Dentition Diarrhea
Dentition Diarrheaesakal

Health News : निसर्गानं दाताची निर्मिती केलीये, दात दागिना मानावा का?

मानवी जीवनात (Human life) दात दोनवेळा येतात.
Published on
Summary

मानवी जीवनात (Human life) दात दोनवेळा येतात. प्रथम बाळाच्या वयाच्या साधारण एक वर्ष कालावधीमध्ये दात येतात ज्याला दुधाचे दात म्हणतात. त्यानंतर साधारण वयाच्या सातव्या वर्षी हे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी येतात.

-डॉ. विश्वजित मानकर ,रत्नागिरी

दाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जे अन्न खातो त्याचे चरवण दाताद्वारे (Teeth) केले जाते. हे चरवण जर नीट झाले तर अन्नपचनाची प्रक्रिया व्यवस्थित होते. त्यासाठी निसर्गाने दाताची निर्मिती केली आहे. खाल्लेल्या अन्नाचे चरवण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासोबत दात हे सौंदर्याचे ही प्रमुख चिन्ह आहे.

मानवी जीवनात (Human life) दात दोनवेळा येतात. प्रथम बाळाच्या वयाच्या साधारण एक वर्ष कालावधीमध्ये दात येतात ज्याला दुधाचे दात म्हणतात. त्यानंतर साधारण वयाच्या सातव्या वर्षी हे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी येतात. वयाच्या पंचविशीनंतर अक्कलदाढा येतात. दात हिरडीबाहेर येण्याची प्रक्रिया आणि त्या योगे उद्भवणारी रोगलक्षणे याचा आपण प्रथमतः विचार करू. सुरवातीचे दात हिरडीबाहेर येताना एक अस्वस्थ करणारी गोष्ट घडत असते आणि त्यामध्ये हाताला जे मिळेल ते तोंडात टाकून चावण्याची इच्छा होते.

Dentition Diarrhea
Health News : पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असतं!

चांगले, वाईट न कळण्याच्या त्या वयामध्ये पोट बिघडवणारी आणि न पचणाऱ्या वस्तू मुले चघळतात आणि त्यामुळे पोट बिघडून जुलाब लागतात. याला डेंटिशन डायरिया (Dentition Diarrhea) म्हणतात. अशा प्रकारच्या डेंटिशन डायरियासाठी होमिओपॅथीमध्ये स्वतंत्र औषधयोजना आहे. निरनिराळ्या दंतरोगांचे आपण विवेचन करू. बहुतांशी लोकांना भेडसावणारा दंतरोग म्हणजे दात किडणे. होमिओपॅथी शास्त्रामध्ये याचा सखोल विचार केला जातो. उदाहरणार्थ, दात किडत असताना ते दातांच्या कडांमधून खराब व्हायला सुरवात होते किंवा दातांच्या मधल्या भागातून चिरून खड्डा पडतो.

Dentition Diarrhea
Dental Implant : आता तिसऱ्यांदा दात मिळणे झाले शक्य

त्यानुसार औषध (Medicine) बदलते, यासोबत आणणारे मुख्य लक्षण म्हणजे किडलेल्या दातांमधील वेदना. या वेदना कशा स्वरूपाच्या आहेत. उदा. ठणके मारतात, टोचल्यासारखे दुखते, दातांमधील वेदना तोंडामध्ये थंड पाणी घेतले असता अथवा गरम पाणी घेतले असता शमतात, थंड हवा लागली असता वेदना शमतात अथवा वाढतात. वेदना वाढण्याचा आणि कमी होण्याची स्वतंत्र अशी वेळ आहे का?दातावर दात दाबले असता अथवा बोटांचा दाब दुखऱ्या दातावर दिला असता वेदना कमी होतात अथवा वाढतात या बाबींचा साकल्याने विचार होमिओपॅथी शास्त्रामध्ये केला जातो.

कधी कधी हिरड्यांमधील दाह दातांच्या दुखण्याला कारणीभूत ठरतो. दंतरोगामध्ये केवळ दाताचा रंग बदलणे उदा. दात पिवळे होणे, काळपट होणे, दातावर पांढरे ठिपके येणे अशा लक्षणांसाठी होमिओपॅथीमध्ये बदललेल्या रंगानुसार स्वतंत्र औषधयोजना आहे आणि अत्यंत प्रभावीपणे त्याचा परिणाम होऊन रुग्णाला कोणत्याही बाह्यउपचाराशिवाय दाताना पूर्व नैसर्गिक रंग प्रदान केला जाऊ शकतो. दंतरोगामध्ये आणखी एक दंतरोग की, ज्याला इतरत्र सामान्यपणे औषधांची मर्यादित उपाययोजना अस्तित्वात असलेली दिसते ते म्हणजे दात अकाली (तारुण्यावस्थेत) हिरडीतून सुटून दात पडण्याची प्रक्रिया, हिरडीचे विकार आणि इतर लक्षणांच्या माध्यमातून होमिओपॅथी औषधयोजनेद्वारे हिरड्या निरोगी करून दातांची मुळे पुन्हा घट्ट करून अकाली दात पडण्याची समस्या सोडवणे शक्य आहे.

Dentition Diarrhea
Gallstones Symptoms : पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाण वाढले; काय आहे कारण? टाळण्यासाठी काय करावे?

वरील सर्व दंतविकारांचा विचार करत असता एक अत्यंत महत्वाची समस्या दातांच्या बाबतीत लहान मुलांमध्ये आढळते ती म्हणजे दात उशिरा येणे. दुधाचे दात व वयाच्या सातव्या वर्षानंतर येणारे कायमचे दात या दोन्ही प्रक्रिया फार उशिरा घडताना दिसतात आणि काही रुग्णांमध्ये हे दात येतच नाहीत. होमिओपॅथी शास्त्रामध्ये या समस्येसाठी स्वतंत्र औषधयोजना आहे. दंतरोगामध्ये सरासपाने शल्यचिकित्सा ही अत्यंत प्रगत आणि अपरिहार्यपणे वापरली जाते. दंतरोगातील उपचारामध्ये आवश्यकतेनुसार शल्यचिकित्सेची मदत घेऊन योग्य होमिओपॅथी औषधयोजना केल्यास रुग्णाला चिरकाळ टिकणारा आणि शाश्वत योजना आपण देऊ शकतो.

(लेखक होमिओपॅथी डॉक्टर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()