आरोग्य विमा का महत्वाचा? त्याच्या प्रकारांची माहिती जाणून घ्या

कोरोना साथीच्या काळात आरोग्य विम्याचे महत्व मोठे असल्याचे कळले
health insurance
health insuranceesakal
Updated on

अपघात झाल्यास मोठा आजार जडल्यास योग्य उपचार घेण्यासाठी आपल्याला आरोग्य विमा (Health Insurance )असल्याने पुष्कळ फायदा होतो. जर विमा (Insurance)नसेल तर मोठे नुकसान होऊ शकते. कोरोना साथीच्या काळात आरोग्य विम्याचे महत्व मोठे असल्याचे कळले. पण तरीही लोकं आरोग्य विम्याबाबत फारसे उत्सुक नसतात. मात्र आर्थिक जोखमीत पडण्यापेक्षा आरोग्य विमा असणे महत्वाचे आहे.

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? (What Is Health Insurance)

आरोग्य (Health) विमा किंवा मेडिक्लेम विमा म्हणजे जो जो अपघात, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मध्ये खर्चापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतो. तुम्हाला मोठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली आणि तुम्ही इन्शुरन्स काढला असेल तर विमाधारक म्हणून तुम्हाला उपचाराचे पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाच्या पूर्ण treatment चा खर्च हेल्थ ईन्शुरन्स कंपनी करते. बहुतेक आरोग्य विमा पॉलिसी कॅशलेस उपचार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या खर्चाचे संरक्षण, रुग्णवाहिका कव्हर इत्यादी फायदे देतात.

health insurance
किस करा.. फिट राहा... होतात ५ फायदे

हेल्थ इन्शुरन्सचे महत्व (Health Insurance Importance)

एकूण अचानक उद्भवणारे आजार बघता आपली तब्येत कधी बिघडेल ते सांगता येऊ शकत नाही. वैद्यकीय उपचार घेण्याची शक्यता अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विमा असणे कधीही चांगले. विमा असेल तर कोणत्याही रुग्णालयात तुम्हाला उपचार घेता येऊ शकतात.

health insurance
Paytm वापरत असाल राहा सावध! असा लागतोय हजारो-लाखोंचा चुना
Life insurance
Life insurance

हे आहेत महत्वाचे प्रकार (Types of Health insurance)

१) वैयक्तिक आरोग्य विमा ( Personal Health insurance)

वैयक्तिक आरोग्य विमा ही पॉलिसी तुम्ही, तुमचा जोडीदार, मुले आणि पालक यांना कव्हर करण्यासाठी खरेदी करू शकता. या प्रकारच्या विमा पॉलिसीमध्ये तुमच्या आजारांवरील वैद्यकीय खर्च, रुग्णालयात दाखल करणे, शस्त्रक्रिया खर्च, खोलीचे भाडे, डेकेअर प्रक्रिया आदी सामाविष्ट असते. या योजनेत तीन लाखांची वैयक्तिक आरोग्य पॉलिसी घेत असाल, तर कव्हर केलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक विमा रक्कम 3 लाख रुपये असेल. जरी ते प्रीमियम तुलनेने जास्त करते. 18 ते 70 वर्षे वयोगटातील लोकं ही योजना खरेदी करू शकतात.

2) फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा (Family Floater Health Insurance)

तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसाठी परवडणारी आरोग्य विमा पॉलिसी हवी असेल तर फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स अत्यंत चांगला पर्याय आहे. या पॉलिसी अंतर्गत समाविष्ट सर्व सदस्यांसाठी सिंगल सम इन्शुरड फ्लोट्स लागू होते. याचा प्रीमियम हा वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीपेक्षा कमी असतो. ही पॉलिसी स्वतःला, तुमच्या जोडीदाराला, मुलांना आणि पालकांना कव्हर करू शकते. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्ही फॅमिली फ्लोटर पॉलिसी खरेदी करावी.

३) ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ( Group Health Insurance Policy )

ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कंपन्यांसाठी तयार केली आहे. तुम्ही कॉर्पोरेट कंपनीत काम करत असाल तर कर्मचाऱ्यांसाठी अशा योजना खरेदी कराव्यात. ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजना कमी किमतीच्या प्रीमियमसह येते. काही विमा कंपन्या विम्याची रक्कम पुन्हा भरण्याची परवानगी देतात. ही योजना तुम्हालाआजारपण, गंभीर आजार, मानसिक आजार आणि प्रसूतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यावर मिळते. कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची अशाप्रकारे काळजी घेत असते.

health insurance
PCODमुळे गर्भधारणा का होत नाही? जाणून घ्या कारणे
Insurance
InsuranceSakal

४) ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य विमा (Senior Citizen Health Insurance )

६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हा विमा आहे. जर तुमचे आईवडील किंवा आजी आजोबा ६० च्या वर असतील तर त्यांना ही विमायोजना घेता येईल. यात औषधांचा खर्च, अपघात किंवा आजारांमुळे होणाऱ्या हॉस्पिटलायझेशन, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या उपचारांसाठी कव्हरेज मिळते. यात हॉस्पिटलायझेशन आणि मानसोपचाराचा खर्चही सामाविष्ट आहे. ज्येष्ठ नागरिकांना आजार होण्याची अधिक शक्यता असते, या योजना इतर आरोग्य विमा पॉलिसींच्या तुलनेत अधिक महाग असतात.

५) मातृत्व आरोग्य विमा (Maternity Health Insurance)

नवीन विवाहित जोडपे किंवा कुटुंबाने होणाऱ्या बाळासाठी ही पॉलिसी खरेदी करावी. यात बाल-प्रसूती,वंध्यत्व खर्च आणि नवजात बाळाला त्याच्या पहिल्या ९० दिवसांपर्यंत कव्हरेज समाविष्ट आहे. मॅटर्निटी कव्हरमध्ये किमान २ वर्षे प्रतीक्षा कालावधी असतो.

६) गंभीर आजार विमा (Critical Illness Insurance)

जीवनशैलीशी संबंधित रोगांचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी क्रिटिकल इलनेस पॉलिसी दिली आहे. यात कर्करोग, स्ट्रोक, हृदयविकार, अर्धांगवायू, मूत्रपिंड आदी गंभीर आजारांवर उपचाराचा खर्च विमा पॉलिसीद्वारे उचलला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.