Health Tips : हिंदू धर्मात बाळाचे कान का टोचतात? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

जन्मल्यावर कान टोचावेत का? याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
Baby Ears Pierce In Hinduism
Baby Ears Pierce In Hinduismesakal
Updated on
Summary

परंपरेनुसार लोक त्यांच्या सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात. अलीकडे सोनारापेक्षाही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून कान टोचणी केली जात आहे.

Health Tips : हिंदू धर्मात (Hinduism) फक्त मुलीच नाहीत तर मुलांचेही कान टोचतात. हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक म्हणजे कर्ण-वेध संस्कार. कान (Ear) टोचण्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे सांगितली जातात. ज्या लोकांचे कर्णवेध संस्कार झालेले असतात, त्यांना अर्धांगवायू, मधुमेह तसेच हर्नियासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप कमी होतो, असे मानले जाते.

विशेषत : हिंदू धर्मीयांमध्ये बाळाचे कान टोचणे आवश्यक मानले जाते. बाळाच्या (Baby) जन्मापासून १६ दिवशी किंवा त्यानंतरच्या तीन महिन्यात सोयीनुसार कान टोचले जातात. बाळाच्या बारशाप्रमाणे बाळाच्या कान टोचणीचा देखील एक महत्त्वाचा उत्सवच मानला जातो.

Baby Ears Pierce In Hinduism
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता लालपरीतून करा स्वस्तात 'देवदर्शन'; महिलांना तिकिटात 'इतकी' सवलत, पुरुषांना किती?

बाळाचे कान का टोचतात?

बाळाचे कान टोचून घेण्यामागे आरोग्यविषयक कारणांसह पंरपरा हे देखील महत्त्वाचे कारण आहे. ॲक्युपंक्चर थेअरपीप्रमाणे कान टोचण्यामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो. मुलांचे मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असतानाच जर कान टोचले तर बाळाला कमी वेदना होतात आणि तसेच बाळाची अस्वस्थताही कमी असते. तर काही पालक बाळाचे कान टोचून घेतात त्यामागे सांस्कृतिक कारण किंवा पारंपरिक मूल्ये असतात. भारतीयांसह जगातले बरेचसे पालक आपल्या बाळांचे कान टोचतात.

कोणत्या वया कान टोचणे योग्य?

काही परंपरांमध्ये बाळाचे कान जन्मल्याबरोबर टोचतात तर काही पालक अन्य काही कारणामुळे जन्मतःच कान टोचण्याचा निर्णय घेतात. जर बाळाचे आरोग्य चांगलं असेल आणि त्यामध्ये अन्य काही गुंतागुंत नसेल तर जन्मल्यावर कान टोचावेत का याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.

Baby Ears Pierce In Hinduism
Ambabai Temple : 'पितळी उंबरा ओलांडून घ्या आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन'; कधी मिळणार मंदिरात प्रवेश? जाणून घ्या अपडेट

बाळाचे कान टोचणे केव्हा सुरक्षित असते?

बाळाचे कान टोचण्याने बाळाला खूप जोखीम असते म्हणून बरेचसे पालक संभ्रमात असतात की हे वय बाळाचे कान टोचण्याचे योग्य वय आहे का? जेव्हा तुम्ही बाळाचे कान टोचता तेव्हा संसर्गाचा धोका असतो, कारण तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा तितकीशी विकसित झालेली नसते, त्यामुळे कान टोचण्यासाठी थोडी वाट पाहावी हे चांगले. तज्ज्ञांच्या मते बाळाचे कान टोचण्यासाठी बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत वाट पहावी. पण तुम्ही यापेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकता.

Baby Ears Pierce In Hinduism
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

बाळाचे कान कुणी टोचावेत?

परंपरेनुसार लोक त्यांच्या सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात. अलीकडे सोनारापेक्षाही बालरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून कान टोचणी केली जात आहे तसेच बालत्वचारोगतज्ज्ञ देखील बाळाचे कान टोचत आहेत. जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते, अशा ठिकाणाहून बाळाचे कान टोचून घेणे हे चांगले. उदा: सोनार, दवाखाना, पार्लर किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ.

धार्मिक मान्यतेनुसार कर्णवेध संस्कार महत्त्वाचा आहे तसेच यामागे आरोग्यविषयकदेखील कारण आहे. ॲक्युपंक्चर थेरपीनुसार मधुमेहासह इतर आजार टाळण्यासाठी कान टोचणे महत्त्वाचे आहे. बाळाच्या जन्मानंतर १६व्या दिवशी किंवा तीन महिन्यापर्यंत कधीही कान टोचता येतात.

- डॉ. युवराज गरदडे, वैद्यकीय अधिकारी, पतजंली योग पीठ

Baby Ears Pierce In Hinduism
हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा अन् पांढरेशुभ्र धबधबे..; पश्चिम भागात निसर्गाची मुक्तपणे उधळण, सौंदर्याने सुखावले पर्यटक

ठळक बाबी

  • पूर्वी लोक कानात लिंबाच्या काड्या, त्यांच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे कानात घालत असत.

  • अजूनही बऱ्याच मातांना लिंबाच्या काड्या हा आपल्या बाळासाठी चांगला पर्याय वाटतो.

  • कान टोचणी करताना वापरण्यात येणारे साहित्य निर्जंतुक करणे आवश्यक

  • कान टोचल्यानंतर कानातले सहा आठवड्यापर्यंत बदलू नये

  • कान लाल होणे, सूज येणे किंवा जखम असल्यास वैद्यकीय मदत आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.