डार्क चॉकलेट खाल्ल्याने कर्करोगापासून होऊ शकतो बचाव, अभ्यासात स्पष्ट

सेल जर्नलमध्ये याविषयी अभ्यास प्रकाशित झाला आहे
Dark Chocolate
Dark Chocolate esakal
Updated on

केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने गोड पदार्थात आढळणारे (Sweet) मॅग्नेशियम (Magnesium) हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (वाढविण्यासाठी गुरूकिल्ली असल्याचे ओळखले आहे. कर्करोगाच्या पेशींविरूद्ध किलर 'टी पेशी'(T cells) हे शरीराचे (Body) मुख्य शस्त्र आहे. प्रयोगशाळेतील प्रयोगांनी ते केवळ मॅग्नेशियमने समृद्ध असलेल्या वातावरणात प्रभावी असल्याचे दर्शवले आहे. सेल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, कर्करोग रूग्णांच्या निष्कर्षाचा आधार घेणारा डाटाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या रक्तात मॅग्नेशियमची अपुरी पातळी आहे त्यांच्यामध्ये कर्करोगाविरूद्ध इम्युनोथेरपी उपचार कमी प्रभावी होते. अशावेळी डार्क चॉकलेट (Dark Chocolate) खाण्याचे (Food)फायदे सांगितले गेले आहेत.

Dark Chocolate
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटESAKAL

डार्क चॉकलेटचे फायदे ( Dark Chocolate Benefits)

दहापैकी सात ब्रिट्समध्ये खराब आहारामुळे मॅग्नेशियमची (Magnesium) कमतरता दिसते. ते हिरव्या भाज्या, होलमील ब्रेड, एवोकॅडो, नट्स आणि ब्राऊन राईसमध्ये हे आढळते. याबाबत स्वित्झर्लंडमधील बासेल युनिव्हर्सिटीचे लेखक प्रोफेसर क्रिस्टोफ हेस म्हणाले की, हे निरीक्षण वैद्यकीयदृष्ट्या त्याची यथार्थता पाहण्यासाठी आम्ही आता अधिक लक्ष देऊन ट्यूमरमध्ये मॅग्नेशियम वाढविण्याचे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी डार्क चॉकलेट हा चांगला पर्याय आहे. ऑटोइम्यून हबच्या न्यूट्रिशनल थेरपिस्ट साराह ब्रूक्स म्हणाल्या, डार्क चॉकलेट स्वादिष्टच नाही तर खूप आरोग्यदायी आहे. तसेच ते मॅग्नेशियमने समृद्झ आहे. बऱ्याच लोकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते. तुम्हाला ताण, चिंता, अपुरी झोप असेल तर डार्क चॉकलेटमुळे मदत मिळू शकते. त्यात लोह, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस तसेच फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल आणि फ्लॅव्हॅनॉल सारख्या वनस्पती संयुगे जास्त आहेत. हे घटक तुमच्या एकूण आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. ७० टक्क्यांपेक्षा जास्त कंटेट असणारा कोको बार खाणे हे चांगले आहे. तुम्ही हॉट चॉकलेटही पिऊ शकता.

Dark Chocolate
Cholesterolचं प्रमाण कमी करायचंय! 'हे' पाच पदार्थ खाणे टाळा
Healthy Food
Healthy FoodSakal

मॅग्नेशियम किती प्रमाणात घ्यावे? ( How Much Magnesium Should Be Taken?)

मॅग्नेशियम हे एक खनिज आहे जे आपण खाल्लेले अन्न उर्जेमध्ये बदलण्यास मदत करते आणि हाडांचे आरोग्य वाढवते. NHS म्हणते की पुरुषांसाठी दररोज 300mg आणि महिलांसाठी 270mg मॅग्नेशियमची गरज आहे. हे प्रमाण निरोगी आहारातून मिळू शकते. पण, काही लोक मॅग्नेशियम पूरक आहार घेतात. मात्र, 400mg पेक्षा जास्त प्रमाणात मॅग्नेशियम घेतल्यास जुलाबाचा त्रास होऊ शकतो.जास्त वेळा मॅग्नेशियम घेतल्याने काय परिणाम होऊ शकतात हे सांगण्यासाठी पुरेसा पुरावा नाही.

Dark Chocolate
Weight Loss Tips: नाश्त्याला हे 5 पदार्थ खाऊ नका, वजन होईल कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.