व्यायाम केल्यामुळे केस गळतायत का? कारणे-उपाय जाणून घ्या

अभ्यासानुसार, जास्त व्यायाम करणे हे केस गळण्याचे कारण असू शकते
Hair Fall After Exercise
Hair Fall After Exerciseesakal
Updated on

तंदूरुस्त राहण्यासाठी रोज अनेक लोकं व्यायामाला पसंती देतात. यासाठी योग, वॉक, जॉंगिंग करण्याकडे (Exercise) लोकांचा कल असतो. व्यायाम केल्याने वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तसेच मसल्स वाढविण्यासाठी मदत मिळते. पण वर्कआउट केल्यानंतर अनेकांचे केस गळायला (Hair Fall) लागतात. ही समस्या अनेकांना येते.

अभ्यासानुसार, जास्त व्यायाम करणे हे केस गळण्याचे कारण असू शकते. किंबहुना जास्त व्यायाम केल्याने शरीरात ताण निर्माण होतो. जो लोजन इफ्लुविअमच्या 2 मुख्य कारणांपैकी एक आहे. टेलोजन इफ्लुव्हियम ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये केसांची मूळं कमकुवत झाल्याने नेहमीपेक्षा जास्त केस गळतात. जे लोकं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचे या दरम्यान मोठ्या प्रमाणात केस गळतात. वजन कमी केल्यावर हा प्रकार तीन-ते चार महिन्यांनी सुरू होऊन ६ महिने टिकतो. या तात्पुरत्या केसगळतीचे मुख्य कारण हे शरीरावर अचानक येणारा ताण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Hair Fall After Exercise
चाळीशीनंतर १० मिनिट व्यायाम केल्यास व्हाल दिर्घायुषी! अभ्यासातील निष्कर्ष
exercise
exercisesakal

केस गळणे आणि व्यायाम

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, व्यायाम करताना असे होऊ शकते. हे प्रमाण तात्पुरते असते.. शरीरावरील ताण (Stress) कमी होताच, केस गळणे थांबते. केसांची वाढ पुन्हा सामान्यपणे सुरू होते. पण केस गळणे किंवा टेलोजन इफ्लुव्हियम तेव्हाच थांबेल जेव्हा केसांची वाढ रोखणारे घटक थांबतील. केसगळतीसाठी रासायनिक पदार्थांचा अतिवापर, केस गळणे, औषधांचा वापर, चांगला आहार न घेणे, अतिव्यायाम हे कारणीभूत आहेत.

Hair Fall After Exercise
व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं? जाणून घ्या
 Hair Fall
Hair Fall eskal

किती प्रमाणात केस गळू शकतात?

अमेरिकन अॅकडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, दररोज 50-100 केस गळणे सामान्य आहे. जेव्हा दररोज खूप केस गळायला लागतात, तेव्हा त्या स्थितीला वैद्यकीय भाषेत टेलोजन इफ्लुव्हियम म्हणतात. केस गळताना किंवा केस धुताना केस गळण्याचे प्रमाण वाढते तेव्हा टेलोजन इफ्लुव्हियम लक्षात येते. अशावेळी घरात सर्वत्र केस गळताना दिसतात. बेडवर किंवा उशीवर ते अधिक प्रमाणात दिसतात.

Hair Fall After Exercise
घरी व्यायाम करण्यासाठी 'ही' उपकरणे महत्वाची
Exercise
ExerciseeSakal

किती व्यायाम पुरेसा आहे

तज्ज्ञांच्या मते, झोपे येण्याची समस्या ( Sleep disorders), थकवा येणे(Fatigue, आवश्यकतेपेक्षा जास्त परिणाम मिळणे हे अतिव्यायामाचे परिणाम आहेत. जर एखाद्या व्यक्तीने भरपूर व्यायाम केला तर शरीराला चरबी जाळण्यास जास्त वेळ लागतो. जर एखाद्याचे नेहमीपेक्षा जास्त केस गळत असतील किंवा तशी लक्षणे दिसली तर त्याने कमी व्यायाम करावा, असे तज्ज्ञ सांगतात.

Hair Fall After Exercise
Hair Fall: हे 6 फूड्स खाण्याने गळतात केस
Hair Fall
Hair FallESakal

केस गळतीवर उपाय

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरेशा आहारासह दररोज 1 तासापेक्षा जास्त व्यायाम केल्याने केस गळणे ही सामान्य समस्या आहे. पण, तुम्हाला आठवड्यातून 5 दिवस आणि सुमारे 45 मिनिटे ते एक तास व्यायाम करणे आरोग्याासाठी चांगले आहे. तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे युक्त आहार घ्यावा. असे न केल्यास केस जास्त गळून समस्या आणखी वाढतात. व्यायाम करताना शरीरात चरबी - कर्बोदके बर्न होतात, त्यामुळे केस गळणे टाळण्यासाठी पुरेसा आहार घेणे अतिशय गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.