प्रत्येक गरोदर स्त्रीला Precious आणि High Risk म्हणून ट्रीटमेंट मिळणे गरजेचे आहे.
-डॉ. ज्योती चव्हाण, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व उपचारतज्ज्ञ
chirayu.jyoti@gmail.com
अतिधोकादायक गर्भधारणेमध्ये (हाय रिस्क प्रेग्नसी) मागील दहा १० वर्षात ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. काही काळापूर्वी ज्या प्रेग्नसीबरोबर डायबिटिस, हायपरटेन्शन, अस्थमा, हार्टडिसिज (Heart Disease) असायचे. आताच्या काळात जिथे स्ट्रेस, प्रदूषण, केमिकल्स, जीवनशैली याचे मानवी शरीरावर विचित्र परिणाम होत आहेत व त्याचा परिणाम प्रत्येक गरोदर स्त्रीवर (Pregnant Women) पडणे साहजिक आहे. तिच्या होणाऱ्या बाळामध्येसुद्धा हे परिणाम दिसून येतात म्हणून प्रत्येक प्रेग्नसी ही आता महत्त्वाची बनली आहे.
हाय रिस्क प्रेग्नन्सी (High Risk Pregnancy) म्हणजे वयाच्या ३३ व्या वर्षांनंतरची प्रेग्नसी ब्लडप्रेशर, डायबिटिस, थायरॉईड, हार्टडिसिज अशा आजारांसोबत स्त्रियांना जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा त्या प्रेग्नसीला हायरिस्क प्रेग्नसी असे म्हटले जाते. ग्रामीण भागसुद्धा या सगळ्यातून सुटलेला नाही. त्याची कारणं वेगवेगळी असतात. ग्रामीण भागांमध्ये स्त्रियांमध्ये जास्त लठ्ठपणा दिसून येत नाही; पण त्यांच्या आहारात प्रोटिन आणि न्युट्रिशनची कमतरता असते. त्यामुळे बाळाची वाढ कमी होणे.
तसेच पाचव्या महिन्याला ब्लडप्रेशर येणे, सूज येणे आणि नंतर आकडी येऊ शकते. जर मूळातच प्रोटिन, व्हिटामिन असे घटक प्रेग्नसीपूर्वी कमी असतील तर प्रेग्नसी राहिल्यानंतर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये उलट्या होतात. त्यामुळे शरीराची झीज वाढते म्हणून प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला Pre-Pregnancy फॉलिक ॲसिड, मल्टिव्हिटॅमिनची औषधे घेणे, हिमोग्लोबिन दहाच्या वरती ठेवणे, थायरॉईड लेव्हल नॉर्मल करणे हे महत्त्वाचं आहे.
शहरातील जीवनशैली, प्रदूषणामुळे लठ्ठपणा, पीसीओडी, हार्मोन्समधील बदलामुळे डायबिटिस, ब्लडप्रेशर जास्त वाढलेला दिसतो. अशा प्रेग्नसी हायरिस्क प्रेग्नसी असतात. यामध्ये पहिल्या ३ महिन्यांमध्ये गर्भपात (Abortion) होण्याचे प्रमाण ५० टक्केनी वाढते. कारण जे भ्रूण वाढते, त्यामध्ये दोष येऊ शकतात. हार्मोन्सच्या कमतरतेमुळे बाळाची वाढ होत नाही आणि बाळामध्ये व्यंग होण्याची शक्यता वाढते.
करिअरमुळे बऱ्याच महिला प्रेग्नसी पुढे ढकलतात. त्यामुळे अंडकोषामध्ये हायपर मॅच्युरिटी, डिफेक्टस असण्याची शक्यता आणि जन्माला येणाऱ्या बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता वाढते. प्रत्येक गरोदर स्त्रीला Precious आणि High Risk म्हणून ट्रीटमेंट मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक महिन्याला वजन, ब्लडप्रेशर, रक्त-लघवीची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये शरीरामध्ये झपाट्याने बदल होत असतात. ब्लडप्रेशर कोणत्याही क्षणी वाढू शकते आणि ते लवकर निदर्शनास आले तर वेळेत औषधोपचार सुरू केले जाऊ शकतात. हार्मोनल सपोर्ट व फॉलिक ॲसिड हे गरजेचे आहे. प्रेग्नसी माहिती पडल्यानंतर लगेचच औषधं सुरू करणे ही काळाची गरज आहे.
हार्मोनलसपोर्ट, मल्टी व्हिटामिन, फॉलिक ॲसिड जर सुरवातीचे ३ महिने महिलांना नाही दिले तर त्या मुलांमध्ये व्यंग येण्याची व गर्भापाताची शक्यता वाढते. डॉक्टरांच्या मदतीने हायरिस्क प्रेगन्सीत योग्य उपचार करता येतात. सर्व सूचनांचे पालन केले आणि सर्व औषधे वेळेवर घेतली तर सुरक्षितरित्या प्रसूती होऊन निरोगी बाळ जन्माला येऊ शकते.निरोगी बाळ होण्यासाठी महिलेचा दृष्टिकोन सकारात्मक आणि मन आनंदी असणे आवश्यक आहे.
(डॉ. चिरायू हॉस्पिटल येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.