सूर्यनमस्काराच्या आसन साखळीतील आसनांची आपण क्रमवार माहिती घेत आहोत. यामध्ये आज अश्व संचालनासनाबद्दल जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्काराच्या आसन साखळीतील हे चौथ्या आणि नवव्या क्रमांकाचे आसन आहे. या आसनाची स्थिती अश्वारुढप्रमाणे असल्याने याला अश्व संचालनासन म्हणून ओळखले जाते. संस्कृतमधील तीन शब्दांपासून या आसनाला नाव दिले आहे. अश्व म्हणजे घोडा, संचालन म्हणजे स्थिती आणि आसन म्हणजे पवित्रा.
खेळाडू, सायकलिंग करणारे, चालणे आणि पळणे यासारखे कायमस्वरूपी व्यायाम करणाऱ्यांसाठी अश्व संचालनासन हे आसन उपयुक्त आहे.
या आसनामुळे केवळ शरीरच बळकट होत नाही तर निसर्गाकडून आपल्याला मनाची शक्ती वाढविण्यासाठीचे गुण प्राप्त होतात. उदाहरणार्थ झाडांची स्थिर शक्ती, पक्ष्यांची चपळता आणि सिंहाची विस्मयकारक ऊर्जा आणि अन्य बरेच काही. आणि अर्थात घोडा हा सामर्थ्याबरोबर चालणे, फिरणे, उड्या मारणे आदी क्षमतांसाठी ओळखला जातो. त्यामुळे व्यायामापूर्वी किंवा नंतर आपण या आसनाचा आपल्या व्यायामप्रकारात समावेश करू शकतो. शरीराच्या खालच्या भागातील स्नायू बळकट होण्याबरोबर चपळता येण्यासाठी या आसनाचा फायदा होतो.
आसनाचे फायदे
पार्श्वभाग, पाय आणि मांडीचा सांधा ताणला जातो.
अपचन, बद्धकोष्ठता कमी होते.
ओटीपोटाच्या अवयवांना मालिश होतो.
मज्जासंस्थेमध्ये संतुलन निर्माण होते.
फुफ्फुसाच्या क्षमतेत वाढ होण्याबरोबरच छातीचे स्नायू बळकट होत हृदयाची कार्यक्षमता वाढते.
मूत्रपिंड आणि यकृताची कार्यक्षमता वाढते.
इच्छाशक्तीबरोबरच धैर्य आणि दृढनिश्चयतेत वाढ.
वंध्यत्व दूर होण्यासाठी मदत करते, मासिक पाळीतील समस्या कमी होतात.
कसे करावे आसन?
मागच्या भागात आपण पादहस्तासन पाहिले, त्या स्थितीनंतर दोन्ही हात पायांजवळ घ्यावेत.
श्वसन संथपणे सुरू ठेवत उजवा पाय शक्य तितका मागे न्यावा. पायाची बोटे जमिनीवर घट्ट रोवावी.
त्याच वेळी डावा गुडघा दुमडून पाय पुढे आणत जमिनीवर ठेवावा. दोन्ही हात ताठ ठेवावेत.
आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचे संपूर्ण वजन दोन्ही हातांबरोबर डावा पाय, उजवा गुडघा आणि उजव्या पायांच्या बोटावर असावे.
डोके मागच्या बाजूला किचिंतसे झुकवून वरच्या दिशेला असावे किंवा डोके जमिनीला समांतर ठेवा.
शरीराला कमानीसारखा आकार द्या
संपूर्ण लक्ष दोन भुवयांमधील अजना चक्रावर केंद्रित करा.
त्याचवेळी `ओम भानवेनः महा’ मंत्राचा उच्चार करावा.
कोणी करू नये?
गुडघेदुखी किंवा घोट्याची व्याधी असणाऱ्यांनी पूर्ण ताण देऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.