संध्याकाळी केलेला व्यायाम Blood Sugar Level कमी करण्यासाठी फायद्याचा! अभ्यासात माहिती

मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील काही शास्त्रज्ञ यावर अभ्यास करत आहेत.
evening exercise
evening exercise esakal
Updated on

व्यायाम करण्यासाठी वेळ अशी नसतेच. पण आपण व्यायामासाठी जर योग्य वेळ निवडली तर ती शरीरासाठी (Body) खूप फायद्याची ठरते. जे लोकं सकाळी लवकर उठतात त्यांच्यासाठी सकाळचा व्यायाम (Exercise)अतिशय चांगला असतो. पण जे संध्याकाळी मोकळे असतात ते संध्याकाळी व्यायाम करण्यावर भर देतात. पण व्यायामाची योग्य वेळ कोणती असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वेगवेगळी उत्तरे मिळतात. अनेक लोकांना व्यायाम नक्की कधी करावा असा प्रश्न पडतो. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार न्यूयॉर्कमधील काही शास्त्रज्ञांनी गेली तीन वर्ष यावर अभ्यास केला आहे. या अभ्यासात, सकाळच्या व्यायामामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात फॅट कमी झाल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तर, रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) कमी करण्यासाठी संध्याकाळी केलेल्या व्यायामाचा फायदा होतो, असा निष्कर्ष अभ्यासातून निघाला आहे.

evening exercise
आनंद महिंद्रांचा फिटनेस फंडा माहितेय का? या चार गोष्टींवर देतात भर
Exercise
Exercise

अभ्यासातील निष्कर्ष

२०२० साली झालेल्या अभ्यासानुसार, टाईप २ मधुमेहामुळे त्रस्त असलेल्या लोकांनी दिवसातून तीन वेळा व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी झाली. जेव्हा याच लोकांनी दुपारी आणि संध्याकाळी व्यायाम केला तेव्हा त्यांच्या रक्तातील साखर आणखी कमी झाली होती. शास्त्रज्ञांनी केलेला हा अभ्यास मानवी गट आणि उंदरांवर आधारित आहे. मिनेसोटा युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर लिसा चाऊ सांगतात की, हा अभ्यास अजून सुरू आहे. अशा परिस्थितीत दिवसा व्यायाम करा.

evening exercise
सकाळ, संध्याकाळच्या व्यायामाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम! अभ्यासात झाले स्पष्ट
Exercise
Exerciseesakal

पेशी दिवसा- रात्री वेगवेगळ्या काम करतात

प्रो.लिसा चाऊ यांच्या मते, शरीरातील पेशी दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. प्रत्येक वेळी शरीरातील चयापचय क्रिया वेगळी असते. जगभरातील शास्त्रज्ञ याचा अभ्यास करत आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासात व्यायामाचाही समावेश करण्यात आला होता.

evening exercise
Benefits Of Evening Exercise : संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.