Computer Vision Syndrome
Computer Vision Syndromeesakal

Computer Vision Syndrome : कॉम्प्युटरचे दृष्टिदोष टाळा अन् 20-20-20 चा नियम पाळा

संगणक स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन (Mobile screen) यामधून येणारे नीलकिरण आपल्या झोपेवर परिणाम करतात.
Published on
Summary

संगणकाचा वापर मर्यादित वेळेपुरता करणे हे योग्य आहे; पण त्याचा वापर जर जास्त झाला तर डोळ्यांवरचा ताण वाढतो. यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतात.

-डॉ.पल्लवी यादव, नेत्ररोगतज्ज्ञ. (Email ID: chirayu.ratnagiri@gmail.com)

लॉकडाउन काळात स्क्रीनटाइम सर्वांचाच वाढला होता. अगदी सर्व आबालवृद्ध, वर्कफ्रॉम होम (Work from home) असल्यामुळे शालेय शिक्षण, मनोरंजन यासाठी संगणकाचा वापर होत होता. त्या वेळी डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवले. लॉकडाउन (Lockdown) संपले तरी नोकरीमध्ये व व्यवसायामध्ये संगणकाचा वापर हा वाढतच आहे.

संगणक (Computer) आपल्याला व्यवसाय ते मनोरंजन, आरोग्यविषयक सल्ल्यापासून ऑनलाईन अभ्यासक्रमापर्यंत, स्टॉक्स व फायनान्सपासून ऑनलाईन शॉपिंगपर्यंत अशा विविध कामांसाठी मदत करतो. संगणक हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे; पण त्याचबरोबर त्याचे आपल्या डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Computer Vision Syndrome
Learning Disorder Symptoms : शैक्षणिक अक्षमता ही एक मानसिक स्थिती आहे, यासाठी ठराविक उपचार नाहीत; कशी असतात लक्षणे?

संगणक स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन (Mobile screen) यामधून येणारे नीलकिरण आपल्या झोपेवर परिणाम करतात. त्याचबरोबर त्याचा डोळ्यांनाही त्रास होतो. यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा आणि चष्म्यावरील अवलंबता या दोन सर्वात सामान्य समस्या आहेत. संगणकावर काम करताना अ‍ॅन्टिरिफ्लेक्टिव्ह चष्मे किंवा स्क्रीनचा वापर करावा. डोळ्यांना ओलावा देणारे आय ड्रॉप्स (Tear substitutes) वारंवार वापरावे.

Computer Vision Syndrome
Oral Cancer Symptoms : कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? Cancer नक्की कशामुळं होतो? जाणून घ्या..

संगणकाचा वापर मर्यादित वेळेपुरता करणे हे योग्य आहे; पण त्याचा वापर जर जास्त झाला तर डोळ्यांवरचा ताण वाढतो. यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये डोळे लाल होणं, डोळे दुखणं, कोरडे होणं, डोकेदुखीसह थकवा येणं, झोप न येणं त्याचबरोबर खांदेदुखी, मानदुखी यासारखा त्रास जाणवतो. डोळ्यावर ताण वाढल्यामुळे नजर धूसरही होऊ शकतो. लहान मुलांमध्ये स्क्रीनटाईम जास्त झाल्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो व चष्मा लागण्याची शक्यता असते.

सर्वात महत्वाचे म्हणजे २०-२०-२० या नियमाचे पालन करावे. यामध्ये डोळ्यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० मीटर दूर पाहावे. खोलीमध्ये उजेड असावा. कमी उजेडात किंवा अंधारात संगणकाचा वापर केल्यामुळे डोळ्यावर अधिक ताण येऊ शकतो. थेट एसीसमोर बसू नये. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो. दररोज २-३ लीटर पाणी प्यावे. आहारामध्ये ‘अ’ जीवनसत्व असणारे पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या व नारंगी रंगाची फळे खावीत.

Computer Vision Syndrome
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

लहान मुलांनी विशेषकरून मैदानी खेळांमध्ये रूची वाढवावी जेणेकरून मोबाईलचा वापर आपोआपच कमी होईल व डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल. सर्वसाधारणपणे नजर खाली झुकेल, अशा लेव्हलवर कॉम्प्युटर असावा. कॉम्प्युटर स्क्रीन आयलेव्हलपेक्षा ४-५ इंच खाली आणि डोळ्यांपासून २० ते २७ इंच अंतरावर असावा. त्यामुळे डोळ्यावरील ताण कमी होण्यास मदत होते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही त्रास होत असल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यासाठी त्वरित आपल्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.

(लेखक डॉ. चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.