जागतिक डास दिन का साजरा केला जातो? वाचा कारण

mosquito
mosquitoe sakal
Updated on

नागपूर : एक मच्छर आदमी को .... बना देता है...हा क्रांतिवीर सिनेमातील नाना पाटेकर यांचा संवाद अतिशय प्रसिद्ध आहे. हाच डास अथवा मच्छर अनेक रोगांचा वाहक ठरलेला आहे. आजच्या घटकेला, माणसाच्या आरोग्याचा खरा शत्रू ‘डास’च (mosquito day) आहे. झिका, मलेरिया, डेंगी, हत्तीपायासारख्या आजारांचा वाहक असलेल्या डासांचे समूळ उच्चाटन शक्य नाही. मात्र, डासांपासून निर्माण होणाऱ्या रोगांचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची औषधे आणि आरोग्यविषयक उपकरणांची बाजारपेठ निर्माण झाली आहे.

mosquito
खेळण्याच्या वयात दृष्टी गेली, तरीही शिकवणीशिवाय करतोय IAS ची तयारी

डॉ. रोनल्ड रॉस यांनी संक्रमित झालेली मादा डास चावल्यामुळे हिवताप होतो, याचा शोध लावला. हे निमित्त साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २० ऑगस्टला जागतिक डास दिवस साजरा करण्यात येतो. डासांपासून मलेरिया होतो, ही माहिती पुढे आल्यानंतर डासांपासून बचावाचे घरघुती उपाय सुरू झाले. शास्त्रीय संशोधनातून डास पळविण्यासाठी अगरबत्ती, मच्छरदाणी, डास प्रतिबंधक औषधांमध्ये कॉइल, लिक्विड, मलम यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. कोट्यावधीची बाजारपेठ निर्माण होण्यास डास निमित्त ठरले. डासांमुळे डेंगी, हिवताप, चिकनगुन्या, झिका, हत्तीपाय यासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. डासांच्या हजारो प्रजाती असल्या तरी अ‍ॅनॉफेलीस, क्युलेक्स आणि ईडिस या प्रजाती रोगांचा प्रसार करतात. दरवर्षी एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना हिवताप, डेंगीसह इतर किटकजन्य आजाराचा धोका आहे. पूर्वी केवळ नागपूर विभागात दरवर्षी २५ लाख व्यक्तींच्या रक्ताची तपासणी होत असे. कुंडी, फ्रिज, एसीमागील ट्रे, पिंप व छतावरील पाणी, नारळ कवट्या आणि भंगार साहित्यात डासांची उत्पत्ती होते.

डासांच्या जाती आणि होणारे रोग

  • एडिस इजिप्ती - झिका, येलो फिवर, डेंगी. दिवसा चावतात.

  • अ‍ॅनॉफेलिस - हिवताप होतो. रात्री चावतात

  • क्युलेक्स-हत्तीपाय, अंडाशय वाढणे. चिखलात चावतात.

डासांपासून बचाव -

  • खिडक्यांना जाळ्या बसवा

  • डास प्रतिरोधक मलम लावा

  • डासांना पळविणारे धूप इत्यादींचा वापर करा.

  • फिकट रंगाचे, लांब बाह्यांचे कपडे घाला.

  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा

१९५२ पासून मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. पुढे राष्ट्रीय मलेरिया निर्मुलन कार्यक्रम राबवण्याचा संकल्प केला. १९६१ प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरु झाली. पूर्वी डीडीटी फवारणी होत असे. ती बंद झाली. आता डेल्टामेथरीन, लॅम्ब्राची फवारणी केली जाते. डासांची पैदास रोखणे अशक्य आहे. यामुळे काळजी घेणे हाच उपाय आहे.
-डॉ. मिलिंद गणवीर, निवृत्त सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.