उर्वशी रौतेला काय म्हणते आपल्या फिटनेसबद्दल ते वाचा

urvashi-rautela
urvashi-rautela
Updated on

स्लिम फिट - उर्वशी रौतेला, अभिनेत्री
‘पागलपंती’ या चित्रपटातून मला खरी प्रसिद्धी मिळाली. मला वर्कआउटची सुरुवातीपासूनच आवड आहे. अभिनेत्री बनण्याआधी मला जीम वगैरे आवडत नव्हती. पण सकाळी लवकर उठून जॉगिंग करणे मला फार आवडायचे. आजही मी माझ्या वर्कआऊटची सुरुवात सकाळी १ तास धावण्याने करते. सकाळच्या थंड हवेत आणि प्रसन्न वातावरणात धावायला छान वाटते. मला जिमला जाणे फारसे आवडत नाही.

त्यामुळे मी आठवड्यातून फक्त ४ वेळाच जिमला जाते. यामध्ये स्ट्रेचिंग, वेट लिफ्टिंग, ट्रेडमिलवर धावणे अशा प्रकारचे व्यायाम करते. जीममध्ये जाण्याचा मुख्य हेतू हा शरीराची लवचिकता वाढवणे, मसल्स बिल्डिंग हाच असतो. आठवड्यातून २ वेळा मी योगासने करते. योगासने करायला मला फार आवडतात. मी अनेक प्रकारचे कठीण योगासने करण्याचाही प्रयत्न करत असते. त्याव्यतिरिक्त मला नृत्य करायलाही आवडते. फिटनेसचा एक भाग म्हणून मी नृत्यही करते.  

तुमच्या फिट राहण्याचे रहस्य हे फक्त वर्कआउट नसते. तर त्यासाठी योग्य डाएटही फॉलो करावे लागते. मी एकाच प्रकारचे डाएट रोज फॉलो करत नाही. तर दर आठवड्याला मी त्यामध्ये थोडेफार बदल करत असते. सकाळचा नाश्‍ता हे दिवसाचे पहिले जेवण असते. त्यामुळे तो पौष्टिक आणि फायबरयुक्त असला पाहिजे. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी टोस्टसोबत तीन अंडी तसेच दूध किंवा फळांचा ज्यूस घेते. अंड्यामध्ये प्रथिने असतात.

तसेच दुधामध्ये कॅल्शिअम असल्याने सकाळचा नाश्‍ता भरगच्च होतो. सकाळी लवकर शूटिंगसाठी जाणार असल्यास मी सोबत भाज्या किंवा फळे घेते. घरचे जेवण, हे दुपारसाठी महत्त्वाचे असते. दुपारच्या जेवणात मी शिजवलेल्या भाज्यांसोबत दोन चपात्या खाते. कधीतरी मी स्नॅक्स खाणेही पसंत करते. परंतु ते घरी बनवलेलेच असावे. रात्रीचे जेवण हे दिवसभराचे शेवटचे जेवण असल्याने हलके असावे. यावेळी मी सहज पचू शकेल असा आहार घेते. यामध्ये सूप किंवा वरण-भात खाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.