुन त्यापासून सुटका मिळवू शकता.

लिंबूचा रस 

साधारणतः असे मानले जाते की आंबट आणि आम्ल पदार्थांमुळे पित्त वाढते. परंतु मधासोबत कोमट पाणी आणि लिंबू पचनक्रियेसाठी खूप मदत करतात. आणि पचनासाठी हे खुप उपयोगी पडते. हे गैस्ट्रिक पीएचच्या तुलनेत हे क्षारीय आहे. त्यावेळी मध आणि लिंबू पाणीच्या सेवन करू शकतो.

प्रोबायोटिक्स  

 शेवटी अनुकूल बॅक्टेरिया पचन सुधारण्यासाठी आणि ऍसिड रिफ्लेक्स थांबवते. प्रोबायोटिक्स शेवटी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी मदत करतात. कमी मीठ छांसचा यासाठी तुम्ही वापरू शकता. याच्या रोज सेवनाने तुमच्या पोटातल्या काही आजारांना छुटकारा मिळू शकतो.

सोप पाणी

सोप पाणी स्वास्थ्यसाठी फायद्याचे असते. हे सुज कमी करते. मांसपेशींना आराम देते. पचनक्रियेत सुधारणा करते. आणि खूप वेळपर्यंत ऍसिड रिफ्लेक्स कमी करण्यासाठी मदत करते. तसेच अपचनपासून सुटकारा देण्यासाठी स्वच्छ पाणी फायद्याचे असते. 

लिंबु आणि आल्याचे पाणी 

जीरा पावडर, साध मीठ आणि लिंबु सोबत पाण्यात उकळलेलं आलं, जेवन पचवण्यासाठी मदत करते. तुम्ही जर रोज याचे सेवन केले तर पचनाला मदत करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

( डिसक्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपादन - स्नेहल कदम  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.