शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरील उपचारासाठी ॲन्टी स्नेक व्हेनम (Antisnake Venom Dose) ही पावडर असते. ती विशिष्ठ पाण्यात घालून जखमीला द्यावी लागते.
कोल्हापूर : सर्पदंशाच्या घटना बारमाही घडतात. मात्र, तालुक्यातील एखाद्या गावात सर्पदंश झाला की तिथून रुग्णवाहिकेतून जखमीला सीपीआर आणले जाते. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) ॲन्टीस्नेक व्हेनमसाठा कमी आहे, डॉक्टर नाहीत, आयसीयूला वीजपुरवठा नाही आदी कारणे दिली जातात.
यात गंभीर जखमीला जीवघेणा १० ते ७० किलो मीटरचा प्रवास करावा लागतो. यातून आठवड्याला एक दोन जखमींचा जीव जातो. याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरील उपचारासाठी ॲन्टी स्नेक व्हेनम (Antisnake Venom Dose) ही पावडर असते. ती विशिष्ठ पाण्यात घालून जखमीला द्यावी लागते.
विषाची तीव्रता किती आहे यावर त्याचे प्रमाण ठरते. मात्र, तोच साठा कमी आहे. कोल्हापुरात उपचार होतील, असे सांगून जखमीला सीपीआरला पाठवले जाते. साप चावल्यानंतर त्या जखमीवर ग्रामीण शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार का होत नाही, याचा जाब विचारत नसल्याने बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सर्पदंशावरील उपचारात बेफिकीरी वाढल्याचे दिसते.
सीपीआरला वार्षिक निधी सरासरी पाच ते सहा कोटी रुपये येतो, त्यातील सर्पदंश उपचारावर एक कोटी रुपये खर्च होतो यातून सीपीआरमध्ये रोज किमान १० ते १५ जखमी येतात. यातील सात ते आठ जखमी ग्रामीण भागातील असतात. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पातळीवर उपचार होणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील सर्व शासकीय रुग्णालयात जखमी ॲडमीट झाला तर उपचारापासून ते पोलिस चौकशीपर्यंतच सोपस्कर करावे लागतात.
त्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसतात. कर्मचारी जबाबदारी घेत नाहीत. अशा वेळी जखमींची अवस्था गंभीर, असा शेरा देऊन जखमीला सीपीआरला पाठवून जबाबदारी संपवली जाते. विषारी सर्प चावलेल्या गंभीर जखमीवर एमडी, एमएस डॉक्टर उपचार करू शकतात, त्यासाठी ‘ॲन्टी स्नेक व्हेनम’ देणे, २४ तास निगराणी खाली ठेवणे, त्यासाठी आयसीयू, आक्सिजन मॉनिटर व व्हेन्टीलेटर अशा साधनांची गरज असते.
कोरोना काळात अशा सुविधा बहुतेक सर्व तालुक्यात शासकीय रुग्णालयात झाल्या असूनही जखमी कोल्हापूरला पाठवला जातो. याचा अर्थ ही साधने नादुरुस्त आहेत, डॉक्टर जागेवर नाहीत किंवा डॉक्टर व साधन सामुग्री आहे. पण, ती वापरण्याचा आळस दिसतो.
बिनविषारी साप चावल्याची खात्री झाल्यास ग्रामीण शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार होतात. मात्र, विषारी साप चावल्यास सीपीआरला पाठवले जाते. यात प्रवासात कमीत कमी अर्धा तास ते एक तास जातो. यात गुंतागुंतीचे आजार किंवा व्यसनाधीन व्यक्तीला विष भिनल्यास त्याची प्रकृती अधिक गंभीर बनते. पुढे उपचाराला येईपर्यंत, तर काहींचा उपचार सुरू असताना मृत्यू होतो, तर अनेकजण उपचारातूनही बरेही होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.