पुणे, ता. 06 : आज जागतिक सायकल दिवस आहे. अनेकांना आपली पहिली सायकल आठवत असेल. सायकल शिकताना जेव्हा पहिल्यांदा तोल सांभाळू लागलात तेव्हाचा तो क्षण अनेकांना आठवत असेल. आपल्या अनेकशा आठवणी सायकलीसोबत जोडल्या गेल्या आहेत. आपली पहिली सायकल कशी होती हे अनेकांच्या स्मरणात असेल. सायकल हे वाहतुकीचं सर्वोत्तम साधन आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालवायला सोपी, परडवणारी असते. तसेच सायकल ही पर्यावरण अनुकूल आहे.
गेल्या काही वर्षांपासून सायकलीचा वापर हा कमी झाला आहे. पूर्वी कॉलेजमध्ये जाणारी मुलंही सर्रासपणे सायकल वापरायची, पण आता शाळेत जाणाऱ्या मुलांकडेही मोटार सायकल आल्या आहेत. सायकल वापरणे कमी प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. असे असले तरी सायकल वापरण्याचे अनेक फायदे आहेत.
सायकल चालवणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरु शकतं. सायकल वापरणे परवडणारे तर आहेच पण तुमचे शरीर आणि मन चांगले ठेवण्यासाठी सायकल उपयुक्त ठरु शकते.
- सायकल चालवल्याने स्नायूंची चांगली कसरत होते. तुमचे पाय आणि मांडीचे स्नायू सायकल चालवल्याने मजबूत होतात. सांध्याची गतिशीलता सुधारण्यास आणि हाडे मजबूतीसाठी सायकल उपयुक्त आहे.
- सायकल चालवल्याने सामर्थ्य आणि तग धरुन राहण्याची क्षमता(stamina) वाढतो. रक्ताभिसरणही सायकल चालवल्यामुळे वाढते.
- सायकल चालवल्याने ह्रद्य आणि रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढत जाते. तसेच मानसिक ताणही सायकल चालवल्यामुळे कमी होतो. याबरोबरच चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत होते.
- नियमित सायकल चालवल्याने मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे एकूणच आपली कार्यक्षमता वाढते. तसेच आपला मूड चांगला राहण्यास सायकल चालवणे फायदेशीर ठरते.
- अनेक खेळांसाठी विशेष प्रशिक्षण आणि नियमित सरावाची आवश्यकता असते. मात्र, सायकलींग हा व्यायामाच सर्वात सोपा आणि प्रभावी प्रकार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.