Weight Loss : रोज घ्या एक कप ड्रमस्टिकचा चहा; काही दिवसांतच व्हाल सडपातळ

Take a cup of drumstick tea daily In a few days you will be slim Nagpur news
Take a cup of drumstick tea daily In a few days you will be slim Nagpur news
Updated on

नागपूर : दहा पैकी प्रत्येकी पाच माणसे तरी वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असतात आणि या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ते विविध उपाय सुद्धा वापरत असतात. तुम्हाला माहीत आहेच की वजन वाढीच्या समस्येला चुकीची आहारशैली कारणीभूत असते. सध्या पौष्टिक आहार सोडून चटपटीत आहार खाण्याकडे लोकांचा कल असतो आणि त्याचेच परिणाम वाढत्या वजनाने भोगावे लागतात. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय उपाय करतात. तुम्ही देखील त्याच प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी....

वजन कमी करण्यासाठी लोक बऱ्याच गोष्टी खाणं सोडून देतात. पण आहार घेत असताना आपण विशेषत: फळांचे सेवन वाढवितो आणि मग विचार करतो की दुसऱ्या दिवशी वजन कमी होईल. पण असे होत नाही. शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. तरीही तुमचे वजन कमी झाले तर नसेल तर आम्ही घेऊन आलो आहे एक सोपा उपाय. चला तर जाणून घेऊया या उपायाबद्दल...

कोणाच्याही स्वयंपाकघरात मोरिंगा किंवा ड्रमस्टिक आढळते. ही एक औषधी वनस्पती आहे. चव वाढविण्यासाठी आपण बऱ्याचदा आपल्या अन्नामध्ये याला समाविष्ट करीत असतो. ड्रमस्टीक्स वजन कमी करण्यासाठी प्रभावी समजले जाते. हा वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय देखील मानला जातो. याचा वापर शरीराची चरबी कमी करण्यासाठी करू शकतो. ड्रमस्टिक पावडरचा उपयोग सकाळचा चहा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्यामुळे वजन कमी होऊ शकते.

वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु, हा नैसर्गिक उपाय आपल्याला इतर बरेच आरोग्य फायदे देखील देऊ शकतो. वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि दमा व्यवस्थापित करण्यास मदत करू शकते. मोरिंगा म्हणजे ड्रमस्टिकमुळे चरबी कमी होण्यास मदत होते. 

अशी तयार करा ड्रमस्टिक चहा

ड्रमस्टिक पावडरचा उपयोग सकाळचा चहा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा अत्यंत पौष्टिक चहा आहे. आपण काही मिनिटांत घरी सहजपणे तयार करू शकतो. सर्वांत अगोदर ड्रमस्टिक पावडर घ्या आणि एक किंवा दोन कप पाण्यात उकळा. मिश्रण गाळा आणि सकाळ चहा म्हणून खा. ड्रमस्टिक चहा आरोग्याच्या इतर समस्या व्यवस्थापित करण्यात मदत करू शकते. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करणे आपल्यास अवघड जाते. मात्र, ड्रमस्टिक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ड्रमस्टिक चहा घेतल्यास मूत्रात साखर आणि प्रोटीनचे प्रमाण कमी होते. रक्तातही कमी ग्लुकोज तुम्हाला दिसेल.

उच्च रक्तदाब करतो कमी

उच्च रक्तदाब ही सामान्य समस्या झाली आहे. परंतु, उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. कारण, ते हृदयविकारासाठी करणीभूत ठरू शकते. तुम्ही ड्रमस्टिक चहाद्वारे रक्तदाब कमी करू शकता.

दमा व्यवस्थापित करण्यात करते मदत

दम्याचा रुग्ण दमाची तीव्रता कमी करण्यासाठी ड्रमस्टिक चहादेखील वापरू शकतो. सकाळच्या रूटिंगमध्ये ड्रमस्टिक चहा समाविष्ट करू शकता आणि दमा व्यवस्थापित करू शकता.

चांगल्या पचनासाठी उपयुक्त

ड्रमस्टिक चहाद्वारे पाचनाची समस्या सुधारता येते. तसेच आरोग्य सुधारेल. आतड्याच्या चांगल्या आरोग्याबरोबरच आरोग्याच्या इतर समस्या कमी करण्यातही मदत होते.

त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते

ड्रमस्टिक चहाच्या मदतीने चांगले पचन आणि एकंदरीत आरोग्य आणि त्वचेच्या आरोग्यास चांगले योगदान देईल. हे आपल्याला त्वचेच्या विविध आजार आणि संक्रमणाशी लढण्यासाठी मदत करू शकते. याचं नियमित सेवन केल्याने दिवसेंदिवस निरोगी व चमकणारी त्वचा मिळेल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()