शमिता शेट्टीचं ग्लुटेन फ्री डाएट माहितेय का?

शमिता शेट्टीचं ग्लुटेन फ्री डाएट माहितेय का?
Updated on

काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये शिल्पा शेट्टीची बहिणी शमिका शेट्टीला सायटिका असून ती ग्लुटेन फ्री डाएट घेत असल्याचं समोर आलं. डाएट हे वजन कमी करण्यासाठीच केलं जातं, असा आपल्याकडे समज आहे. पण तुम्हाला कुठला आजार असेल तर त्यावर नियंत्रण असावं म्हणूनही डाएट केलं जातं. या निमित्ताने शमिकाच्या ग्लुटेन फ्री डाएटची खूप चर्चा झाली.

कोलायटिसचा आजार

ज्या व्यक्तींना कोलायटिस असतो त्यांच्या आतड्याला सूज येते. यामुळे पचन व्यवस्थेवर परिणाम होऊन त्यालाही सूज, जखमा येऊ शकतात. कोलायटिसमध्ये पोटात कळा येणे, असह्य वेदना होणे, थंडी वाजणे, ताप येणे, जुलाबावेळी मोठ्या प्रमाणात रक्त पडणे अशासारखे त्रास होतात. त्यामुळे या आजाराचे रूप बघता डॉक्टर आणि आहारतज्त ग्लूटेन फ्री डाएटचा सल्ला देतात.

असे आहे डाएट

कोलायटिस रुग्णांना ग्लूटेन या आहार घटकाची अँलर्जी असते. आतड्यांच्या दाहाशी संबंधित आजार असलेले एकूण 65 टक्के रुग्णांना ग्लुटेन फ्री डाएट घेतल्याने बरे वाटते, असं तज्ज्ञ सांगतात.ग्लूटेन फ्री डाएट करताना गहू, गव्हाचे पदार्थ आणि ग्लूटेन असलेले इतर पदार्थ खाणं टाळलं जातं. त्याएे वजी भाज्या, कडधान्य, फळं, अंडी, मासे, स्टार्च आणि विविध पीठे आदींचा समावेश करावा. ग्लूटेन हे एक प्रथिनं असून ते गहू, राळे,ओटस यासारख्या पदार्थांमधे असल्याचे बंगलोरमधील ‘एस्टर सीएमआई हॉस्पिटल’मधील जेष्ठ आहार तज्ज्ञ एडविन राज सांगतात.डॉक्टरांच्या, आहार तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय ग्लूटेन डाएट सुरु केल्यास त्याने आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण होतात, असे एडविन सांगता.

अपायही आहेत

गुरुग्राम येथील ‘मणिपाल हॉस्पिटल’च्या आहार विभागप्रमुख डॉ. शलिनी ब्लिस यांनी सांगितले की, गव्हाचे पदार्थ कमी खाल्ले गेल्याने शरीरातील जीवनसत्व,खनीजं कमी होतात. तसेच आवश्यक तेवढे फायबर मिळत नाही. पण आजाराचे लक्षण कमी करण्यासाठी असे डाएट करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.