जागतिक आरोग्य दिन : हेल्थ है तो लाइफ है।“

World Health Day Quiet environment scholarship and way of life
World Health Day Quiet environment scholarship and way of life
Updated on

आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, ही बाब सन 2020 मध्ये अधोरेखित झाली आहे. ‘कोरोनाव्हायरस’च्या (कोविड-19) साथीने जगात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे आणि माणसांच्या जीवनावर व रोजंदारीवर त्याचा परिणाम होत आहे. अशा वेळी आरोग्य ही खरोखरच आपली संपत्ती आहे आणि काहीही झाले, तरी या संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे, याबद्दल जागरुकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘एका सुसंस्कृत, आरोग्यदायी जगाची उभारणी’ ही संकल्पना आपल्या स्वतःपासून व आपल्या कृतीतून उतरविण्याची हीच योग्य वेळ आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचीही तीच संकल्पना आहे.

चांगले आरोग्य का महत्त्वाचे आहे?

स्वतःच्या अटींनुसार जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य कसे आवश्यक आहे, याबद्दल आपण कधी विचार केला आहे? आपल्या प्रत्येकाकडे पूर्तता करण्याजोगी वेगवेगळी स्वप्ने आहेत आणि साध्य करण्याजोगी जीवनाची उद्दिष्टे आहेत. एखादी संपूर्ण मॅरेथॉन धावायची असेल, जगाची सफर करायची असेल किंवा मित्र व कुटुंबासह मौल्यवान आठवणी निर्माण करायच्या असतील.. जीवनातील अशा ध्येयांचा पाठपुरावा करणे, हेच आपल्याला प्रगतीपथावर नेत असते.हे सर्व साध्य करण्यासाठी निरोगी शरीर व मन आवश्यक आहे.

हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर

आपल्या सततच्या वेगवान आयुष्यात, निरंतर ताण, चिंता असतात. त्यांमुळे आणि काही वाईट सवयींमुळे, आपले आरोग्य मागे पडते. व्यायाम न करणे, पौष्टिक खाण्यापेक्षा जंक फूड खाणे, टीव्ही वा मोबाईलवर आवडते कार्यक्रम पाहात झोपेकडे दुर्लक्ष करणे, यांमुळे आपले तात्पुरते मनोरंजन होत असले, तरी त्याचे आपल्या शरीरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. धूम्रपान, मद्यपान करणे, शारीरिक हालचाली कमी करणे, रात्री उशिरा झोपणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे लठ्ठपणा, डोळे खराब होणे, ‘टाईप 2’ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे आजार होतात. त्याशिवाय, भारतात मधुमेह सर्वत्र आढळतो. भारतास जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या मते, भारतात सुमारे 7.7 कोटी इतके मधुमेहाचे रुग्ण आहेत. चुकीची जीवनशैली व इतर कारणांमुळे ही संख्या वाढत आहे.

आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे म्हणजेच समग्र आरोग्य, हे लक्षात ठेवणे नेहमीच आवश्यक आहे. नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक विकारांची प्रकरणे जगभरात वाढली आहेत आणि ‘कोविड-19’मुळे त्यांची तीव्रता जास्त झाली आहे. म्हणूनच, या साथीच्या काळात आपण आपले आयुष्य सांभाळण्याचे काम करीत असताना, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि भावनिक हित जपणे हे पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे झाले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे आपले आयुष्य विस्कळीत होतेच, त्याशिवाय आपल्या प्रियजनांनादेखील मोठा त्रास होऊ शकतो. आरोग्यसेवेचे, वैद्यकीय उपचारांचे खर्च वाढले आहेत. त्या खर्चांमुळे आपली बचत मोठ्या प्रमाणात कमी होते; कदाचित दिवाळेही निघू शकते.

केवळ वजन कमी करणे म्हणजे चांगले आरोग्य, असा एक लोकप्रिय समज आहे; मात्र चांगले आरोग्य हे तेवढ्यापुरतेच मर्यादीत नसते. चांगल्या आरोग्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या संपूर्ण आरोग्याची कटिबद्धता समाविष्ट असते. त्यात तुमच्या भावनिक व शारीरिक निरोगीपणाची काळजी घेणे असते.  निरोगीपणाच्या बाबतीत सर्वांसाठी एकच आकार हे तत्त्व लागू होत नाही. ते आपल्या आवश्यकतेनुसार सानुकूलित केले जाणे आवश्यक आहे.

इंटरनेटवर आरोग्य व पौष्टिक अन्न या विषयांवरील विविध स्वरुपाची माहिती, मते-मतांतरे आणि विरोधाभासी प्रतिक्रिया यांचा जणू सुकाळ असतो. त्यातून निरोगी जीवनशैलीचा योग्य पर्याय निवडणे हे सुरुवातीस गोंधळाचे ठरू शकते; तथापि, आपण अवलंब करू शकू, अशा काही आरोग्यदायी सवयी उपलब्ध आहेत. त्यांच्यामुळे आपल्या जीवनात मोठा फरक पडेल :

आरोग्यदायी आहार घेण्याची सवय लावून घ्या :
आरोग्यदायी खाणे म्हणजे बेचव अन्न खाणे किंवा आपले आवडते पदार्थ संपूर्णपणे सोडून देणे, असा काही अर्थ नाही. आरोग्यदायी अन्न खाणे म्हणजे आपल्यासाठी दीर्घकाळ चालू शकणाऱ्या आहाराच्या शाश्वत पर्यायांची निवड करणे व अधूनमधून इतरही पदार्थांचा आस्वाद घेणे. आरोग्यदायी आहार आपल्याला अधिक ऊर्जा देऊ शकतो, आपल्या रोग प्रतिकारशक्तीला चालना देतो आणि भविष्यात आपल्याला अनेक संक्रमक रोग व आरोग्याच्या इतर गुंतागुंतींपासून वाचवतो.
 
