नागपूर : खांदा दुखणे ही एक सामान्य गोष्ट आहे. स्नायू गुंडाळण्यापासून ते विस्कळीत होण्यापर्यंत अनेक कारणे असू शकतात. खांदा दुखणे कधी कधी शरीराच्या इतर भागात जसे की मान, मधल्या मागे किंवा अगदी हृदयात उद्भवते. बहुतेक प्रकरणांमध्ये खांदा दुखणे थांबविण्यासाठी फक्त सामान्य ज्ञान आणि काही सोप्या घरगुती उपचारांचा वापर करणे पुरेसे असते. परंतु, काही इतर परिस्थितींमध्ये वैद्यकीय उपचार दिले जातात.
खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्यांचे दुखणे उद्भवू शकते. खांद्याच्या दुखण्यामुळे हातांच्या हालचालींवर मर्यादा येते. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात. व्यायामाने या वेदनांवर नियंत्रण मिळवता येते.
खांदे दुखण्याचे अनेक कारणे आहेत. या कारणांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा जीवनशैली, चुकीच्या पद्धतीने बसणे, झोपणे यामुळे खांद्यांचे दुखणे होतात. खांदा बराचकाळ दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका. खांद्यांमध्ये सूज, तीव्र स्वरूपाच्या वेदना, हात आणि खांद्यांमध्ये जाणवणारा अशक्तपणा, हातांमधल्या संवेदना जाणे, खांद्यांमध्ये हालचाल करताना त्रास होणे अशी लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांकडे जा. नेमके निदान करून त्यावर उपचार होणे आवश्यक असल्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
व्यायामामुळे स्नायू लवचिक होण्यास मदत
व्यायामामुळे स्नायू लवचिक व्हायला मदत होते. खांदे मागून पुढे फिरवणे, बालासन, खांद्यांचे स्नायू ताणणे, डंबेल्स उचलणे अशा व्यायामांमुळे लाभ होऊ शकतात. हे सर्व व्यायाम अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. शिवाय ते तुम्ही कुठेही करू शकता. हे व्यायाम नियमित केल्यामुळे वेदना कमी होतात.
खांद्याच्या दुखण्यावर उपाय
नियमत व्यायाम करा
खांदेदुखीला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी टाळा
खांद्यांमध्ये दाह जाणवत असेल तर दाह कमी करणारी औषधे घ्या
हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, ऑलिव्ह ऑईल, मासे, स्ट्रॉबेरी, संत्री, ब्लूबेरी अशी फळांचा आहारात समावेश करा
खांदेदुखी तीव्र स्वरूपाची नसेल तर गरम आणि गार पाण्याचा शेक देता येईल
सूज व दुखणे बर्फाच्या शेकाने कमी होऊ शकते
सौम्य मालीश दुखणे बरे करण्यास मदत करू शकते
खांद्याच्या वेदना व सुजेवर औषधांद्वारे (ओवर द काऊंटर) आराम मिळू शकतो
जड वस्तू खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणे टाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.