हेल्थ वेल्थ : उष्णता आणि हायड्रेशन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनाच घराबाहेर जाऊन वेळ घालवायची इच्छा असते, मात्र उन्हाळ्यात प्रखर सूर्य आणि उष्णता सोबत येते. म्हणून आपल्या शरीराच्या हायड्रेशनकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
Drinking Water
Drinking WaterSakal
Updated on
Summary

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनाच घराबाहेर जाऊन वेळ घालवायची इच्छा असते, मात्र उन्हाळ्यात प्रखर सूर्य आणि उष्णता सोबत येते. म्हणून आपल्या शरीराच्या हायड्रेशनकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनाच घराबाहेर जाऊन वेळ घालवायची इच्छा असते, मात्र उन्हाळ्यात प्रखर सूर्य आणि उष्णता सोबत येते. म्हणून आपल्या शरीराच्या हायड्रेशनकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये शक्य तितके हायड्रेटेड कसे राहायचे, ते समजून घेऊ या!

उन्हाळ्यातील हायड्रेशन

शरीराच्या वजनाच्या तीनचतुर्थांशपेक्षा जास्त वजन पाण्याचे आहे आणि शरीरातील जवळजवळ प्रत्येक कार्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी आपल्या शरीरातील पोषक तत्त्वांना संपूर्ण शरीरात वाहून नेण्याचे काम करते आणि अनेक कार्ये नियंत्रितदेखील करते. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढते आणि त्यामुळे आपले शरीर घाम बाहेर काढून स्वतःला थंड करण्याचा प्रयत्न करते. आपला घाम पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सपासून बनतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची शरीराला अधिक आवश्यकता असते. आता शरीराला गरजेचे असलेले गरजेचे

इलेक्ट्रोलाइट्स कसे द्यायचे ते समजून घेऊ या :

प्रभावी हायड्रेशनसाठी टिप्स :

  • उन्हाळ्यात, उन्हात जाण्यापूर्वी किंवा व्यायामाला जाण्यापूर्वी पाणी प्या.

  • पाण्याची भरलेली बाटली नेहमी तुमच्या शेजारी ठेवा, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार पिण्यास सहज उपलब्ध होईल.

  • सकाळी उठल्यानंतर आणि जेवणापूर्वी पाणी प्या.

  • तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्हाला अधिक घाम येत असल्यास तुमच्या वर्कआउट दरम्यान पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वर्कआउटनंतर भरपूर पाणी प्या.

  • टोमॅटो, टरबूज आणि काकडी यांसारखे जास्त पाणी असलेले पदार्थ खा.

  • जास्त उष्णता टाळण्यासाठी थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.

  • तुम्ही एखादे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे तुम्ही किती पाणी पीत आहात, याचा रेकॉर्ड ठेवण्यास मदत करेल किंवा प्रभावी हायड्रेशनसाठी तुम्ही नेहमी स्वतःसाठी रिमाइंडर सेट करू शकता.

निर्जलीकरणाचे धोके

  • डोके दुखणे, उष्माघात.

  • थकवा जाणवणे आणि चक्कर येणे.

पाणी कधी प्यावे?

तुम्हाला तहान लागते किंवा तुमच्या तोंडाला कोरड पडल्यासारखे वाटते, तेव्हा तुमचे शरीर तुम्हाला पाणी पिण्याचे संकेत देत असते. शिवाय, तुमच्या लघवीचा रंग तपासा, जर तो पिवळा असल्यास तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. निरीक्षणे करण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुम्ही लघवी करण्यासाठी शौचालयात कमी वेळा जात आहात का आणि तुमचे तोंड वारंवार कोरडे पडत आहे का, ते ओळखा. हे तुमच्या शरीराला थोडे जास्तीचे पाणी हवे असल्याचे चांगले संकेत असू शकतात.

टीप : पाणी हा हायड्रेशनचा सर्वोत्तम स्रोत आहे आणि तुम्ही त्याची कसर सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्सने काढू नये, कारण ते तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.

उन्हाळ्यात, तुम्हाला एक तर उष्ण किंवा उष्ण आणि दमट दोन्ही परिस्थितींचा अनुभव येऊ शकतो आणि दोन्ही वेळी तुमचा घाम हा वेगवेगळा असतो.

1) कोरडी उष्णता : आपले शरीर कोरड्या उष्णतेच्या ठिकाणी असताना शरीराला थंड करण्यासाठी घामाच्या रूपात आपल्या रक्तप्रवाहातून पाणी बाहेर येते.

2) कोरडी आणि सर्वाधिक उष्णता : आपण सामान्यत: समुद्रकिनारे किंवा इतर कोणत्याही किनारी भागाजवळ या प्रकारची उष्णता अनुभवतो. या हवामानात घाम वेगळ्या पद्धतीने काम करतो. तुम्हाला घाम आल्यावर हवेतील आर्द्रता तुमच्या घामाचे बाष्पीभवन होऊ देत नाही आणि त्वचेच्या पृष्ठभागावर घाम तसाच राहतो. हे तुमच्या घामाच्या छिद्रांना अवरोधित करते आणि म्हणून तुम्ही त्वचेवरील घाम पुसून टाकणे गरजेचे असते. तुमचे हृदय त्वचेच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रक्त पाठवते, ज्यामुळे रक्तातील पाणी घामाच्या रूपात त्वचेच्या पृष्ठभागावर जाते आणि तुमचे शरीर थंड होते.

निर्जलीकरण झाल्यावरही पाणी घामाच्या रूपात रक्तातून बाहेर पडत राहते, ज्यामुळे रक्ताचे एकूण प्रमाण कमी करते आणि हृदयाला अधिक रक्त पंप करावे लागते. यामुळे तुमचे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाब कमी होतो, त्यामुळे हायड्रेटेड राहण्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.