शाकाहार कराल तर कॅन्सरपासून वाचाल! अभ्यास सांगतो...

४५०,००० हजार लोकांवर अभ्यास करून नॉनव्हेज खाणाऱ्यांना धोका अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे
vegetarian diet reduce cancer risk
vegetarian diet reduce cancer risk
Updated on

शाकाहार-मांसाहार असे दोन प्रकारचे आहार आपल्याकडे खाल्ले जातात. शाकाहार आवडणारे बरेच जण आहेत. पण शाकाहाराच्या तुलनेत मांसाहार अनेकांना जास्त आवडतो. तसेही प्रत्येक आहाराचे काहीना काही फायदे तोटे असतातच. आरोग्यतज्ज्ञांच्या मते शाकाहार हा जास्त पौष्टीक असतो. शरीरातलं कॉलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात आणण्याचं काम शाकाहार करतो, असे तज्ज्ञ सांगतात. पण एका नवीन अभ्यासानुसार Non Veg खाणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहार करणाऱ्यांना कॅन्सरचा धोका कमी असतो.

vegetarian diet reduce cancer risk
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट

अभ्यास काय सांगतो- हा अभ्यास वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, कॅन्सर रिसर्च यूके आणि ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थद्वारे करण्यात आला आहे. यावेळी ४५०,००० हजार लोकांवर अभ्यास करण्यात आला असून तो BMC मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. नियमितपणे मांसाहार करणाऱ्यांचा एक गट करून त्यांच्यावर अभ्यास केला गेला. किती जण आठवड्यातून पाचपेक्षा अधिकवेळा प्रोसेस्ड मीट, रेड मीट किंवा चिकन खातात आणि किती जण त्यापेक्षा कमी खातात हे यावेळी पाहिले गेले. मांस नाही पण, मासे किती जण खातात हेही तपासले गेले. तर शाकाहारी लोकांचा वेगळा गट करण्यात आला होता.

vegetarian diet reduce cancer risk
उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care
vegetarian diet reduce cancer risk
vegetarian diet reduce cancer risk

अभ्यासाचे निष्कर्ष- नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत कमी मांस खाणाऱ्यांना कॅन्सरचा धोका २ टक्क्यांनी कमी आहे. फक्त मासे खाणाऱ्यांना हा धोका १० टक्के कमी तर शाकाहार करणाऱ्यांना हा धोका १४ टक्के कमी होता. नियमित मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत कमी मांसाहार करणाऱ्यांना आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका ९ टक्के कमी होता. तर शाकाहारी महिलांना नियमित मांस खाणाऱ्या महिलांच्या तुलनेत पोस्टमेनोपॉझल ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका १८ टक्के कमी होता. तसेच शाकाहार करणाऱ्या आणि मासे खाणाऱ्या लोकांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका २० ते ३१ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले.

vegetarian diet reduce cancer risk
Grapes Benefits : द्राक्ष खाण्यामुळे होतात पाच चांगले परिणाम

तज्ज्ञ काय सांगतात- शाकाहारी लोकांना कॉलोरेक्टल किंवा अन्य गॅस्ट्रो आतड्यांशी निगडित प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी असतो. व्हेजिटेरियन डाएट कॅन्सरचा धोका १० ते १२ टक्के कमी करतो. तसेच शाकाहार करणाऱ्यांना मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत कोलोरेक्टल कॅन्सर विकसित होण्याचा धोका २२ टक्के कमी असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.