महत्त्वाचं संशोधन, ब्लड कॅन्सरवरील 'हे' औषध करू शकतं कोरोना रुग्णांना बरं ?

महत्त्वाचं संशोधन, ब्लड कॅन्सरवरील 'हे' औषध करू शकतं कोरोना रुग्णांना बरं ?
Updated on

मुंबई - कोरोनाच्या संक्रमणामुळे जगभरातील २०० पेक्षा अधिक देश  प्रभावित आहेत. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती भारतापेक्षा गंभीर आहे. तर इथं आपल्या देशात देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. अशात चिंतेची बाब म्हणजे अजूनही कोरोनावर १००% उपयोगी  पडेल असं औषध उपलब्ध नाही किंवा यावर कोणतीही लस आलेली नाही. यामध्ये समाधानाची एकच बाब म्हणजे कोरोनाच्या लक्षणांवर इतर औषधांद्वारे इलाज केला जातोय. कोरोनामुळे श्वसनाचा त्रास व्हायला सुरवात होते. यावर काही औषधांनी उपचार करून या त्रासाला कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.   

नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांच्यामते कॅन्सरसाठी वापरण्यात येणारं औषध वापरून कोरोनाचं शरीरात मोठ्या प्रमाणात होणारं संक्रमण रोखलं जाऊ शकतं. संशोधकांच्या मते ब्लड कॅन्सरवरील औषधांचा वापर करून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या श्वासाच्या त्रासाला कमी शकतं. याचसोबत रुग्णांच्या इम्यून सिटीमवर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीवर देखील नियंत्रण मिळवंल जाऊ शकतं असं संशोधक सांगतात. 
   
सायन्स इम्युनॉलॉजि जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात कॅन्सरसाठी वापरण्यात येणारं ऍकालाब्रुटीनिब (Acalabrutinib) रुग्णांमधील BTK प्रोटीन म्हणजेच म्हणजेच ब्रुटॉन टायरोसीन काईनेज याला ब्लॉक करतं. आपल्या शरीरातील रोगप्रतीकारक शक्तीमध्ये BTK प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावत असतं. ज्यामध्ये जेंव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती जास्त ऍक्टिव्ह होते. तेंव्हा हे प्रोटीन शरीरात रोगाचं संक्रमण रोखण्याऐवजी सूज येण्यास कारणीभूत ठरतं. आपल्या शरीरातील सायटोकायनिनमुळे असं होतं. या प्रक्रियेला मेडिकल भाषेत सायटोकायनिन स्टॉर्म असं देखील म्हणतात. या प्रक्रियेत BTK प्रोटीनचा देखील रोल असतो. म्हणूनच कॅन्सर औषधाच्या मदतीने शरीरातील या प्रोटीनला रोखलं जाऊ शकतं.      

संशोधकांच्यामते कोरोना रुग्णांच्या शरीरात सायटोकायनिन प्रोटीन जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती उलट्या पद्धतीने काम करण्यास सुरवात करते. ज्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होण्यास सुरवात होते. कोरोना रुग्णाचं अध्ययन केल्यावर एक महत्त्वपूर्ण माहिती देखील समोर आली. ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याचं आणि सूज वाढल्याचं निदर्शनात आलं  

यामध्ये संशोधकानी एक मोठा दावा केलाय. संशोधक म्हणतात कोरोनाच्या १९ रुग्णांपैकी ११ रुग्णांना दोन दिवस ऑक्सिजन दिला गेला. आठ रुग्णांना दीड दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. या रुग्णांना कॅन्सरवरील औषध दिलं गेलं. यामुळे या रुग्णाचा श्वासाचा त्रास कमी झाला आणि फुफ्फुसांवरील सूज देखील कमी झाली. ज्या ११ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवलेलं त्यांचा ऑक्सिजन काढून त्यांना डिशचार्ज देण्यात आला. 

उरलेल्या ८ रुग्णांना ज्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं त्यांच्यापैकी ४ रुग्णांना आराम मिळाल्यावर त्यांचं व्हेंटिलेटर हटवण्यात आलं. तर दोघांना डिशचार्ज देण्यात आला. दुर्दैवाने यांच्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ज्या दोघांचा मृत्यू झाला त्यांच्या ब्लड रिपोर्टनुसार त्यांच्या रक्तातील प्रोटीन इंटरल्यूकिन-6 चा स्तर वाढलेला आढळला. मात्र सूज येण्यास कारणीभूत ठरणारं हे प्रोटीन कॅन्सरवरील औषध दिल्यानंतर कमी देखील झालेलं आढळलं. 

कॅन्सरच्या या औषधांचा वापर अतिशय कमी रुग्णांवर झाला असल्याने या औषधांचा क्लिनिकल प्रॅक्टिससाठी वापर करण्यात येऊ नये असा सल्ला या प्रकाशित लेखात दिला गेलाय. 

research published in science immunology journal says Acalabrutinib medicine is helpful to cure covid patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.