महिलांनो, Weight Loss करताय! 'ही' तीन डाएट्स करताना करा विचार

स्त्री आणि पुरूष जैविकदृष्ट्या खूप भिन्न आहेत
women Weight Loss diet tips
women Weight Loss diet tips
Updated on

Weight Loss Diet: स्त्री आणि पुरूष जैविकदृष्ट्या खूप भिन्न आहेत. त्यांच्या चरबी (fat) वापरण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतीतही खूप फरक आहे. पुरूषांमध्ये त्यांच्या शरीराची गरज, संरचना पाहता सरासरी ३ टक्के आवश्यक चरबी असते. तसेच महिलांमध्ये हे प्रमाण १२ टक्के असते. अत्यावश्यक चरबी ही शरीरातील एकूण चरबीच्या वस्तुमानाची टक्केवारी आहे. या चरबीशिवाय, शरीर योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये आवश्यक चरबीच्या चार पट जास्त चरबी असते. स्त्रियांमध्ये साठवलेली चरबी खरं तर एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असते. अत्यावश्यक चरबीच्या 12 टक्के बेसलाइन महिलांना टाईप टू मधुमेह आणि हृदयविकारापासून रक्षण करते. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी महिलांनी कुठलेही डाएट करताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी खालील ३ डाएट करताना विशेष काळजी घ्यावी. कारण त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.

women Weight Loss diet tips
वेगे वेगे चाला वजन कमी करा! Art Of Walking समजून घ्या
diet
dietsakal

केटो डाएट- केटोजेनिक डाएट हे कमी कार्ब, उच्च चरबीयुक्त आहार आहे. कार्बोहायड्रेट मर्यादित करणे गरजेचे असते. तसेच हे डाएट ही एक चयापचय स्थिती असते ज्यामध्ये तुमचे शरीर कर्बोदकांऐवजी ऊर्जेसाठी चरबीवर अवलंबून असते. महिलांचे शरीर नेहमी चरबी कमी करण्यास प्रतिकार करते. कारण ते गर्भधारणा आणि स्तनपानासाठी आवश्यक आहे असे मानले जाते. केटो आहारात कर्बोदकांचे सेवन सामान्यत: 50 ग्रॅमपेक्षा कमी असते, ज्यामुळे महिलांना थकवा येऊ शकतो. हार्मोनल आणि चयापचय प्रक्रियेत यामुळे बदल होतात. तसेच, केटो-प्रकारचे आहार सामान्यतः केवळ अल्प कालावधीसाठी कार्य करतात. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, मळमळ आणि बद्धकोष्ठता अशा समस्या महिलांमध्ये निर्माण होतात. अनेक महिलांना केटो आहारामुळे असलेल्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पीसीओएस, अनियमित मासिक पाळी किंवा वंध्यत्व असलेल्या महिलांनी हा आहार घेताना काळजी घेणे गरजेचे आहे.

women Weight Loss diet tips
Weight Gain Tips : खूप बारीक दिसताय! नैसर्गिक पद्धतीने 'असे' वाढवा वजन
weight loss
weight loss

इंटरमिंटंट फास्टींग - हे डाएट करताना ठराविक कालावधीसाठी काही पदार्थ खाणं पूर्णपणे वर्ज्य केलं जात. अलिकडच्या काळात इंटरमिंटंट फास्टींग वजन कमी करू पाहणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. अधुनमधुन अशाप्रकारचे डाएट केल्याने त्याचे चांगले परिणाम जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ असलेल्या लोकांवर दिसून आले. पण अनेक महिलांना या डाएटचा नकारात्मक परिणाम दिसला. मूड बदलणे, भूक वाढणे, नैराश्य राग अशाप्रकारची लक्षणे हे डाएट करताना पहिल्या काही दिवसांनंतर त्यांच्यात दिसली. त्यामुळे काही महिलांना मासिक पाळीदरम्यान समस्या आढळल्या.

women Weight Loss diet tips
Obesity: दलिया कि ओट्स! वजन कमी करण्यासाठी पौष्टीक पर्याय कोणता?

जीएम डाएट- GM आहाराचा उद्देश एका आठवड्यासाठी दररोज विशिष्ट अन्न किंवा खाद्य गटावर लक्ष केंद्रित करून लोकांना वजन कमी करण्यात मदत करणे आहे. GM आहारामध्ये 7-दिवसांच्या जेवणाची योजना असते. प्रत्येक दिवस विशिष्ट अन्न किंवा अन्न गटावर लक्ष केंद्रित करायचे. कमी कालावधीत चांगल्याप्रकारे वजन कमी करण्याची कल्पना आकर्षक वाटत असली तरी त्यात धोके आहेतच. या आहारामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. त्याचा त्रास महिलांना होऊ शकतो. त्यामुळे हे डाएट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.