काय आहे Long Term Covid? कोरोनाच्या नव्या रुपाची काय आहेत लक्षणे?

corona
corona
Updated on

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर देशात पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय. दिवसेंदिवस देशातील कोरोनाची संख्या वाढतच असून ही परिस्थिती सध्या चिंताजनक मानली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसची नवी प्रकरणे वाढताना दिसत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार कोरोनाचा भयावह प्रकोप पुन्हा एकदा थैमान घालत आहे. अलिकडेच कोरोनाबाबत अभ्यासांती एक रिपोर्ट सादर झाला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या प्रकोपातून बाहेर आल्यानंतर देखील कोरोनाची काही लक्षणे आठवड्यांपर्यंत तसेच महिन्यांपर्यंत राहू शकतात. NICE म्हणजेच National Institute for Health and Care च्या एका रिपोर्टनुसार कोरोनाच्या एका नव्या रुपाची माहिती मिळाली आहे. 

काय आहे लाँग टर्म कोविड
लाँग टर्म कोविड एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्ण व्हायरसच्या प्रकोपापासून वाचल्यानंतर देखील आणि त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर देखील त्याची लक्षणे आठवडे आणि महिन्यांपर्यंत तसेच राहतात. त्यामुळे काय आहेत ही नेमकी लक्षणे? हे आपण जाणून घेऊयात.

12 आठवड्यापेक्षा जास्त काळ दिसतात लक्षणे
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ एँड केअरच्या एका रिपोर्टनुसार, कोविड रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर देखील त्यांच्यात 12 आठवड्यांपेक्षा अधिक दिवसांपर्यंत कोरोनाचे लक्षण दिसू शकतात. दुसऱ्या बाजूला ऑफिस फॉर नॅशनल स्टेस्टिक्स (ONS) च्या एका रिसर्चनुसार, प्रत्येक 10 रुग्णांमधील एकामध्ये 12 आठवड्यांपर्यंत अथवा त्याहून अधिक दिवसांपर्यंत कोरोनाचे लक्षण दिसून येतात. 

कोविड संक्रमितांमध्ये दिसतात 100 हून अधिक लक्षणे
एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमितांमध्ये दीर्घकालिक कोविड लक्षणे आठवडे आणि महिन्यामध्ये वेगवेगळी दिसू शकतात. एका रिपोर्टनुसार 5163 अशा लोकांशी चर्चा केली गेली जे मोठ्या काळापासून आजारी होते. यामधील 75 टक्क्यांहून अधिक लोक कोरोना पॉझिटीव्ह होते अथवा लक्षणांच्या आधारावर डॉक्टरांनी त्यांना डायग्नोस केलं होतं. या संशोधनानुसार, रुग्णांना लाँग कोविडच्या प्रकोपादरम्यान 100 हून अधिक लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, ही सर्व लक्षणे कोरोनाशी निगडीतच असतील असे नाही. एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, या दोन्हींच्या खात्रीसाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. 

आठवड्यांमध्ये अशाप्रकारे बदलतात लक्षणे
इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये असोसिएट रिसर्च प्रोफेसर नताली लँबर्ट यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या सुरवातीच्या फ्लू दरम्यान संक्रमितांमध्ये थकवा, डोकेदुखी, ताप आणि थंडी वाजणे, उलटीसारखी सामान्य लक्षणे दिसू शकतात. मात्र आठवड्यानंतर याचं रुप भयानक होतं. त्यानंतर कन्फ्यूजन, ब्रेन फॉग, सांधेदुखी आणि ऑक्सिजनची कमतरता यासांरखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. 15 दिवसांनंतर हाय-लो ब्लड प्रेशर, हर्ट रेट वाढणे, शुद्ध हरपणे, चक्कर येणे यासारंखी लक्षणे दिसू शकतात. सोबतच 21 दिवसांनंतर संक्रमितांमध्ये असामान्य लक्षणे जसे की डोळे लाल होणे, डोळ्यात संक्रमण, त्वचेसंबंधी रोग इत्यादी दिसून येतात. 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()