हिवाळ्यातील थंड तापमान आणि दमट हवामानामुळे तुमच्या टाळूला त्रास होऊ शकतो. त्यामुळे केसांवरही (Hair) साहजिकच परिणाम होऊन ते तेलकट दिसायला लागतात. तुमच्या टाळूमध्ये (Scalp) असलेले सेबम (तेल) केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि पीएच संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. मात्र त्याचे प्रमाण जास्त झाले तर अशा तेलकट केसांमुळे केस तुटणे, कोंडा, खाज सुटणे, चिडचिड होणे, अशा अनेक समस्या निर्माण होतात.
-दर दोन-ते तीन दिवसांनी केस धुवणे योग्य आहे. परंतु, ते आठवडाभर किंवा तीन दिवसानंतर धुतले नाहीत तर त्याच्या केस आणि टाळूवर परिणाम होतो.
-कडकडीत किंवा गरम पाण्याने केस धुणे हे केसांच्या आरोग्यासाठी फार चांगले नाही. . थंड पाण्याने केस धुणं हे सगळ्यात फायदेशीर आहे. यामुळे केसातील घाण, कचरा, दूषित घटक आणि केसांना लावलेला शाम्पू नीट निघून जाऊन केस स्वच्छ होतात. तर गरम पाण्याने केसांचे पोषण योग्य होत नाही. पण थंडीच्या दिवसात गार पाण्यापेक्षा कोमट पाणी वापरावे.
-चुकीचा शाम्पू वापरल्यानेही केस चिकट किंवा तेलकट व्हायला लागतात. परिणामी केसांचे नुकसान होते. अशावेळी केसांना मुळापासून टोकापर्यंत मॉइश्चरायझ करण्यासाठी उच्च pH पातळीसह सौम्य शैम्पू वापरा.आठवड्यातून किमान दोनदा शाम्पू करून केसांना कंडीनशर वापरल्यानेही फायदा होईल.
- वारंवार केसांवरून हात किंवा कंगवा फिरवल्याने केस तेलकट होऊ शकतात. कारण या कृतीमुळे सेबमचे प्रमाण वाढून केस तेलकट होतात. तसेच आपल्या आजूबाजूला असलेली धूळ हातावाटे केसात जाऊन ते खराब होतात.
- केस वारंवार खराब होऊ नये म्हणून, कंगवा, झोपण्याची उशी आणि टॉवेल स्वच्छ ठेवा.
- केस घट्ट बांधणे , त्याची सारखी स्टाईल करणे टाळा. कुरळे केस मुळांना जास्त प्रमाणात देतात, जे तुमचे केस खूप तेलकट होण्यापासून रोखतात.
-आहारात झिंक, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे A, C, E आणि B ने युक्त पदार्थांचा समावेश करा. असे केल्याने तुमचे केस चमकदार तर होतीलच. पण भरपूर वाढतील.
-तेटकट पदार्थ किंवा रोस्ट केलेले पदार्थ खाणे टाळा.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.