हेल्थ वेल्थ : गरज ‘व्हिटॅमिन डी’ची

तुमच्या लक्षात आले आहे का, जेव्हा तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असते तेव्हा तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी तपासण्याची सूचना देतात.
Vitamin-D
Vitamin-DSakal
Updated on
Summary

तुमच्या लक्षात आले आहे का, जेव्हा तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असते तेव्हा तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी तपासण्याची सूचना देतात.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

तुमच्या लक्षात आले आहे का, जेव्हा तुम्हाला सतत थकल्यासारखे वाटत असते तेव्हा तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ची पातळी तपासण्याची सूचना देतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आजारी किंवा थकल्यासारखे वाटण्यात व्हिटॅमिन डी आणि कसे जबाबदार आहे. आज, तुम्हाला हे सोप्या भाषेत सांगतो.

‘व्हिटॅमिन डी’बद्दल समजून घेऊया

व्हिटॅमिन डी हे पोषक घटक आहे आणि त्याचे प्राथमिक कार्य हाडे मजबूत करणे आहे, जे आतड्यांमधून कॅल्शिअमचे शोषण वाढवून होते. त्याच्या उत्पादनाचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे, सूर्याची ऊर्जा तुमच्या त्वचेतील रसायनांचे ‘व्हिटॅमिन डी ३’मध्ये रूपांतर करते. त्यानंतर ते मूत्रपिंडात आणि मग यकृताकडे नेले जाते जिथे ते वापरण्यायोग्य स्वरूपात आणले जाते, ज्याला सक्रिय व्हिटॅमिन डी देखील म्हणतात. व्हिटॅमिन डी निर्मितीचा दुसरा स्रोत म्हणजे मर्यादित अन्न, जसे की मासे, अंड्यातील पिवळा बलक. त्यांची कार्ये जवळजवळ सारखीच असल्याने, त्यांना एकत्रितपणे व्हिटॅमिन डी म्हणतात.

‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास?

कमकुवत हाडे हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा थेट आणि प्राथमिक परिणाम आहे. ऑस्टिओपोरोसिस, ज्यामध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे फ्रॅक्चर होतात. मुलांमध्ये, मुडदूस हा आजार व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे होतो. स्नायू कमकुवत होणे, हाडांमध्ये दुखणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे, केस गळणे आणि सतत उदास वाटणे ही देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची काही लक्षणे आहेत.

या समस्येवर उपाय काय?

आपली जीवनशैली आपल्याला दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहू देत नसल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास आपल्याला त्याची पातळी वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे

आहे. तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे का ते आधी रक्त चाचणीद्वारे तपासून घ्या. साधारणपणे ३०ng/ml पेक्षा कमी पातळी म्हणजे तुम्हाला ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे असे मानले जाते. तुमच्या कमतरतेनुसार, तुम्हाला मासिक किंवा साप्ताहिक डोसची शिफारस केली जाऊ शकते.

पातळी अत्यंत कमी (१५ ng/ml पेक्षा कमी) असल्यास, पुरेशा पातळीपर्यंत जाण्यासाठी सुरुवातीला ३,००,००० इंटरनॅशनल युनिट्सचा (IU) बोलस डोस घेण्याची शिफारस केली जाते. तर, स्थिर पातळी राखण्यासाठी ५०,००० IU आठवड्यातून एकदा आणि हा डोस ६ ते ८ आठवड्यांसाठी घेण्याचा सल्ला दिला जातो. एकदा तुम्ही इष्टतम पातळी गाठली की, तुमच्या वयानुसार ४००-८०० IU दैनंदिन सेवनाचे पालन करून तुमची ‘व्हिटॅमिन डी ३’ची पातळी राखणे फार महत्त्वाचे आहे.

शरीरातील ‘व्हिटॅमिन डी’ची इष्टतम पातळी राखण्यासाठी दररोज ३० मिनिटे सूर्यप्रकाशात चालणे आणि ‘व्हिटॅमिन डी’ने समृद्ध असलेले अन्न खाणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()