Frozen Shoulder Symptoms
Frozen Shoulder Symptomsesakal

Frozen Shoulder Symptoms : फ्रोझन शोल्डरपासून मिळवा मुक्ती, फिजिओथेरपीमुळे पुनश्‍च येई शक्ती।

फ्रोजन शोल्डर (Frozen Shoulder) हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे.
Published on
Summary

अनेकवेळा काही लोकांमध्ये खांद्यामधील हे दुखणे इतके तीव्र स्वरुपाचे असते की रात्री रुग्ण झोपेतूनही उठतात अथवा खांदेदुखीमुळे ते झोपू शकत नाहीत.

-डॉ. नितीन रमेश चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ nitin२२२५५@gmail.com

फ्रोजन शोल्डर (Frozen Shoulder) हा खांद्याच्या विकारांमधील सर्वसामान्य आजार आहे, खांद्याच्या सांध्यामध्ये होणाऱ्‍या तीव्र स्वरुपाच्या वेदना, खांदा कडक होणे, जखडणे, खांद्याच्या हालचालीस मर्यादा येणे या स्वरुपाची लक्षणे यामध्ये आढळतात. ही लक्षणे हळूहळू वाढत जातात.

प्रत्येक स्नायुला कॅप्सूल (Capsule) नावाचं एक आवरण असतं. ही कॅप्सूल जर घट्ट झाली वा हाडाला चिकटून राहिली तर फ्रोजन शोल्डरचा त्रास सुरू होतो. याला शास्त्रीय भाषेत अधेसिव्ह कॅप्सुलायटिस किंवा पेरीअर्थराइटिस असेही म्हणतात. याची लक्षणे तीन टप्प्यात दिसून येतात.

  1. फ्रिझिंग स्टेज (०-६ महिने): पहिल्या टप्प्यात सुजेचं प्रमाण जास्त असतं याला सायनोव्हायटिस असेही म्हणतात. यात रुग्णाला अत्यंत वेदना जाणवतात. विशेषत: रात्री वेदना जास्त असतात.

  2. फ्रोझन स्टेज (६ महिने-१२ महिने): दुसऱ्‍या टप्प्यात रुग्णांच्या हालचाली कमी होतात. सांधा हळूहळू आखडायला लागतो. यात लवचिकता कमी होते.

  3. थोइंग स्टेज (१२ महिने-१८ महिने): यात बऱ्‍याचदा हालचालींमध्ये सुधारणा आढळते. गोष्टी पूर्वपदाला येऊ लागतात. परंतु खांद्याचे स्नायू कमजोर झाल्याने त्यांच काम आजूबाजूचे स्नायू करू लागतात. रोजच्या जीवनातील कामांवरही याचा परिणाम होतो. अनेकवेळा काही लोकांमध्ये खांद्यामधील हे दुखणे इतके तीव्र स्वरुपाचे असते की रात्री रुग्ण झोपेतूनही उठतात अथवा खांदेदुखीमुळे ते झोपू शकत नाहीत. हल्लीची बदलेली जीवनशैली, राहणीमान व नैसर्गिकरित्या होत असलेल्या हालचालींवर निर्बंध यामुळे हा त्रास बळावतो.

Frozen Shoulder Symptoms
Arthritis Symptoms : सांधेदुखी असेल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठं नुकसान होईल!

फ्रोजन शोल्डरची कारणे : खांद्याच्या सांध्यामधील हाडे (Bones), बंध, टेंडोन या रचनांवर असलेले कॅप्सूलचे आवरण जाड झाल्यावर खांद्याच्या हालचालीस अवरोध निर्माण होतो.

  1. चाळीसपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीमध्ये-साधारणपणे ४० ते ६० वयोगटातील लोकांना फ्रोजन शोल्डरची समस्या भेडसावत असते. महिलांना याचा त्रास जास्त प्रमाणात होतो.

  2. मधुमेहाचा त्रास असणाऱ्‍या व्यक्तींमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.

  3. सांध्याची हालचाल नसेल-खांद्यच्या हाडाचे फ्रॅक्चर हाताच्या हाडांचे फ्रॅक्चर किंवा शस्त्रक्रियेनंतर खांद्यांच्या सांध्याची हालचाल होत नसल्यामुळे

  4. खांद्यातील रोटेटर कफ टियर- खेळांमुळे होणाऱ्‍या दुखापती- स्पोर्ट्स इंजुरी

  5. मेंदूमध्ये होणारा पक्षाघात (स्ट्रोक)

इतर कारणे

  • थायरॉईड ग्रंथीतील हार्मोनमधील वृद्धी /कमतरता (हायपोथॉयराईड/हायपरथॉयराईड).२) हृदयाचे विकार ३) टिबी ४) पार्किंसन्स.

