नागपूर : कॅन्सर हा अत्यंत घातक आणि जिवघेणा रोग आहे. जगात दरवर्षी लाखो नागरिकांचा कर्करोगामुळे बळी जातो. कॅन्सर होण्यास अनेक घटक कारणीभूत असले तरी आपल्या आहारात ज्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो त्यापैकी काही खाद्यपदार्थ कर्करोगाला आमंत्रण देणारे असतात. नागरिकांनी असे पदार्थ सेवन करणे टाळणे आवश्यक असल्याचे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थतर्फे २०१९-२०२० साली केलेल्या सर्वेक्षणचा अहवाल प्रसिद्ध झाला आहेत. नागपुर जिल्ह्यात ४०.२ टक्के पुरुष तर आणि ५ टक्के महिला खर्रा तंबाखुचे सेवन करीत असल्याचे वास्तव पुढे आले होते. यामुळे आहारातून कॅन्सरचा धोका वाढवणारे पदार्थ बाद करावेत. मटण, बीफ, किंबहुना इतर काही लाल मांसाहाराचा आहारात समावेश असेल तर कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.
आहाराचे प्रमाण आणि आहारातील गुणवत्ता याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शरीरात कार्बोहायड्रेटस् आणि फॅटस् नैसर्गिकरीत्या तयार होतात; परंतु प्रोटिन्स तयार होत नाहीत. यामुळे प्रत्येकाच्या आहारात प्रोटिन्सची मात्रा कमी असतेच. प्रोटीन्ससह सर्व प्रकारची जीवनसत्त्वे असलेले पदार्थ रोजच्या आहारात असल्यास कॅन्सरच नाही, तर अनेक व्याधींना दूर ठेवता येत असल्याचे ठाम मत आहारतज्ज्ञ डॉ. रेणूका माईंदे म्हणाल्या.
असा असावा सकाळचा नाश्ता
राजगिरा, बदामयुक्त आहार
सफरचंद तसेच इतर फळे
ओट्स
ज्वारीचा पॅनकेक
उकडलेले अंडे
गव्हाचा शिरा
दुपारी, रात्रीचे जेवण
दुपारी आणि रात्रीच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. कारण हिरव्या पालेभाज्यांमधून भरपूर प्रमाणात लोह मिळते. तसेच विविध प्रकारच्या डाळी आणि अन्य कडधान्यांचा आहारात असणे गरजेचे आहे. सोबतच दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन यांचाही सुदृढ आरोग्यासाठी सेवन करणे आवश्यक आहे.
कॅन्सरचा धोका वाढवणारे पदार्थ
डालडा वनस्पती लोण्याचा आहारात अधिक प्रमाण
मटण आणि इतर लाल मांस
मैदा, पाव, टोस्ट, खारीसह बेकरीतील पदार्थ
प्रिझर्वेटिव्ह, ऍडिटिव्ह, चव वाढवणारे
बार्बेक्यू पदार्थातील चिकन टिक्का, कबाब, फिश टिक्का
कॅन्सरचा धोका कमी करणारे पदार्थ
मूंग मटकी चावली चन्ना
टोमॅटो, लाल भोपळा, सिमला मिर्च ,
पालक, मेथी पुदिना
मोसंबी संत्रा लिंबू, आवळा, अनार, अननस
अक्रोड, सूर्यमुखीच्या बिया
भोपळा, टरबुजाच्या बिया,जवस
ज्वारी बाजरी , रागी , बार्ली
''संतुलित आहाराची शरीराला गरज असते. ऋतूनुसार आहारात डाळिंब, पपईचा समावेश असावाच. प्रत्येक जेवणात कमीत कमी ४ तासाचे अंतर असावे. रात्रीचे जेवण उशिरा घेणे टाळा. जेवणानंतर दोन ते अडीच तासांनी झोपेसाठी जावे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी प्रथीनेयुक्त आहार घ्यावा.''
-डॉ. रेणूका माईंदे, आहारतज्ज्ञ, नागपूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.