माठातून पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे! आयुर्वेदानुसार महत्व वाचा!

फ्रिजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात
Potter water benefits
Potter water benefits
Updated on

उन्हाळ्यात अनेकजण माठातून पाणी पिणे पसंत करतात. माठातले थंडगार पाणी पिऊन तुमची तहान भागते. शिवाय निरोगी राहण्यासाठीही मदत मिळते. आयुर्वेदानुसार माठातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे.. माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे असे म्हणतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल, तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात. तर माठातले पाणी तुम्हाला निरोगी ठेवते. हे पाणी प्यायल्याने आरोग्याला ६ फायदे होतात.

Potter water benefits
उन्हाळ्यात प्या Detox Drink| Summer Health
सर्दी
सर्दीesakal

होतात ६ फायदे

१) माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल्स, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो. पण माठातले प्यायल्याने दुखणार नाही. त्यामुळे माठातले पाणी पिउन गळ्याला आराम मिळेल.

२) उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते. माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्त्वे मिळतात. उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो.

Potter water benefits
Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे
बीपी .
बीपी .

३) गॅसच्या समस्येपासून आराम- माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच ते प्यायल्याने गॅससारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

४) रक्तदाब राहतो नियंत्रणात- माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते.

Potter water benefits
उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे
सनस्क्रीन:
सनस्क्रीन:

५) त्वचेच्या समस्या होतात दूर- माठातले पाणी प्यायल्याने त्वचेशी संबधित समस्या दूर होतात. फोड, मुरुम आणि मुरुमांपासून आराम मिळतो. तसेच त्वचाही चमकदार होते.

६) विषयुक्त पदार्थांपासून राहता दूर- मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असतो. माती विषारी द्रव्ये शोषून घेते. त्यामुळे तुम्ही आजारापासून वाचता. म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी माठातले पाणी प्यावे.

Potter water benefits
उसाचा रस प्या, उन्हाळा सुसह्य करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()