व्हायग्राचा वापर कॅंसरच्या उपचारासाठी होणार; संशोधनात केला दावा

ईकॅन्सर मेडिकल सायन्स या जर्नलचा संदर्भ देऊन एका संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे
Viagra Useful For Cancer Treatment
Viagra Useful For Cancer Treatmentesakal
Updated on
Summary

अँटीकॅन्सर फंड बेल्जियम' आणि 'ग्लोबल क्युअर' या अमेरिकन संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केलं जात आहे

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी व्हायग्राचा वापर जगभरात केला जातो. पण आता व्हायग्राची (Viagra) गोळी कॅन्सरवरही परिणामकारक ठरत असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. (Viagra Useful For Cancer Treatment)

सायन्स डेलीच्या अहवालात ईकॅन्सर मेडिकल सायन्स (eCancer medical science) या जर्नलचा संदर्भ देऊन एका संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्या माहितीनुसार व्हायग्रामध्ये कर्करोग कमी करण्याची क्षमता आहे. 'अँटीकॅन्सर फंड बेल्जियम' आणि 'ग्लोबल क्युअर' या अमेरिकन संस्थेच्या माध्यमातून हे संशोधन केलं जात आहे. सध्या उपलब्ध असलेल्या औषधांच्या सहाय्यानं कॅन्सरवर उपचार करणं शक्य आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सध्या त्याचं परिक्षण केलं जात आहे.

Viagra Useful For Cancer Treatment
एका दिवसात नेमकं किती मीठ खावे? WHOने दिली माहिती

कॅन्सरचा सामना करण्याची व्हायग्रामध्ये क्षमता (Study)

व्हायग्रातील फॉस्फोडिस्टेरेस 5 (phosphodiesterase 5) (PDE5) या घटकामध्ये असलेली नवीन औषध बनण्याची क्षमता अभ्यासकांनी शोधली आहे. व्हायग्राच्या सर्व औषधांमध्ये पीडीई 5 असते. हे औषध 'अनजाइना' (angina) या घशाच्या समस्येसाठी विकसित करण्यात आले होते, अशी माहिती अँटीकॅन्सर फंडाचे डॉ. पॅन पँट्झियार्का (Dr Pan Pantziarka) यांनी दिली आहे. तसेच हे औषध इरेक्टाइल डिसफंक्शनवर प्रभावी ठरते आहे. तसेच ते, फुफ्फुसातील धमनीच्या (pulmonary arterial hypertension) समस्येसाठी वापरले जाते आहे. आता तर व्हायग्रामध्ये कॅन्सर दूर करण्याचीही क्षमता असल्याचं निदर्शनास आलं आहे. कॅन्सरवर अजूनही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) करावी लागते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ कॅन्सरवर ठोस उपचार शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहेत.

Viagra Useful For Cancer Treatment
व्हायग्राबद्दल नवीन माहिती! अभ्यासातून आले आश्चर्यकारक निष्कर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()