  • फ्रोजन शोल्डरचे निदान बहुतांशी तज्ज्ञ डॉक्टरांकडून शारिरीक तपासणीद्वारे होते.

  • रक्ताच्या विविध तपासण्या करणे गरजेचे आहे कारण मधुमेह किंवा थायरॉईड ग्रंथीचे विकार याचे निदान होऊ शकते.

  • खांद्याचा एक्स रे- यात सांध्याच्या हाडांना इजा आहे की नाही हे कळते.

  • एम आर आय स्कॅन- यात खांद्याचे आवरण, शीरा, स्नायु अथवा रोटेटर कफ यांची लवचिकता किंवा झालेल्या दुखापती याचे निदान करता येते.

  • गरज भासल्यास पूर्ण भूल देऊन खांद्याची तपासणी केली जाऊ शकते.

  • फ्रोजन शोल्डर्सच्या उपचारांमध्ये सामान्यत: शारिरीक उपचार आणि वेदना व्यवस्थापन यांचा समावेश असतो.

Frozen Shoulder Symptoms
Health News : डोकेदुखीचे तब्बल 150 प्रकार असू शकतात; 17 कोटी लोकं या आजाराने त्रस्त

या त्रासाची सुरुवात होतानाच घरगुती उपाय किंवा मालिश न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जेणेकरून पुढील त्रास टाळता येऊ शकेल. योग्य तपासणीनंतर फिजिओथेरपी उपचार व शास्त्रोक्त पद्धतीने व्यायामाच्या पद्धती शिकविल्या जातात, या घरच्या घरी किंवा फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली करता येतात.

पहिल्या स्टेजसाठी रेंज-ऑफ-मोशन व्यायाम: हे व्यायाम खांद्याची गती सुधारण्यास आणि कडकपणा कमी करण्यास मदत करतात. खाली वाकून हाताला खांद्यातून सैल सोडणे व त्याच्या विविध हालचाली करणे असे याचे स्वरुप असते. तसेच स्वत: फिजिओथेरपिस्ट मोबिलाइझेशन करतात. खांद्याच्या आजूबाजूचे स्नायू ताकदवान करण्यासाठीचे व्यायाम: खांद्याच्या मागे म्हणजेच पाठीच्या बाजूचे स्नायू आपल्या बऱ्याच हालचालींना मदत करत असतात. सर्व स्नायूंचे खांद्याभोवती एक आवरण बनते. याला शोल्डर गर्डल असे म्हणातात.

रोटेटर कफ नावाच्या स्नायूंच्या समूहासाठी देखील ताकदीचे व्यायाम गरजेचे आहेत.तिसऱ्‍या स्टेजमध्ये सुधारणा होत असल्याने यात थेराबँडच्या व्यायामांना प्राधान्य दिलं जातं. तसेच स्ट्रेचिंगचे व्यायाम फायदेशीर ठरतात. कॅप्सुलची लवचिकता वाचवण्यासाठी वेगवेगळ्या स्थितींमध्ये कॅस्पूलला मोकळे करण्यासाठी काही व्यायाम दिले जातात याला कॅप्सूलर स्ट्रेचेस असं म्हणतात. या स्ट्रेचेसना ४ ते ५ वेळा करण्याचा सल्ला दिला जातो व स्ट्रेच साधारणत: ३० सेकंद धरून ठेवता येऊ शकतो. दुसरा सोपा उपाय म्हणजे खांद्याला बर्फ किंवा गरम पाण्याने दिवसातून २-३ वेळा शेकल्याने या त्रासाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

Frozen Shoulder Symptoms
Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

वैद्यकिय सल्ल्यानुसार विविध प्रकारची औषधे यामुळे वेदना, सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते, ठराविक प्रमाणातच औषधे घ्यावीत कारण याची उपयुक्तता मर्यादित स्वरुपाची असते. खांदा खूपच आखडलेला असल्यास सांध्याच्या पोकळीत इन्जेक्शनद्वारे क्रॉर्टिकोस्टिरॉइड्स/सुन्न करणारी औषधे / दोन्हींचे मिश्रण दिले जाते, जेणेकरून वेदना कमी होऊन हालचाली व गतिशीलता सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.

शोल्डर मॅन्युपुलेशन या उपचारात रुग्णाला भूल देऊन, खांदा वेगवेगळ्या दिशेत फिरवून, हालवून तो मोकळा करण्याचा प्रयत्न करता येतो. दुर्बींणीद्वारे खांद्यावरील शस्त्रक्रिया: एका छोट्या छिद्रातून कॅमेरा असलेल्या छोट्या नळीद्वारे खांद्याच्या रचनांचे परीक्षण केले जाते. खराब झालेला भाग, खांद्याच्या रचनेत चिकटलेल्या रचना या दुसऱ्या छोट्या छिद्रातून उपकरणे खालून सोडवतात.

(डॉ. चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी, येथे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()