सोशल मीडियाच्या अतिवापराचा अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

अनेक अल्पवयीन मुलं आता सोशल मीडियावर पडीक असतात
teenager
teenageresakal
Updated on

व्हॉटसअप (whatsapp ) फेसबुक (facebook), इंस्टाग्राम(instagram), अशा सोशल मिडियावर अल्पवयीन मुलं (TeenAgers)खूप वेळ घालवू लागली आहेत. काही तर खेळण्यासाठी दिवसभर फोनचा वापर करतात. मुलं सतत ऑनलाइन असल्याने पालकही वैतागले आहेत. अनेक पालक याविषयी मी काय करू असा सल्ला डॉक्टरांना विचारत आहेत. मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा प्रश्न परवलीचा झाला आहे. कारण अनेक अल्पवयीन मुलं आता सोशल मीडियावर पडीक असतात. त्यामुळे ती जगाशी जोडली जातात. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की जे अल्पवयीन मुले सोशल मीडियाचा अति प्रमाणात वापर करण्याचे कारण म्हणजे, एकतर ती कंटाळलेली असतात, त्यांना तात्काळ शारीरिक वातावरणातून बाहेर पडण्याची गरज असते. ती तणावग्रस्त, एकटी असतात. काहींना सतत त्यांचे कौतुक व्हावे असे वाटते.

सोशल मीडियावर किती वेळ घालवावा

अभ्यासात असे आढळून आले आहे की सोशल मीडियाचा 30 मिनिटांचा वापर एखाद्या व्यक्तीच्या मूडला चालना देतो. तर दिवसांतून दोन तासांपेक्षा जास्त काळ सोशल मीडिया वापरल्याने नैराश्याची लक्षणे दिसण्याचा धोका वाढू शकतो. सोशल मीडियाचे अनेक फायदे जरी असले तरी ते वापरण्याची मर्यादा हवीच.

teenager
मुलांना ओमिक्रोनपासून कसं दूर ठेवायचं? पालकांच्या प्रश्नाला डॉक्टरांनी दिले उत्तर
social media
social mediaesakal

सोशल मीडियाचे व्यसन लागल्याचे कसे ओळखाल?

१) जर एखादी व्यक्ती कायम सोशल मीडियाबद्दल बोलत असेल, तोच विचार करत असेल.

२) दिवसातले अनेक तास सोशल मीडियावर घालवत असेल.

३) आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष, वेळ देण्याऐवजी सोशल मिडीयावर वेळ घालवत असतील.

४) जर ते काही कारणासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकले नसल्यास चिडचिड करत असतील,

५) जर ते सोशल मीडियावर कनेक्ट न राहिल्यास "जीवन" संपल्यासारखे वाटते, अशी भिती त्यांना वाटत असेल.

६) सततच्या वापरामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला असेल.

७) घरात तुमचे एकमेकांशी बोलणे चालू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून सोशल मीडिया बघत असेल. अशी अनेक कारणे असू शकतात.

teenager
स्त्रियांना पुरूषांपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक, जाणून घ्या कारणे
teenage
teenageesakal

मर्यादा हवी

सोशल मीडिया मर्यादेत वापरणे नेहमीच चांगले . सोशल मीडिया मेंदूतील सेरोटोनिन आणि इतर चांगली रसायने वाढवण्यास मदत करू शकते. तुम्ही एक बघा, बहुतेक लोक सेल्फी क्लिक करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. जेव्हा लोक त्यांची पोस्ट लाइक करून त्यावर कमेंट करतात तेव्हा त्यांना खूप चांगले वाटते. मात्र त्याची सवय लागली की समस्या निर्माण होते. बर्याच लोकांना दिवसातून अनेक वेळा स्वतःचे फोटो पोस्ट करावेसे वाटतात. याबाबत सायकोथेरेपिस्ट डॉ. विहान सन्याल यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

जागतिक स्तरावर अनेक अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाद्वारे कॉल करून छळले जाते, त्यांचा पाठलाग करून धमकावणे आणि फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे या मुलांच्या मानसिक आरोग्य समस्या आणि मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.

एखाद्या किशोरवयीन मुलास कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीचा सामना करावा लागल्यास, त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, तसेच एखाद्याने निगेटिव्ह कमेंट केली तर त्या धक्क्यामुळे एखाद्या मुलाचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास डळमळू शकतो.सोशल मीडियाचा अति वापरामुळे आणि चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, एडीएचडी, पॅरानोईया, भ्रम, आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचविणे आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.

teenager
Insomnia: झोप लागत नाही? 'या' व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

पालकांनी काय करावे ?

१) सोशल मीडियाच्या अतिवापराने काय समस्या निर्माण होतात याची पालकांनी मुलांना स्पष्ट कल्पना द्यावी. तुम्हाला त्यांच्या आरोग्याची, भविष्याची काळजी आहे,याची त्यांना सतत आठवण करून देत राहा.

२) त्यांच्या दिवसाचे नियोजन करून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुलं पालन करत आहेत का ते बघा.

३) दिवसा- रात्री वेगवेगळ्या वेळी मोबाइल वापरायचा नाही हे धोरण सेट करा. तुम्हीही जेवणाच्या वेळी, टीव्ही पाहताना, कौटुंबिक वेळेत आणि रात्री झोपताना त्याच्याबरोबर वेळ घालवून मोबाईलचा वापर टाळा.

४) ना नवीन छंदात सहभागी करून घ्या.

५) मुलांसाठी आदर्श ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः सोशल मीडियाचा कमी वापर करा.

६) मानसिक आरोग्य समुपदेशानासाठी लवकर तज्ज्ञांची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.