नागपूर : लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गोष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. तापात बाळ उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.
जेव्हा लहान मुलांना ताप येतो, तेव्हा काय करावे समजत नाही. त्यांचं ताप कमी करण्यासाठी आपली धावपळ सुरू असते. लहान मूल बोलू शकत नाही. त्यांना ताप आला तर खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे औषध देऊ शकत नाही किंवा आपण त्यांना काहीही देऊ शकत नाही. जेणेकरून त्यांचा ताप बरा होईल.
परंतु, आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. हा पर्याय म्हणजे घरगुती उपाय. याचा अवलंब केल्यास लहान मुलांना थोडा आराम मिळेल. आता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की अशी कोणती कृती आहे जी लहान मुलाचा ताप बरा करू शकते. ते म्हणजे हिंग. हिंग ही प्रत्येकाच्या घरात असतेच. हिंगामध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये बाळाचा ताप बरं करण्याची क्षमता असते. चला तर जाणून घेऊ हिंगाद्वारे बाळाचा ताप कसा कमी करता येऊ शकतो...
रात्री अपरात्री मुलाला ताप आला तर डॉक्टराकडे नेणे अवघड होते. अशा परिस्थितीत मुलांचा ताप कमी करण्यासाठी हिंगाची पट्टी द्यावी. आता तुम्ही म्हणाल यासाठी जास्त हिंग लागेल. पण असे काहीही नाही. हिंग पट्टी लावण्यासाठी तुम्हाला फक्त चिमूटभर हिंगाचा गरज आहे.
हिंग पट्टी लावण्यासाठी हिंगाबरोबर कागदाचा छोटा तुकडा आणि चम्मचभर पाण्याची गरज पडते. एक छोट्या चमच्यात चिमूटभर हिंग टाका. तसेच काही थेंब पाणी टाका. हिंग व्यवस्थित मिसळली की कागदाचा तुकडा सिक्याच्या आकारात कापून घ्या. आता त्याला हिंगाच्या पाण्यात भिजवून मुलाच्या डोक्याच्या बाजूला लावा. आपण हे पट्टी डोक्याच्या दोन्ही बाजूंनी लावावी. यानंतर उरलेले पाणी गळ्याजवळ लावावे. थोड्या वेळाने आपण पहाल की मुलाचे शरीराचे तापमान कमी झालेले दिसेल. जर ताप बरा होत नसेल तर मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा. जेणेकरून तापाचे कारण ज्ञात होईल आणि योग्य वेळीच त्यावर उपचार होईल.
साधारणपणे एक महिन्यापासून पाच वर्षांच्या मुलांना हिंगपट्टी लावता येते. याने त्याचा ताप बऱ्याच प्रमाणात कमी होतो. पट्टी लावल्याने आराम मिळाल्यास मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. हा उपाय केल्यानंतरही ताप जात नसेल तर त्वरित मुलाला घेऊन डॉक्टरकडे जा.
मुलांना हिंग देण्याचे इतर फायदे
संकलन व संपादन - नीलेश डाखोरे
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.