Rope Jumping Tips: फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे व्यायाम करणं पसंत करतात. काहीजण जीममध्ये Gym जाऊन कार्डिओ किंवा वेट ट्रेनिंग करतात. तर काहीजण योगा, वॉकिंग किंवा रनिंगच्या मदतीने फिट Fit राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. When to do and avoid skipping to keep health and injury prevention
यापैकीच एक व्यायामाचा एक उत्तम प्रकार म्हणजे दोरीवरच्या उड्या. स्किपिंग किंवा दोरी वरच्या उड्या हा एक फूलबॉडी एक्सरसाइज Exercise आहे. स्किपिंगमुळे फिटनेससोबतच Fitness वजन कमी करण्यास मदत होते.
दोरीवरच्या उड्यांमुळे पाय, पोट, खांद्यांचा व्यायाम होतो. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसचं दोरी उडयांमध्ये लक्ष केंद्रीत करावं लागत असल्याने यामुळे मेंदूची कार्यक्षमता Mental Ability वाढण्यासही मदत होते.
दोरीवरच्या उड्यांमुळे फुफ्फुसं निरोगी राहण्यासोबतच स्टॅमिना वाढतो. तसंच या उड्यांमुळे हार्मोन बॅलन्स होत असल्यानं तणाव कमी होवून चिंता कमी होते. तसंच यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो. skipping for weight loss
दोरी उड्या मारण्याचे अनेक फायदे असले तरी काही आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी चुकुनही दोरीवरच्या उड्या मारू नये. यामुळे फायदा होण्याएवजी आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात तसंच काही गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.
कोणी दोरी उड्या मारणं टाळावं हे जाणून घेऊ.....
गुडघ्यांच्या समस्या असल्यास- दोरी उड्या मारल्याने पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होत असली तरी जर तुम्हाला गुडघ्याच्या समस्या असतील तर दोरीवरच्या उड्यांचा व्यायाम करणं टाळावं.
ज्या व्यक्तीच्या गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील तसंच गुडघेदुखीचा त्रास असेल तर दोरी उड्या मारणं टाळाव्या.
हे देखिल वाचा-
त्याचप्रमाणे पाय किंवा गुडघ्यांना मोठी दुखापत झाली असल्यास एखादी शस्त्रक्रिया झाली असल्यास दोरी उड्या मारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
संधिवाताचा त्रास असल्यास- संविधाताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी चुकूनही दोरीवरच्या उड्या मारू नयेत. यामुळे त्रास किंवा वेदना अधिक वाढू शकतात. एवढंच नव्हे तर संधिवाताचा त्रास असूनही दोरीवरच्या उड्या मारल्यास हाडं तुटण्याची मोठी शक्यता असते.
तसंच सांधेदुखीमध्ये दोरी उड्या मारल्यास पायाच्या किंवा गुडघ्याच्या सांध्यांमध्ये गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
हृदय शस्त्रक्रिया झाली असल्यास- दोरी उड्या मारणं हे हृदय निरोगी राहण्यासाठी गरजेचं असलं तरी ज्या व्यक्तींचं हार्टचं ऑपरेशन किंवा सर्जरी झाली असेल त्यांनी दोरी उड्या मारू नये. अन्यथा हृदयाचं प्रेशर वाढू शकतं.
दम्याचा त्रास असल्यास- दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी एखादं अवजड काम केल्यास लगेचच थकवा येतो. तसचं त्यांना दम लागलो. दोरी उड्या ही एका प्रकारे हाय इंटेंन्सिटीं कार्डियो एक्सरसाइज आहे. यासाठीच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दोरी उड्या मारणं टाळावं.
या काही समस्यांसोबतच एखाद्या गंभीर आजारातून बरे झालेल्या व्यक्ती तसंच मणक्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला न घेता दोरीवरच्या उड्या मारू नयेत. तसचं गरोदर महिलांनी देखील दोरी उड्या मारू नये.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.