थोडी हालचाल करीत राहा :

वजन कमी होणे, सेरोटोनिन बूस्ट, चयापचय क्रिया सुधारणे, शरीरातील उर्जेची पातळी वाढणे असे व्यायामाचे अनेक फायदे आहेत. आपल्या मानसिक आरोग्यासाठीदेखील व्यायामाचे सिद्ध लाभ आहेत. व्यायामामुळे आपल्याला चांगली झोप लागते, आपला तणाव व चिंता या गोष्टी कमी होतात, स्वाभिमान व आत्मविश्वासही वाढतो. आपण आपली बैठ्या स्वरुपाची जीवनशैली बदलण्याची आणि नियमितपणे व्यायाम करण्याची प्रतिज्ञा करणे आवश्यक आहे. सुरुवातीला हे व्यायाम खूप कठोर असू नयेत; दररोज अर्धा तास वेगाने चालणे हीदेखील निरोगी जीवनाची चांगली सुरुवात ठरू शकते.

झोपेला प्राधान्य द्या :
मानसिकदृष्ट्या तल्लख राहणे, लक्ष केंद्रित करता येणे आणि चांगले शारीरिक आरोग्य राखणे यासाठी रात्रीची चांगली झोप आवश्यक आहे. दररोज 7 ते 8 तासांच्या झोपेमुळे केवळ वजन कमी होते एवढेच नाही, तर आपले मनःस्वास्थ्य सुधारते, आपली उत्पादकता व व्यायामाची कार्यक्षमता वाढते, शरीरातील जळजळ कमी होते आणि आपली प्रतिकारशक्ती सुधारते.

व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घ्या :
उत्तम आयुष्यासाठी निरोगी शरीराप्रमाणेच निरोगी व सुदृढ मनदेखील आवश्यक आहे. मानसिक अनारोग्यामुळे आपल्या शरीरावर वास्तविक, दृश्य स्वरुपातील परिणाम होतो, उदा. मधुमेह व स्ट्रोक. त्याचबरोबर आपल्या जीवनातील प्रत्येक घटकावरदेखील त्याचा विपरीत परिणाम होतो. आपल्या मानसिक आरोग्याची चांगली काळजी घेण्यासाठी व्यावसायिक मदत घेणे ही एक आवश्यक बाब आहे. मानसिक समस्येवर आपल्या स्वत:ला किंवा आपल्या प्रिय व्यक्तीस शिक्षित करण्यासाठी, साहित्य व इतर मदत पुरविणारी, अनेक विश्वासार्ह संसाधने ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत. या मदतींमुळे कदाचित आपल्या समस्यांचे निराकरण एका रात्रीत होणार नाही, तथापि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याच्या दृष्टीने ही एक आवश्यक पायरी आहे.

जेथे आवश्यक असेल तेथे एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या : तुम्ही सोपी व निरोगी जीवनशैली निवडू शकता, परंतु गरज निर्माण झाल्यास, तुम्ही एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घेणे हेच हितावह राहील; खासकरून जर तुम्ही एखादा मोठा बदल करीत असाल किंवा मधुमेह, कर्करोग, हृदयरोग यांसारख्या आजाराने ग्रस्त असाल, तर व्यावसायिकाचा सल्ला हा आवश्यकच असेल. तुमच्या आरोग्यासंबंधी समस्या समजून घेण्यास मदत करू शकणारे डॉक्टर असो, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्हाला आहारामध्ये मदत करू शकणारे आहारतज्ज्ञ असो, किंवा खास तुमच्या शरिराचा विचार करून तुमच्यासाठी सानुकूलित व्यायाम योजना तयार करणारा परवानाधारक फिटनेस प्रशिक्षक असो, यातील कोणाचाही सल्ला आपल्या आरोग्यदायी जगण्यासाठी घेणे आपल्याला आवश्यक असू शकते.

संपूर्ण मानसिक शांती आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेसाठी विमा घ्या : आपली जीवनशैली निरोगी असली, तरी अनेकदा आजारांपासून किंवा अपघातांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ते तेवढे पुरेसे नसते. कधीकधी आयुष्यात काही विचित्र वळणे येतात. त्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण तयार असायला हवे. वैद्यकीय खर्च वाढलेले असूनही, आपणास किंवा आपल्या प्रिय व्यक्तीस कोणतीही तडजोड करावी न लागता उत्तम, दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री आपल्याला असायला हवी. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे; म्हणूनच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सर्वसमावेशक आरोग्यविमा संरक्षण आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी व आर्थिक संरक्षणाची गरज म्हणून पुरेसा आरोग्यविमा असणे किती महत्त्वाचे आहे, हे कोविड-19 साथीच्या काळात आपल्याला दिसून आलेले आहे.

तर, या जागतिक आरोग्य दिनी, चला आपल्या आरोग्याच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जबाबदार, शहाणपणाची आणि निरोगी जीवनशैली निवडून सर्वोत्तम जीवन जगण्याचा संकल्प करूया! त्यातून आपल्याला अधिक काळ आणि चांगले जीवन जगण्यास मदत होऊ शकेल! अखेर, “हेल्थ है तो लाइफ है।“

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.