गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे सर्वाना ग्रासले आहे. त्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी मास्क (Mask) वापरणे गरजेचे झाले आहे. मास्क आता लोकांच्या सवयीचा तसेच जगण्याचा (Lifestyle) भाग झाला आहे. पण जास्त वेळ मास्क लावल्याने अनेकांना आरोग्याच्या (Health) समस्याही भेडसावत आहेत. त्यावर आता मार्ग मिळण्याची शक्यता आहे.
कोरियन कंपनीने बनवला नवा मास्क
काही लोकांना जास्त वेळ मास्क घातल्याने श्वसनाशी संबंधित तक्रारी निर्माण होत आहेत. तसेच खाण्या-पिण्यादरम्यान मास्क घालता येत नाही. हे पाहता दक्षिण कोरियातील (South Korea) एका कंपनीने वेगळा मास्क तयार केला आहे. त्याच्या डिझाईनमुळे या मास्कची जगभरात चर्चा होते आहे. दक्षिण कोरियन कंपनी अॅटमन (Atman) ने हा मास्क तयार केला आहे. हा मास्क घातल्यावर नाक झाकले जाते.मात्र तोंड उघडे राहते. त्यामुळेच याचे नाव 'Ksok' ठेवण्यात आले आहे. हा मास्क नेहमीच्या मास्कप्रमाणेही वापरता येऊ शकतो. तुम्हाला वाटेल तसा तो वापरू शकता. पण, फोल्ड केल्यावर मास्क फक्त नाकावर राहतो.
श्वास घेण्यासाठी फायद्याचा
मास्क फक्त नाकावरच लावता येत असल्याने जेवताना-पाणी पितानाही हा मास्क वापरता येईल. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, त्यांच्यासाठी हा मास्क फायद्याचा आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या मास्कला 'Kosk’ असे नाव देण्यात आले आहे. कारण 'कोस्क' हा शब्द कोरियामध्ये नाकासाठी वापरला जाणारा 'को' या शब्दावरून आणि मास्कमधील 'स्क' हा शब्द एकत्र करून तयार केला आहे. तुम्हाला हा मास्क विकत घ्यायचा असेल तर तो अनेक ऑनलाईन शॉपिंग फ्लॅटफॉर्मवर खरेदी करू शकता. या मास्कला KF80 टॅग दिला गेला आहे. कारण यामध्ये फिल्टरसाठी K कोरियन आणि F हे शब्द वापरले आहेत. मास्क, 0.3 मायक्रॉन कण 80% कार्यक्षमतेने फिल्टर केले जाऊ शकतात, असा कंपनीने दावा केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.