त्रिकोणासन हे दंडस्थितीमधील, म्हणजेच उभे राहून करण्याचे आसन आहे. आसन सोपे व खूप लाभदायी आहे.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. दोन्ही पायांत साधारण अडीच ते तीन फूट अंतर घ्यावे. उंचीनुसार थोडे कमी-जास्त. पण डाव्या बाजूने प्रथम करणार असू, तर डावे पाऊल डाव्या बाजूला वळवावे. श्वास घेत दोन्ही हात बाजूने जमिनीला समांतर येतील या पद्धतीने घ्यावेत.
आता श्वास सोडत सावकाश कंबरेतून डाव्या बाजूला वाकावे सुरुवातीला डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडावा.दुसरा हात वरच्या दिशेला ताणावा.
मान पण वरच्या दिशेला वळवावी. नजर वरच्या हाताकडे स्थिर ठेवावी. श्वसन संथ सुरू ठेवावे. मान वरती वळवायला त्रास होत असेल किंवा तोल जात असेल त्यांनी सुरुवातीला समोर बघावे, मान वळवू नये.
हाताचा तळवा जमिनीवर टेकवणे शक्य असेल, त्यांनी पावलाच्या पुढे किंवा मागे टेकवावा. अनेकदा हाताचा तळवा जमिनीवर टेकवण्याकरिता चुकीच्या पद्धतीने वाकले जाते व आसनाचा लाभ मिळत नाही.
म्हणूनच आपण इथे सुरुवातीला पायाचा घोटा पकडून उत्तम स्थिती ताण देण्याचा सराव करणे आवश्यक हे.आसनस्थिती केल्यानंतर स्थिर राहावे. सावकाश उलट क्रमाने आसन सोडावे व दुसऱ्या बाजूनेही करावे.
आसनाचे फायदे
आसनाच्या नियमित सरावाने लहान मुलांना उंची वाढविणे, आळस, जडत्व कमी होणे, फुफुसांची कार्यक्षमता वाढणे, श्वसनाचे त्रास कमी होतात.
बालदमा, मधुमेह या व्याधीसह अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील स्नायू व पाठीचा मणका अधिक सुदृढ होतो.
लवचिकता वाढते. पायदुखी, गुडघेदुखी कमी होण्यासाठी मदत होते. वाताचा त्रास कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. नैराश्य, भीती इ. त्रास कमी होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.