चाळिशीनंतर अंडं खाणं योग्य का?

अंड्यांमध्ये मानवी शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात.
Egg Benefits After 40
Egg Benefits After 40
Updated on

अंडं प्रत्येक वयोगटाच्या लोकांना आवडते. अंड्यांमध्ये मानवी शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. पण विशिष्ट वयानंतर अंडं (Egg) खाण्याने शरीराला (Body) फायदा होतो का याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. २०१६ साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, वाढत्या वयाच्या तसेच वृद्ध लोकांनी निरोगी आणि संतुलीत आहार (Food) म्हणून अंडं खाल्ल्याने त्यांच्या स्नायुंची ताकद वाढते, तसेच ते अधिक कार्यक्षम राहतात. (Egg Benefits After 40)

Egg Benefits After 40
अंड की पनीर ! वजन कमी करण्यासाठी प्रोटीनचा सर्वोत्तम पर्याय कोणता? जाणून घ्या

अंड्यामध्ये सामाविष्ट असलेले घटक

अंडयामध्ये प्रथिन उत्तम प्रमाणात आढळतात. एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये 77 कॅलरीज, 0.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 5.3 ग्रॅम फॅट, 212 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 6.3 ग्रॅम प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी5, फॉस्फरस आणि सेलेनियम यांचा समावेश असतो. (Egg Benefits After 40)

Egg Benefits After 40
शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट
Egg
Egg sakal

चाळीशीनंतर अंडं खाल्ल्याने होणारे फायदे

चाळीशीनंतर तसेच वृद्धांमध्ये स्नायू बळकट करण्यासाठी अंडे खाणे चांगले मानले जाते. अंडं खाल्ल्याने चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. तसेच अंड्यात ल्युसीन, अमिनोचे लक्षणीय प्रमाण असते. स्नायूंच्या संश्लेषणासाठी महत्त्वाचे असलेले ऍसिड, तसेच व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडसह महत्त्वाची इतर अनेक पोषक तत्त्वे आहेत, त्याचा शरीराला फायदा होतो, असे एका अभ्यासात म्हटले आहे.आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चाळीशीनंतरच्या व्यक्तींनी आठवड्यातून किमान 7 अंडी खावीत. वृद्ध लोकांच्या शरीरात प्रथिने आवश्यक असतात. त्यांनी तर अंडी आवर्जून खाल्ली पाहिजे. (Egg Benefits After 40)

Egg Benefits After 40
झोपण्याआधी गाणी ऐकताय! सवय पडू शकते महागात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.