योगा लाइफस्टाइल : महर्षी पतंजलींची योगसूत्रे

आपण पुढील लेखांतून योगसूत्रांचा प्रवास जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी योगसूत्र म्हणजे काय आणि ते लिहिण्यामागचे प्रयोजन समजून घेऊयात.
Vasundhara Talware
Vasundhara TalwareSakal
Updated on

आपण पुढील लेखांतून योगसूत्रांचा प्रवास जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी योगसूत्र म्हणजे काय आणि ते लिहिण्यामागचे प्रयोजन समजून घेऊयात. सूत्र म्हणजे धागा. महर्षी पतंजलींनी एकूण १९६ योगसूत्रे धाग्याच्या रूपात लिहिली आहेत. जेणेकरून निरनिराळ्या पातळ्यांवर किंवा पायऱ्यांवर ती एकमेकांत गुंफता येतील. कोणतेही सूत्र सहा किंवा सात शब्दांपेक्षा मोठे नाही. ती सूत्र अत्यंत संक्षिप्त, अचूक आणि शक्तिशाली आहेत. पुराणकाळात आतासारखे पेन किंवा कागद उपलब्ध नव्हते. त्यावेळी ही सूत्रे गुरूकडून शिष्य किंवा अनुयायांना मुखोग्दाराद्वारे अगदी मनोभावे शिकविली जात. त्यामुळे ती अगदी संक्षिप्त आणि मुद्देसूद आहेत. ही १९६ सूत्रे योग जीवन जगण्याचा मार्ग असून ती तुम्हाला मुक्तिकडे घेऊन जातात, असे कैवल्य यांनी सांगून ठेवले आहे. आता पतंजलींचा विचार करू.

कोणताही गुरू प्रथमतः प्रगतिशील शिष्यावरच लक्ष केंद्रित करतो. यासाठी आपण ‘योग दर्शन’च्या पहिल्या चार पाठांचा विचार करूयात. त्याला समाधी पद म्हणूनही ओळखले जाते. समाधी अवस्था प्राप्त केलेल्या साधकांसाठी ते पाठ आहेत. परंतु समाधी अवस्थेला घाबरून जाऊन योगाचा विचार बारगळू देऊ नका. खूप साधना करणाऱ्यांसाठी समाधी ही अंतिम ध्येय आहे. या ध्येयाच्या मार्गावर अनेक सुंदर स्थळ आहेत, त्याचा आपण आपल्या सामान्य घरगुती जीवन जगण्याबरोबरच आनंद घेऊ शकतो. माझ्यासाठी म्हणाल, तर समाधी म्हणजे मनाला शांत करणारी अंतिम गोष्ट. आपल्यापैकी बहुतेकांना ते पटत असेलही.

पहिला पाठ आहे समाधी पद (पद म्हणजे पाऊल किंवा एक चतुर्थांश. सर्व सूत्रे चार पदांत लिहिली आहेत.) सर्व पदे योगा म्हणजे काय आणि त्याचे परिणाम, मन म्हणजे काय व आपण त्याला कसे शांत करू शकतो. समाधीचे विविध प्रकार, मुक्ती म्हणजे काय याचे सविस्तर विवेचन केले आहे.

दुसरा पाठ ‘साधना पद’ असून तो नवशिक्यांसाठी आहे. यामध्ये क्लेष या ताणाबद्दल विवेचन केले आहे. तो कसा कमी करायचा, विवेक कसा साधायचा, त्याचबरोबर योगाच्या अष्ट पदराच्या अंतरंगातील यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांची माहिती दिलेली आहे.

तिसरा पाठ ‘विभूती पद’ हा आहे. त्यामध्ये योगाच्या अष्ट पदरातील धरणा, ध्यान आणि समाधी या बहिर्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. चांगले, सात्त्विक जीवन जगण्याच्या मार्गाची अनुभूती घेत गूढ आणि मानसिक शक्तींना अटकाव करते.

चौथा पाठ ‘कैवल्य पदा’चा आहे. त्याद्वारे मानसिक शक्ती प्राप्त करणाऱ्या माध्यमांवर लक्ष केंद्रित करता येते. आपल्या वैयक्तिक वेगळेणाचे ते कारण आहे, तुमचे वेगळेपण आणि वैश्‍विक मन, या सर्वांचे एकीकरण, आकलनशक्तीची थिअरी, मनाचा एखाद्या आयुधाप्रमाणे वापर हाच कैवल्याचा मार्ग आहे आणि शेवटी अर्थातच कैवल्य.

हे सर्व घटक तुमच्या आयुष्याला अधिक शक्तिशाली करण्यासाठी महत्त्वाचे आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?

चला, पुढील आठवड्यापासून योगाद्वारे मानसिक स्वच्छता, उपचार आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गक्रमण कसे करायचे ते पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.