नागपूर : टोमॅटो हे (सिट्रस) लिंबूवर्गीय फळ आहे. यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, झिंक यासारखे भरपूर तत्त्व असतात. त्यात ॲन्टीऑक्सिडेंट गुण ही आढळतात.
प्रत्येकाच्या घरात टोमॅटो असतोच. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी, टोमॅटो सूप एवढंच काय तर काही लोक मांस, मच्छी, अंडी यामध्ये सुध्दा आवर्जून टमाटर टाकतात. त्यामुळे टोमॅटो हे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून ओळखली जाते. टोमॅटो हे अनेक गुणकारी फायदे देणारी फळभाजी आहे.
टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो. जे आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यामुळे अजून प्रभावशाली ठरतो. टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांवर खुपच फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी सकाळी एक टोमॅटो खाल्ले तर बराच वेळ भूक लागत नाही.
टोमॅटो खाण्याचे फायदे
व्हिटामिन-सी त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असते.
हृदयसंबंधित रोगांपासून बचाव होतो.
युरीन इन्फेक्शनपासून बचाव करते.
रक्तशुद्धी होते.
पचनशक्ती वाढवते
पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन के मुळे हाडे मजबूत होतात.
टोमॅटो चेहऱ्यावर घासून लावल्याने चेहऱ्यावर चमक येऊन कोरडी त्वचा मुलायम होऊन मॉइश्चराइज होते.
तेलकट त्वचेसाठी टोमॅटो एक उत्तम औषध आहे.
त्वचेला उजळ करण्यासाठी टोमॅटो खूप उपयोगी आहे.
टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांची चमक आणि सौंदर्य वाढते.
टोमॅटो शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
केसांना चमकदार आणि मजबूत करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे.
बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्याने किडणी स्टोनची शक्यता कमी होते.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो लाभदायक आहे.
स्मोकिंगमुळे शरीराला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.