अल्कोहोल युज डिसॉर्डर म्हणजे काय? लक्षणं, परिणाम जाणून घ्या

एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे ‘अल्कोहोलिक ॲननिमस’ यांचे जाळं जगभर जवळपास प्रत्येक शहरात आहे.
alcohol
alcoholesakal
Updated on
Summary

आज ‘अल्कोहोलिक ॲननिमस’ या संस्थेचे एक संस्थापक बॉब स्मिथ यांच्या स्मृतीदिनी सहज!

मध्यंतरी माझ्याकडे ओपिडीत एक धडधाकट इसम घाईघाईत येऊन थेट माझ्यासमोर खुर्चीत येऊन बसला. मानेजवळ, उजव्या कानामागे, डाव्या गुडघ्याखाली आणि बेंबी जवळ चटकन खुणेनं चार जागा दाखवत त्याने घाईघाईत सांगितले, "इथे.. इथे..इथेच्च..”

मी: तिथे काय?

इसम: हो इथेच..

मी: काय? टोचतय? दुखतंय?

इ. : लपून बसलेत.

मी: काय?

इ. : उंदीर, इकडून तिकडे पळतायेत. आता इथं बसलेत लपून.

मी: हरकत नाही. काढूया आपण पण यापुढं प्यालात तर घुशी शिरतील अंगात आणि त्या काढायचं ट्रेनिंग माझ्याकडं नाही.

इ.: चालेल. बंद आजपासून. तेवढा उंदरांचं.

alcohol
सावधान! तुमच्या सॅनिटायझरमध्येही मिथाइल अल्कोहोल नाही ना?

उंदीर काय घुशी काय? व्हाट्स इज धिस? तुम्हाला साहजिक प्रश्न पडू शकतो. मित्रहो, या सगळ्याला ‘स्पर्शिक भ्रम’अर्थात टक्टाईल हॅल्युसिनेशन्स असे म्हणतात. कुठल्याही स्वरुपाच्या व्यसनाची जेव्हा ‘शरीराला-मनाला’ सवय जडते आणि पुर्तता न झाल्यास अशा प्रकारचे भ्रम होऊ शकतात, तेव्हा ते व्यसन टोकाचं अवलंबित्व किंवा थेट आजार यात परावर्तित झालेले असते. माणसाला चांगल्या-वाईटाची जाणीव होते, तो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही करतो. पण दिवस जसा पुढे सरकू लागतो तेव्हा अस्वस्थता वाढत जाऊन भिती-थरथर-भास हे सगळं होऊ लागते आणि “आजच्या दिवस घेतो उद्यापासून बंद” म्हणत गाडी पुन्हा तिथंच येते आणि ‘उद्या’ काही उजाडत नाही. अशा प्रकारची परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा तिला वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक समस्या न मानता ‘वैद्यकिय’ दृष्टिकोनातून बघायला हवे.

त्यातल्या त्यात सामान्यतः मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या मद्यपानाच्याच बाबतीत म्हणायचे इथे ‘मद्यपी किंवा दारुडा’ असं सुलभीकरण करण्यापेक्षा आयुष्यावर कितीही नकारात्मक परिणाम झाला तरी मद्यप्राशनाची अतिरिक्त इच्छा ही कमी होण्याऐवजी वाढतच जाते. या परिस्थितीला वैद्यकिय परिभाषेत AUD अर्थातच ‘अल्कोहोल युज डिसॉर्डर’असे म्हणतात. वरवर फार काही नसेल किंवा वैयक्तिक आवडनिवड असणारा हा प्रकार जगभरात इतका फोफावलाय की लोकसंख्येचा एक मोठा भाग यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभावित झालीय.

alcohol
जखमींची अल्कोहोल तपासणी! 

आकड्यांच्याच भाषेत सांगायंच तर WHO नुसार दरवर्षी साडेतीन दशलक्ष लोकांचा बळी या आजारामुळे जातो. भारतात हे प्रमाण प्रचंड आहे, यामुळे आज हा आजार त्याची व्याप्ती-सद्यपरिस्थिती-कारणं-लक्षणं-निदान-उपचार याबाबत चर्चा करूयात. ‘AUD’ एकदा का जडला की माणसाला ‘कुठं थांबाव? कसं थांबावं?’ कळत नाही. आजुबाजूला काही आणि कशीही परिस्थिती असो मनात फक्त ‘कसं पिऊ?’ हाच विचार रेंगाळत असतो. मी शौक म्हणून पितो किंवा मी काय दारुडा आहे का? सोशल ड्रिंक, चिल मारणं या गोष्टींमुळे प्रारंभी फारसे नुकसान काही होत नसले तरी हळूहळू प्रमाण वाढत गेले की ‘AUD’ची शक्यता निर्माण होते.

मध्यंतरी WHO ने भारतात हे प्रमाण मोठ्या पटिने वाढल्याचे जाहिर केलेय. त्यांच्या रिपोर्टनुसार २०१६ला यामुळे तीस लाख लोकांचा बळी गेला. यात नैसर्गिकपणे मोठी संख्या पुरूषांचीच होती जे घर चालवत होते. या व्यतिरिक्त पाच टक्क्यांहून अधिक मृत्यूचं कारणही मद्यपान हेच होतं. एका सर्व्हेनुसार प्रति एक लाख जनसंख्येमागे ५१.१ पुरूष आणि २७.१ स्त्रिया ही मंडळी मद्यजन्य लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रस्त आहेत. मद्यपान करता करता मद्य माणसाला कधी प्यायला लागतं हे माणसाला कधी लक्ष्यात येत नाही पण साधारणत:

alcohol
जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ! 

