Hair Loss: पुरुषांपेक्षा 60 टक्के ज्यादा महिलांचे केस गळतात; जाणून घ्या काय आहे कारण 

women and men hair fall causes information Health marathi news
women and men hair fall causes information Health marathi news
Updated on

कोल्हापूर: प्रत्येकांच्या सौंदर्यामध्ये  डोक्यावरील केसांमुळे एक वेगळी भर पडते. मात्र हेच डोक्यावरील केस आता एक मोठे समस्याचे कारण होऊ लागले आहेत.दोन दशकापूर्वी देखील अशी परिस्थिती होती. त्यावेळी टक्कल पडणे (Baldness) किंवा डोक्यावरील केस गळण्याचे अधिक प्रमाण हे पुरुषांच्या मध्ये होते. या समस्या पासून ट्रीटमेंट करण्यामध्ये 90% पुरुष होते.  तर केवळ दहा टक्के स्त्रियांमध्ये केस गळतीचे प्रमाण होते. मात्र अलीकडे ही परिस्थिती बदलली आहे. मोठ्या प्रमाणात केस गळती होण्याची समस्या ही महिलांच्या मध्ये आढळून येत आहे  त्वचा रोग विशेषज्ञांच्या एका संशोधनावरून ही बाब पुढे आली आहे.

प्रत्येकाला आपले केस हे  चांगले असावेत असे वाटते  या केसाचा थेट संबंध आपल्या सौंदर्याशी असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्याची चांगली   निगा राखण्या बरोबरच  त्याकडे  कशा पद्धतीने अधिक लक्ष देता येईल याचाच विचार करत असतो. अलीकडच्या काळात केस गळती ही एक मोठी समस्या बनली आहे . यापूर्वी हे प्रमाण पुरुषांच्या मध्ये अधिक होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांच्यात ही समस्या अधिक जाणवू लागली आहे.

ही आहेत केस गळतीची कारणे

 कमी कॅलरीचे आहार, सातत्याने डायटींग (Dieting) करणे, सतत तणाव, कलरिंग, ब्लोड्राय आणि स्टेटनिंग  अशा केमिकलयुक्त ट्रीटमेंट मुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे आहे. गुरुग्राम येथील फोर्टीस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटने याबाबत संशोधन केले आहे. या ठिकाणचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन चव्हाण यांनी या गोष्टीला सध्याची जीवनशैली हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे आहेत केस गळतीचे प्रकार

विशेषता महिलांच्या मध्ये दोन प्रकारचे केस गळती आढळून येतात. यामध्ये फीमेल पैटर्न हेयर लॉस आणि  टेलोजन एफ्लुवियम असे प्रकार आढळतात.

फीमेल पैटर्न हेयर लॉस
या प्रकारात केसांची गळती हळूहळू सुरू होते मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्या डोक्यावरील केस विरळ होतात. 

टेलोजन एफ्लुवियम 
 यामध्ये अचानकपणे केसांची गळती सुरू होते. या प्रकारात दिवसेंदिवस  केसांची गळती सुरू होते.

केसगळतीची मुख्य कारणे
केसगळती ला मुख्य कारण हे 1800 कॅलरी पेक्षा खाली डाएट करणे हेच आहे. याचबरोबर डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफाईड अशा आजारात केस गळती मोठ्या प्रमाणात होत असते. आयरण, विटामिन बी 12, विटामिन डी   हे शरीरातील घटक कमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात केस गळण्यास सुरुवात होतो. पोटातील गॅस, किडनीचे आजार ,वजन कमी होणे, पोटातील चरबी कमी करण्यासाठी करण्यात येत असलेले व्यायाम यामुळे हा आजार अधिक होऊ शकतो.

मानसिक संतुलन ठेवा

शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन झाल्‍यानंतर अथवा वारंवार नकारार्थी मानसिकता याचाही मोठा परिणाम केसांच्या गळतीसाठी होत असतो. मानसिक असंतुलन हेच मोठे कारण या आजारा मध्ये आढळून येते. यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता सकारात्मक ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.  त्याचबरोबर पीसीओएस ( पॉलिसिस्टिक ओवेरी सिन्ड्रोम) आणि  एंड्रोजन (पुरुष हार्मोन्स) खूप जादा हार्मोन्स असल्याने देखील त्याचा प्रभाव नकारात्मक केसांवर पडतो. यासाठी या गोष्टी माहीत करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन आहारात जिंक , आयरन बायोटीन अमिनो ऍसिड  घटक ज्यातून मिळतात त्याचे सेवन करण्याची गरज आहे. आपल्या केसांची  वेळीच निगा राखून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्यास आपल्याला भेडसावणारी सौंदर्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.


डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.