आजकाल लोकं मोबाईल हातात न घेता इयरफोन किंवा हेडफोन लावून बोलणे पसंत करतात. मिटींगदरम्यान, गाणी ऐकण्यासाठी तसेच ऑनलाईन शाळेदरम्यान मुलांचा इयरफोन(Earphone) वापर करणं वाढलं आहे. पण तज्ज्ञांच्या मते, मोठ्या आवाजात म्युझिक ऐकत असताना तसेच बराच वेळ इयरफोन वापरल्यास त्याचा कानांवर (Ear) वाईट परिणाम होतो. त्यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्याची क्षमता कमी होणे, बहिरेपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इयरफोन, हेडफोन वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते समजून घेणे गरजेचे आहे.
कान दुखणे - बराच वेळ मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इयरफोन लावून बोलले किंवा गाणी ऐकल्यामुळे कानात वेगळाच आवाज ऐकायला येतो. त्यामुळे कान दुखण्याची शक्यता वाढते.
मेंदूवर वाईट परिणाम- तज्ज्ञांच्या मते, हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण करतात. त्यामुळे त्याचा दीर्घकाळ वापर केल्यास मेंदूवर वाईट परिणाम होतो.
कानात मळ साठणे- तासन्तास इयरफोन किंवा हेडफोन वापरल्याने कानात मळ साठू शकतो. त्यामुळे कानात इंन्फेक्शन, ऐकण्याची क्षमता कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
ऐकू न येणे किंवा बहिरेपणा- खूप वेळ इयरफोन वापरल्याने ऐकण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो. एक्सपर्टच्या मते, इयरफोनमधून निघणाऱ्या कंपनांमुळे कानांच्या पेशी त्यांची संवेदनशीलता गमावतात. त्यामुळे अशा व्यक्तींना कमी ऐकण्याची किंवा अजिबात ऐकू न येण्याची समस्या निर्माण होते.
कानाचा संसर्ग- अनेकदा लोक हेडफोन इतरांबरोबर शेअर करतात. पण यामुळे इअरफोनच्यामार्फत बॅक्टेरिया, जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे कानाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हेडफोन किंवा इअरफोन कोणाशीही शेअर करणे टाळा. जर दिलेत तर ते स्वच्छ केल्यानंतरच तुम्ही वापरा.
चक्कर येणे- तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ इअरफोन लावून गाणी ऐकल्याने, बोलण्याने किंवा मोठा आवाज ऐकल्यास तुम्हाला चक्कर येऊ शकते.
असा करा हेडफोनचा वापर
- खूप काळ हेडफोन-इयरफोनचा वापर करून नका
- कमी आवाजात संगीत ऐका
- इतरांना तुमचे हेडफोन देऊ नका
- इयरफोन कानाच्या अगदी आत घालू नका
- मध्येमध्ये ब्रेक घ्या
- ऑनलाईन क्लास दरम्यान आवाजाची तीव्रता कमी ठेवा. कारण आवाजाची तीव्रता जास्त असल्यास श्रवणशक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
- इयरबड्सवाले हेडफोन वापरा. कारण त्यामुळे कान सुरक्षित राहू शकतात.
हेडफोन कितीवेळ वापरावा?
डॉक्टरांच्या मते, ६० टक्के जास्त आवाज ठेवून एमपी३ उपकरणांचा वापर केला जावा. जर तुम्ही खूप मोठ्या आवाजात ऐकत असाल तर त्याची वेळ मर्यांदा कमी करा. कारण मोठ्या आवाजात संगीत ऐकणे टाळले पाहिजे. तरीही तुम्हाला मोठ्या आवाजात संगीत ऐकायचे असल्यास, 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ऐकू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.