- एकटंच किंवा गुपचूप पिणे

- कधी प्यावी हेच न कळणे

- वेळ काळ यांचे भान न राहणे

- स्वत: टाईमटेबल ठरवून घेणे आणि कुणी टिका केली तर अजून जास्त पिणे

- कामाला जाण्याआधी-कामात-कामानंतर नियमित पिणे

- आवडत्या गोष्टींमधला ‘रस’ हरवणे

- अस्वस्थ-बेचैन होणे

- मद्याचा साठा करणं-लपवून ठेवणे

- चांगलं वाटणं किंवा मौज यासाठी पिणे

- नाते-व्यवसाय यात समस्या उद्भवली की पिणे

- न प्याल्यास त्रास होणे

हा असा क्रम असतो.

समस्या तेव्हा येते जेव्हा या सगळ्याचा परिणाम व्यक्तित्व-दैनंदिन आयुष्य-नातेसंबंध यावर होऊ लागतो. हे सगळं व्हायला काही दिवस-महिने-वर्षे लागतात, मात्र कितीही जस्टिफाय केलं तरी याचे इतर जाऊ देत, पण वैयक्तिक पातळीवर प्रचंड मनोशारिरीक परिणाम होतात जसं :

- मेंदूत गॅमा अमायनो ब्यूटिरिक ॲसिड (गाबा) आणि ग्लूटामेट यात असंतुलन निर्माण होते, जे मेंदूचा आवेग नियंत्रित करते परिणामी डोपामाईन अनियंत्रित वाढते आणि उल्हासित वाटून माणूस मद्याच्या अधिकच आहारी जातो.

- मग उल्हासित वाटण्यासाठी-थकवा घालवण्यासाठी-चेतना मिळावी म्हणून माणूस आधी महिन्यात एकदा मग पंधरा दिवस-आठवडा-आठवड्यातून दोनदा-रोज-सकाळ सायंकाळ या प्रवासाच्या दिशेनं निघतो व्यक्तीपरत्वे फक्त वेग बदलतो एवढंच.

- सोशल ड्रिंक किंवा पार्टी या नादात वैयक्तिक प्रमाण किंवा अवलंबित्व हळूहळू कसं वाढते हे लक्ष्यात येत नाही.

- प्रारंभी टेन्शन रिलिज होण्याची भावना असली तरी अतिरिक्त ताणतणाव-संशय यांचा शिरकाव कधी होतो कळत नाही.

alcohol
बोकडाला लागलंय चक्क तंबाखूचं व्यसन...

AUD ओळखण्यासाठी जगभरात DSM अर्थात डायग्नोस्टिक ॲंड स्टॅटिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स हे सर्वमान्य आहे. याच्या मापदंडानुसार यापैकी कमीत कमी तीन लक्षणं तीन गेल्या बारा महिन्यांच्या कालावधीत दिसायला हवेत :

- शरीरावर परिणाम होऊनही मद्यपानाची इच्छा कमी होण्याऐवजी वाढतच असेल.

- न प्याल्यास निद्रानाश-भयकंप होत असेल.

- वारंवार सोडूनही सवय सुटत नसेल.

- यातच सगळा वेळ आणि पैसे खर्च होत असतील.

- कौटुंबिक-सामाजिक स्थान डळमळीत झालं असेल.

अर्थात आपण अतिरिक्त तिखट खाऊन किती व कसे जुलाब होतात याची वाट बघतो का? तर नाही तसंच इथंही आहे. आपण कुठल्या टप्प्यावर आहोत यापेक्षा आपण यात नसणंच श्रेयस्कर. अल्कोहोल ते अल्कोहोल थोडक्यात काय तर ‘दारू’. तिला कितीही छान छान नावं द्या. चपटीत द्या नाहीतर सुंदर बाटलीतून साधी डोकेदुखी ते थेट कॅन्सर यात कारणांच्या यादीत काही असले नसले तरी मद्य असतंच एवढे असूनही अगदी लॉकडाऊनमध्ये होणारी विक्रमी मद्यविक्री ही चक्रावून टाकणारी आहे. असो, मद्यपानामुळं होणारी AUD ही केवळ एकच आणि केवळ वैयक्तिक समस्या आहे असं नाही. सोडायचीच म्हटलं तर स्वयंशिस्तीसारखी सुंदर आणि परिणामकारक गोष्ट नाही, वैद्यकिय उपचार तर आहेतच पण नशामुक्ती केंद्रांव्यतिरिक्तही अनेक ‘सेल्फ हेल्प’ गृप आहेत.

यातली एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे ‘अल्कोहोलिक ॲननिमस’ यांचे जाळं जगभर जवळपास प्रत्येक शहरात आहे. शुल्क किती तर ‘शून्य’. इथे तुम्हाला सोदाहरण भरपूर माहिती मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.