चेतना तरंग : सुख-दुःख आणि कर्म

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar
Updated on

तुम्ही त्यांना जास्त सहानुभूती दाखवता, त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करता, मग ते तुमचे लक्ष खेचून घेतात. तुम्ही दया भावनेने त्यांच्याकडे आणखीन लक्ष द्यायला लागता. परंतु, शेवटी अशी स्थिती येते, की तुमची दयार्द्रता आणि सहानुभूती यांचा काही उपयोग होईनासा होतो आणि उगीचंच ताणतणाव वाढायला लागतात. ‘‘तो बिचारा माणूस इतका अस्वस्थ झाला आहे, त्याला काही करून मला यातून बाहेर काढायला हवं आणि आनंदी करायला हवं.’’ कोणाला आनंदी बनविणे हे सोपे काम नाही, उलट त्याचे आपल्यावर फार मोठे दडपण येते. हे करण्याचा अजिबात प्रयत्न सुद्धा करू नका. हे नवीन धोरण लक्षात ठेवा. कोणाला आनंदी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते शक्य नाही.

‘कष्ट्स्य सुखस्य नाकोपी दाता’ अशी संस्कृतमध्ये एक म्हण आहे. कोणीच कोणाला आनंदी बनवत नाही किंवा दु:खी बनवत नाही. जो तो आपल्या कर्मानी सुख दु:ख भोगत असतो. कोणी नुसते जरी म्हणाले, ‘मला एक समस्या आहे,’ तरी त्याला लगेच म्हणा, ‘तुझा प्रश्न तू सोडव.’ असे म्हणून दुसऱ्या दिशेने तिथून काढता पाय घ्या. या तऱ्हेने वागल्यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्ही कोणत्या पाशात न अडकता अलिप्त होता.

आधीपासून या मार्गावर वाटचाल करणाऱ्या तुमच्यासारख्या सगळ्या साधकांना हे मला खास करून सांगावयाचे आहे. ‘ज्याचे त्याचे प्रश्न त्यांनी सोडवायचे आहेत मी त्यापासून अलिप्त आहे.’ हे मनावर ठसवा. तुमच्या गाडीत जागा असेल तर तुम्ही त्यांना जरूर मदत करा, इथे दयाळूपणा आवश्यक आहे. लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधूनमधून दयाळूपणा आवश्यक असतो. ज्यांना तुम्ही अजिबात ओळखत नाही त्यांना दया दाखवा. विरक्तीची ओढ सतत मनात जागवा. तुमचे मनच इतरांच्या काळज्यांमुळे, ताणतणावांमुळे, दु:खामुळे झाकोळून गेल्यास तुम्ही काय कराल? कुठे जाल? अशा परिस्थितीत तुमचे काय होईल? तुम्ही मुळापासून हादरून जाल. म्हणून हे सर्व पाश तोडून टाका, ही जाळी उद्ध्वस्त करा आणि फक्त ईश्वराशी नाते जोडा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘गुरुजींनी माझ्याकडे बघितले नाही, म्हणजे ईश्वरच माझ्यावर कोपला आहे,’’ असे कधी म्हणू नका. प्रत्येक गोष्ट प्रसाद म्हणून स्वीकारा. मग लाथा खाव्या लागल्या, तरी प्रसाद म्हणून स्वीकारा. कोणी ओरडल्यास तो प्रसाद समजून ऐकून घ्या. मिळालेली प्रत्येक गोष्ट प्रसाद समजून स्वीकारा. असा दृष्टिकोन सगळ्यात चांगला, म्हणजे ताणतणाव निर्माण होणार नाहीत...

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.