तुमचा RT-PCR चाचणी अहवाल काय सांगतो? असे समजून घ्या

डेल्टा किंवा ओमिक्रॉनची लागण झाली आहे हे याद्वारे तुम्हाला कळू शकते
RT PCR test
RT PCR testsakal
Updated on

एन जीन म्हणजे काय? तुम्हाला डेल्टा कि ओमिक्रॉनची लागण झाली आहे ते कसं कळेल? Ct व्हॅल्यू कशी तपासायची? असे अनेक प्रश्न कोविड १९ चाचणी (Test) केल्यानंतर त्याचा अहवाल डाऊनलोड करताना सामान्य नागरिक विचारत आहेत. कोविड-19 चाचणी अहवालात काय आहे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे . त्यामुळे एखाद्याला संसर्गाची तीव्रता कळू शकेल. यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची (Health) काळजी कशी घ्यावी हेही समजून घेता येईल.

RTPCR
RTPCRSakal

कोविड १९ चाचणी अहवाल अशाप्रकारे टप्याटप्याने तपासला जातो.

ओआरएफ १ एबी (ORF1ab) - यात एकत्रितपणे ओपन रिडिंग फ्रेमचा संदर्भ दिला जातो. ORF1a आणि ORF1b,हे कोरोनाव्हायरसच्या जीनोममध्ये आढळतात. ते साध्या भाषेत (encode) पॉलीप्रोटीन 1a, b करतात, जे RNA संश्लेषणात गुंतलेले असतात आणि रोगप्रतिकारक शक्तीत अडचणी निर्माण करतात. जेव्हा विषाणूजन्य जीनोम पेशीत प्रवेश करतो तेव्हा पॉलीप्रोटीन 16 नॉन-स्ट्रक्चरल प्रथिने तयार करतात. त्यामुळे ज्यामुळे एक प्रतिकृती-प्रतिलेखन कॉम्प्लेक्स तयार होते. ते जिनोम प्रतिकृती -प्रतिलेखन तयार करण्यास मदत करते. ORF1ab ला प्रतिकृती जनुक असेही म्हणतात.

RT PCR test
Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

एन जीन (N gene) - एन जीन किंवा न्यूक्लियोकॅप्सिड हे कोरोनाव्हायरसचे संरचनात्मक प्रथिने आहेत. व्हायरल पॅथोजेनेसिस दरम्यान नियामक भूमिका बजावण्यासाठी अनेक विषाणूंचे न्यूक्लियोकॅप्सिड प्रथिने दाखवले गेले आहेत.ते विशिष्ट संरचनात्मक स्वरूप दाखवण्यासाठी तयार असतात. ते इतर विषाणू/होस्ट घटकांशी संबंधित आहेत. ते सेल्युलर यंत्रसामग्री अशा प्रकारे तिरपे करतात. व्हायरसच्या अस्तित्वासाठी ते अधिक अनुकूल बनते,” असे संशोधन अभ्यासात म्हटले आहे. हे व्हायरस शोधण्याचे संभाव्य लक्ष्य आहे. इंट्रासेल्युलर लाईफ सायकलदरम्यान, कोविड-19 प्रेरक कोरोनाव्हायरस त्याच्या जीनोमिक आरएनएची प्रतिकृती बनवतो. सध्या, कोरोनाव्हायरसचा शोध हा 1ab (ORF1ab) च्या ओपन रीडिंग फ्रेम आणि nucleocapsid प्रोटीन (N) च्या दोन जनुकांच्या रिअल-टाइम RT-PCR डिटेक्शनद्वारे घेतला जातो. या पद्धतीमध्ये, नमुन्यातील अनुवांशिक सामग्री वढवून विषाणूची तिव्रता आणि तो अस्तित्वात आहे का ते शोधले जाते. नमुन्यातून आरएनए काढला जातो आणि तो डीएनएमध्ये उलट लिप्यंतरण केला जातो. हा डीएनए प्रवर्धनाद्वारे विषाणू आहे की नाही ते शोधण्यासाठी टेम्पलेट म्हणून वापरला जातो. विषाणू असल्यास चाचणी पॉझिटिव्ह येते आणि संबंधित व्यक्तीच्या शरीरात विषाणू असल्याची खात्री होते. त्यानंतर लगेच संपर्क करून त्या व्यक्तीला क्वारंटाईन आणि आयसोलेशचा सल्ला दिला जातो. RT-PCR चा चाचणी निकाल Ct मूल्यांवर आधारित असतो.

RT PCR test
एका व्यक्तीला ओमीक्रॉनचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
corona Positive
corona Positivesakal

सीटी व्हॅल्यू म्हणजे काय? (What is Ct value?)

हे सायकल थ्रेशोल्डचे संक्षिप्त रूप आहे. Ct मूल्य, ही सायकलची संख्या आहे ज्याची पार्श्वभूमी सिग्नलच्या वर आणि PCR उत्पादनाच्या वरचढ फ्लूरोसेन्स शोधण्यायोग्य आहे. उदाहरणार्थ, जर Ct मूल्य कमी असेल तर विषाणू कमी चक्रांमध्ये आढळला असा होतो. म्हणजेच शरीरात जास्त प्रमाणात व्हायरस आहे. 35 पेक्षा जास्त Ct मूल्य असल्यास कोविड निगेटिव्ह मानले जाते आणि 35 पेक्षा कमी Ct मूल्य कोविड पॉझिटिव्ह मानले जाते.जर सीटी मूल्य 25-30 च्या दरम्यान असेल तर, याचा अर्थ रूग्ण कोविड पॉझिटिव्ह समजला जातो. कारण थ्रेशोल्डपेक्षा कमी चक्रांमध्ये विषाणू आढळून आला होता, जो 35 आहे. सोप्या शब्दात, 35 पेक्षा कमी सायकलमध्ये विषाणू आढळला. असे असल्यास मोठ्या प्रमाणात विषाणू शरीरात आहे असे समजले जाते. त्याचप्रमाणे, Ct मूल्य 20 पेक्षा कमी म्हणजे विषाणू 20 पेक्षा कमी चक्रांमध्ये आढळून आला तर तो, शरीरात उच्च व्हायरल लोड असल्याचे दाखवतो.

AIIMS भुवनेश्वरमधील एका अभ्यासात असे आढळून आले की, भारतात दुसऱ्या लाटेतील रूग्णामध्ये CT मूल्य 25 पेक्षा कमी असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते.तर, जागतिक स्तरावर स्वीकृत Ct मूल्य 35 आणि 40 च्या दरम्यान आहे. ICMR ने प्रयोगशाळेच्या अहवालांवर आधारित म्हणून 35 म्हणून प्रमाणित केले आहे.

RT PCR test
कोरोना झाल्यामुळे घरी आहात! मानसिक आरोग्य कसे जपाल?

सीटी मूल्याचा चुकीचा अर्थ लावणे (Misinterpretation of Ct value)

संशोधनातून केलेल्या अभ्यासानुसार, Ct मूल्य केवळ कोरोना व्हायरस शरीरात उपस्थित आहे की नाही, याबद्दल माहिती देत ​​नाही तर, संसर्गाच्या वेळी व्हायरस कसा वागतो, किती त्रास देऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी मदत करते. मात्र, याला विविध कारणांमुळे ​​मर्यादा आहेत ज्यात महत्त्वाच्ये म्हणजे चाचणी करणार्‍या व्यक्तीची तांत्रिक क्षमता, उपकरणे आणि पिपेट्सचे कॅलिब्रेशन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये याचा त्यात समावेश आहे.

RT PCR test
कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.