ओमिक्रॉनची ७ लक्षणं, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Symptoms
Omicron Symptomssakal
Updated on

मुंबई : देशात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या (India Omicron Cases) वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण (Maharashtra Omicron Cases) आहेत. ओमिक्रॉनची लक्षणं सौम्य (Omicron Symptoms) असल्याचं सांगितलं जातं. पण, गेल्या तीन आठवड्यात रुग्णांना नेमकी कोणती लक्षणं आढळून आलीत? याबाबत महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे (Maharashtra Covid Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी माहिती दिली आहे.

Omicron Symptoms
Omicron : केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स; सीटी स्कॅनबाबत रुग्णांना सल्ला

देशात डिसेंबर महिन्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आला. त्यानंतर महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला. एका महिन्यातच ओमिक्रॉनच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या देखील वाढत आहे. पण, या रुग्णांना सौम्य लक्षण आढळून येत असल्याचं आतापर्यंत सांगण्यात आलं.

ओमिक्रॉन रुग्णांमध्ये कोणती लक्षणं? -

गेल्या तीन आठवड्यात सापडलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांना घशात दुखणे, घसा खवखवणे किंवा जळजळ होणे, ताप येणे, डोकेदुखी किंवा अंगदुखी, अधूनमधून खोकला येणे, नाक वाहणे, मळमळ वाटणे, आदी लक्षणं आढळून आली. महत्वाचं म्हणजे कोरोना दोन्ही व्हेरियंटप्रमाणे यामध्ये देखील २ ते ५ दिवसांपर्यंत सतत थकवा जाणवला, असं शशांक जोशी यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय? -

देशात ओमिक्रॉनचे २६३० रुग्ण आहेत. त्यापैकी ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात ७९७ इतके आहेत. राज्यात मुंबईमध्ये ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १५१६६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तिघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी नव्या १४४ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले असून मुंबईत शाळा-महाविद्यालय बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबईत काही दिवसात ओमिक्रॉनची लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.