योगा लाइफस्टाईल : भुजंगासन

सूर्यनमस्काराच्या आसनांच्या साखळीतील सातव्या क्रमांकाचे आसन म्हणजे भूजंगासन. कोब्रा प्रजातीच्या नागासारखी या आसनाची स्थिती असते.
भुजंगासन
भुजंगासनsakal
Updated on

सूर्यनमस्काराच्या आसनांच्या साखळीतील सातव्या क्रमांकाचे आसन म्हणजे भूजंगासन. कोब्रा प्रजातीच्या नागासारखी या आसनाची स्थिती असते. संस्कृतमधील भुजंग शब्दावरून या आसनाला ओळखले जाते.

तुमच्या मनात निराशा दाटली असेल किंवा उत्साही वाटत नसेल, त्यावेळी डोके वर काढा, खांदे आणि पाठीला ताण देऊन छाती पुढच्या भागात ओढून घ्या. या स्थितीत तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. शरीरातील थकवा दूर होऊन मनाला उत्साह जाणवेल. त्याचप्रमाणे पाठदुखीपासून सुटका होऊ शकेल.

आसन कसे कराल?

  • अष्टांगनमस्काराच्या पुढची ही स्थिती आहे. या आसनातील हात आणि पाय आहे त्या स्थितीतच कायम ठेवा.

  • शांतपणे श्वास घेत छाती पुढे घेत डोके आणि खांदे जरा उंचवावेत. कोपर सरळ करून कोब्रासापाप्रमाणे स्थिती (कमान) करावी. शरीराची खालची बाजू (पार्श्‍वभाग) जमिनीला समांतर राहील.

  • डोके मागे वाकवा आणि लक्ष दोन भुवयांच्यामध्ये केंद्रित करा किंवा हनुवटी जमिनीला समांतर ठेवून डोळ्यांच्या बिंदूंवर लक्ष केंद्रित करा.

  • मांडी आणि नितंब जमिनीवरच ठेवा. हाताचा त्याला आधार राहील.

  • तुमच्या पाठीचा कणा लवचिक होत नाही, तोपर्यंत हात काही प्रमाणात वाकलेलेच ठेवा.

  • पाठीचा कणा काहीसा सैल करत त्याकडे लक्ष केंद्रित करावे.

  • स्वादिष्ठान चक्रावर लक्ष द्या.

  • ‘ओम हिरयेन नमः’ मंत्राचा उच्चार करावा.

कोणी करू नये?...

  • हार्निया, आतड्यांचा आजार, क्षयरोग असलेल्यांनी करू नये.

  • शरीरात थॉयरॉइडचे प्रमाण अधिक असल्यास डोके मागे फिरवू नका, नजर जमिनीला समांतर ठेवा.

आसनाचे फायदे...

  • पाठीचा कणा लवचिक व बळकट होतो.

  • छाती, खांदे, फुफ्फुसे आणि उदर आदी अवयव योग्यरीतीने ताणले जातात.

  • पाठीचे स्नायू आणि हात मजबूत होतात.

  • शरीराच्या अवयवांना ताण बसून योग्य मालिश होते.

  • फुफ्फुसे आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते.

  • उदरपोकळीचे अवयव आणि पार्श्‍वभाग मजबूत होतात.

  • दम्याच्या आजारावर उपयुक्त.

  • सायटिकावर उपकारक.

  • ताण आणि थकवा कमी होतो.

  • पाठदुखीचा त्रास कमी होतो.

सूर्यनमस्काराच्या आठ आसनांच्या साखळीतील हे शेवटचे आसन आहे. यापूर्वीच्या लेखांतून आपण हे आसन करण्यापूर्वीच्या पर्वतासन, अश्वसंचलनासन, पादहस्तासन, हस्त उत्थानासन आणि प्राणासनांची माहिती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.