दातांच्या दुखण्यामुळे रात्रीची झोप येत नाही, जाणून घ्या उपचारासाठी घरगुती उपाय

दातांमधील पोकळीमुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे दात दुखतात
Remedies for Toothache
Remedies for Toothacheesakal
Updated on

दातदुखी ही एक सामान्य समस्या असू शकते, जी थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने, शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, दातांमधील पोकळीमुळे किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे अनेकदा त्रास होऊ शकतो. अनेक वेळा मध्यरात्री दातांचे तीव्र दुखणे सहन करणे कठीण होऊन बसते. दिवसभराची गोष्ट असेल तर तुम्ही लगेच जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊ शकता, परंतु अनेक वेळा रात्रीच्या वेळी भयंकर वेदना होऊन डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही, त्यामुळे जाणून घ्या हे घरगुती उपाय. रात्री किंवा दिवसाही तीव्र वेदना झाल्यास, या गोष्टी वापरल्यास आराम मिळू शकतो. (Remedies for Toothache)

या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता:

लसूण

मेडिकल न्यूज टुडेनुसार, लसूण घरांमध्ये सहज उपलब्ध आहे. लसणात असलेले एलिसिन तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यात प्रभावी आहे. बॅक्टेरियामुळे तोंडात पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळे दातदुखी होऊ शकते. दात दुखत असल्यास लसणाची एक पाकळी दाताच्या मध्ये ठेवल्यास आराम मिळतो.

कोल्ड कॉम्प्रेस

कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे बर्फ लावल्याने रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि वेदना कमी होतात. जाड टॉवेलमध्ये बर्फ टाकून दुखणाऱ्या भागावर दाबून ठेवल्यानेही आराम मिळतो.

Remedies for Toothache
महिनाभर ब्रश न केल्यास काय होईल?

पुदिन्याचा चहा

पुदिन्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यात असलेले मेन्थॉल संवेदनशील भागाला काही काळ सुन्न करते, ज्यामुळे वेदना कमी होतात. वेदना झाल्यास तुम्ही पुदिन्याचा चहा पिऊ शकता.

लवंगा

लवंगमध्ये युजेनॉल असते जे दातांची जळजळ कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दात दुखत असल्यास लवंग बारीक करून लावू शकता किंवा लवंग दातांच्यामध्ये धरु शकता.

Remedies for Toothache
Dental Care : दात चांगले ठेवायचेत तर हिरड्या जपा! अशी घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.