घरातील स्त्री ही संपूर्ण घराचा आधार असते त्यामुळे तिने स्वतःकडे तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे, नाहीतर कुटुंबाचा डोलारा कोसळू शकतो.
वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर जगभर, तसेच आपल्या देशात स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer) प्रमाण वाढत आहे. पाश्चात्य देशातील हा आजार आज भारतात वेगाने पसरत आहे. जगभर सर्व कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सरवर सर्वाधिक संशोधन चालू आहे. योग्य वेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त स्त्रिया या कॅन्सरपासून मुक्त होऊ शकतात. त्यासाठी गरज आहे ते रुग्णाने योग्यवेळी डॉक्टरकडे येण्याची.