Weight Gain Tips : खूप बारीक दिसताय! नैसर्गिक पद्धतीने 'असे' वाढवा वजन

काही लोकांसाठी वजन वाढलेले असणे खूप गरजेचे असते
weight gain tips
weight gain tips
Updated on

आपल्या शरीरासाठी वजन योग्य प्रमाणात असणं खूप महत्वाचं आहे. काही लोकांना त्यांच्या जीवनशैली, शरीरस्वास्थ्य बघून डॉक्टर त्यांचे वजन कमी (Weight loss) जास्त करण्याचा सल्ला देतात. पण वजन कमी करणं ही सध्या अनेकांसाठी महत्वाची बाब झाली आहे. मात्र काही लोकं खूप बारीक असतात. किंबहुना धावपळीमुळे त्यांना नियमित आणि पुरेसा आहार (Diet) घ्यायला जमत नाही. किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे अशा लोकांचे वजन खूप कमी असते. वजन कमी असल्याने त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. अशक्तपणा, थकवा आल्यावर डॉक्टरांकडे गेल्यावर ते तुम्हाला पाहूनच वजन वाढविण्याचा (Weight Gain) सल्ला देतात. म्हणजेच काही लोकांसाठी वजन वाढलेले असणे खूप गरजेचे असते. तुम्ही नैसर्गिक पद्धतीने खालीलप्रकारे वजन वाढवू शकता.

weight gain tips
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन
Exercise
Exercise esakal

नैसर्गिक पद्धतीने वजन वाढविण्याचे उपाय

१) व्यायाम- बारीक असणं किंवा अतिरिक्त चरबी वाढल्याने तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. तसेच तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, दररोज कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि लवचिकता वाढविणारे व्यायाम करणे गरजेचे आहे.

२) वजन उचलणे- तुमच्या शरीराचे वजन किती आहे यालाही महत्व आहे. पण असे करताना लीन मास वाढवणे हे उद्दीष्ट आहे. यासाठी तुम्हाला काही हेवी वेट लिफ्टिंग करावी लागतील. यामध्ये स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स, प्रेस, पुल-अप, रो, डिप्स, स्नॅचेस, क्लीन आणि जर्क्स यासारख्या व्यायामांचा समावेश करावा. हे व्यायाम तुमच्या हार्मोनल सिस्टीमला चालना देताना अनेक स्नायूंना मदत करतात.

weight gain tips
वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन
Diet Plan
Diet Plan esakal

३) हेल्दी डाएट- बाजारात असणारे काही डाएट सप्लीमेंट्स तुमचे वजन वाढेल असा दावा करतात. पण यापैकी बरेच आहार हे पूरक कृत्रिम पोषक तत्वांनी भरलेले असतात. त्यामुळे वजन तात्पुरते वाढते. पण, त्याचा आरोग्यावर परिमआम होतो. महत्वाचे म्हणजे, तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांची गरज असते.

४) निरोगी हृदय आणि वजन वाढवणारा आहार- आपल्या शरीराला हॅल्दी फॅटची आवश्यकता असते. अनहेल्दी फॅट्सयुक्त कॅलरीजचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आहारात हेल्दी स्नॅक्सचा समावेश करा. नट, ड्रायफ्रुट्स, फळे, भाजलेले चणे यांसारखे ड्राय स्नॅक्स वजन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

weight gain tips
Reduce Belly Fat : बेली फॅट कमी करायचयं? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Belly Fat Loss and Weight Loss
Belly Fat Loss and Weight Lossesakal

५) कमी खा - जंक फूड अतिप्रमाणात सेवन केल्याने तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून चांगले अन्नपदार्थ खाऊन तुम्ही वजन वाढवू शकता. पण, वजन वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकावेळी सगळंच न खाता थोड्या थोड्या अंतराने कमी प्रमाणात खाणे. अनारोग्यकारक कॅलरीयुक्त पदार्थ खाण्यापेक्षा पोषक तत्व आणि कॅलरींनी युक्त आहार घेणे हा एक चांगला पर्याय आहे.

६) हेल्दी फॅटयुक्त पदार्थ खा- डाएटमध्ये हेल्दी फॅटयुक्त पदार्थ सामाविष्ट करणे चांगले आहे. तुम्ही अंड्यातील पिवळ बलक, चरबी असलेले मांस, खोबरेल तेल आणि इतर निरोगी चरबीयुक्त पदार्थ खाऊ शकता. खाणे आवश्यक आहे. वजन वाढविण्यासाठी केळे खाणे चांगले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()